१. बॉलिवूड स्टार्स अनेक गोष्टींसाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. परंतु त्यांच्या काही सवयींबाबत फार कमी चाहत्यांना माहिती असते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबाबत अधिकाधिक जाणून घेण्यात चाहत्यांचा नेहमीच रस असतो. स्टार्सनादेखील अशा सवयी असतात ज्या त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानलादेखील अशीच एक सवय आहे. सलमानला साबण गोळा करण्याची सवय आहे. जगभरातील हँडमेड, डिझायनर आणि हर्बल साबणांचा अनोखा संग्रह त्याच्याकडे आहे. ऑर्गेनिक फळ आणि भाज्यांपासून निर्माण केलेल साबण त्याला खूप आवडतात. याव्यतिरिक्त त्याला मलमलचा रुमाल बाळगणे आवडते.
01-salman

२. अमिताभ बच्चन दोन्ही हातांनी लिहू शकतात. ‘कुली’ चित्रपटादरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा उजवा हात बऱ्याच काळापर्यंत दुखापतग्रस्त होता, त्यामुळे त्यांनी डाव्या हाताने लिहिण्यास सुरुवात केली होती. अभिषेक अथवा ऐश्वर्या देशाबाहेर असताना अमिताभ मनगटावर दोन घड्याळं बांधतात. एकात भारतीय वेळ सेट केलेली असते, तर दुसऱ्या घड्याळात अभिषेक अथवा ऐश्वर्या ज्या देशात गेले आहेत त्या देशातील वेळ सेट केलेली असते.
02-amitabh

३. जॉन अब्राहमला पाय हलवायची वाईट सवय आहे. परंतु त्याच्या या सवयीचे जॉनचे मित्र आणि कुटुंबियांना वाईट वाटत नाही.
03-john-abrham

४. संजय दत्त एक वेळ दारुचे व्यसन सोडू शकेल, परंतु गुटखा खाण्याची वाईट सवय मोडणे त्याला कठीण आहे.
04-sanjay-dutt

५. बॉलिवूडची ‘लैला’ सनी लिओनीला दर पंधरा मिनिटांनी पाय धुण्याची सवय आहे. दर पंधरा मिनिटांनी पाण्याने पाय धुणारी सनी शुटिंगला उशिर होत असला तरी आपली ही सवय सोडायला तयार नाही.
05-sunny

६. बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान पायातील पादत्राणे झोपायला जाण्यापूर्वीच काढतो. याशिवाय त्याला सिगारेटचे व्यसन आहे. दिवसभरात तो शेकडोनी सिगारेट ओढतो.
06-shahrukh-khan

७. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीलादेखील सिगारेटचे व्यसन आहे.
07-rani

८. अनेकाना दिवसातून दोनदा दात घासण्याची सवय असते. परंतु, अभिनेता आयुषमान खुराना याबाबतीत जरा वेगळा आहे. त्याचे मन करेल तेव्हा दिवसातून अनेकवेळा तो ब्रश करतो.
08-ayushmann-khurrana

९. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर उर्फ बेबोला नखे खाण्याची वाईट सवय आहे.
09-kareena-kapoor