भारतीय ग्लॅमर दुनियेचा चेहरा-मोहरा गेल्या अनेक वर्षांत झपाट्याने बदलला आहे. खास करून या क्षेत्रातील बऱ्याच स्त्री मॉडेल्स उतरत्या वयातदेखील स्वत:च्या फिटनेसबाबत कमालीच्या जागरूक असल्याचे पाहायला मिळते. योग्य आहारासोबतच जीममध्ये व्यायाम करून त्या फिटनेस जपतात. त्याचबरोबर योगा करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यदेखील जपतात. कित्येक मॉडेल्स त्यांच्या वयापेक्षा तरूण दिसतात. ऐन तारुण्यात रॅम्पवरील आपल्या सौंदर्याने फॅशन जगतावर राज्य करणाऱ्या या तिशी पार केलेल्या सुंदऱ्या आजही तितक्याच आकर्षक, फिट आणि सुंदर दिसतात. तारुण्यात मेकअप आणि फॅशनेबल कपडे परिधान करून कोणीही सुंदर दिसेल. परंतु, वाढत्या वयाबरोबर तोच उत्साह आणि फिटनेस टिकवून ठेवणे कठीण असते. या सुंदऱ्यांनी ते साध्य केले आहे. वाढत्या वयातील त्यांचा फॅशन सेन्स वाखाणण्याजोगा असून, त्यांनी परिधान केलेले फॅशनेबल कपडे आणि त्यांची स्टाईल आजच्या युवतींना आकर्षित करते. तरुणींना लाजवेल असा फिटनेस, उत्साह आणि सौंदर्य लाभलेल्या अशाच काही तिशीपार मॉडेल्स –

लिसा रे –
लिसाचे वय ४५ वर्षे असून ती विशीपार किंवा तिशीतील दिसते. ग्रे रंगाचा टॉप आणि पॅण्ट परिधान केलेली लिसा तिच्या वयापेक्षा खूपच तरूण वाटते. अनेक तरुणींसाठी हा ग्लॅमरस लूक कॅरी करणे तशी कठीण बाब आहे. परंतु या वयातदेखील लिसा या लूकमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसते.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
us artist richard serra personal information
व्यक्तिवेध : रिचर्ड सेरा
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
Lisa Ray (Instagram images/@lisaraniray)

अचल कुमार –
फ्लोरल ड्रेसमधील ही ३७ वर्षाची मॉडेल खचितच सुंदर दिसत आहे. केसांना लावलेली फ्लोरल हेअर पीन तिचे सौंदर्य अधिकच खुलवत आहे. केवळ याच पोशाखात नव्हे तर तिने परिधान केलेल्या कोणत्याही पोशाखात ती सुंदर आणि स्टाईलिश दिसते.

Anchal Kumar

नेत्रा रघुरामन –
देशातील आघाडीच्या मॉडेल्समध्ये नेत्राचे नाव सामिल होते. नेत्राला स्टाईलची चांगलीच जाण आहे. पांढऱ्या रंगाच्या लांब गाऊनमधील तिचा हा मनमोहक लूक लक्षवेधी असा आहे.

Nethra Raghuramnan

अंजली लवानिया –
पिवळ्या रंगाचा स्कर्ट आणि रंगिबेरंगी टॉप परिधान केलेल्या या ३१ वर्षीय मॉडेलचा लूक अतिशय आकर्षक आहे.

Anjali Lavania

जेस रंधावा –
मॉडेल आणि डान्सर असलेल्या जेसला आकर्षक आणि सुंदर कसे दिसावे याची चांगलीच जाण आहे. हिरवा आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील जेस खचितच सुंदर दिसत आहे.

Jesse Randhawa

सारा जेन डिआस –
या ३३ वर्षीय मॉडेलचा टॅन पॅन्ट, पांढरा टॉप आणि लांब हाताच्या शर्टमधील कूल लूक कमालीचा फॅशनेबल आहे.

Sarah Jane Dias

सोनल चौहान –
सोनलचा हा क्लास लूक नजर खिळवणारा आहे. ३१ वर्षीय सोनल या स्टाईलमध्ये ग्रेसफूल दिसत आहे.

Sonal Chauhan (Instagram image/@sonalchauhan)

राजेश्वरी लुंबा –
३८ वर्षीय राजेश्वरी आजही सुंदर दिसते. पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि त्यावरील काळ्या स्ट्रेप्स राजेश्वरीचे रुप खुलवत आहेत.

Raajeswari Loomba

उज्ज्वला राऊत –
या सुंदर मॉडेलकडे पाहून ती ४० वर्षांची आहे असे वाटते का. काळ्या रंगाचा ड्रेसमधील उज्ज्वलाचे सौंदर्य खुलून दिसते आहे.

Ujjwal Raut

सिंधुरा गडे –
पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेली ३१ वर्षीय सिंधुरा लूक साधा असला तरी मनाला भूरळ पाडणारा असा आहे.

Sindhura Gadde

पूजा गुप्ता –
३४ व्या वर्षीदेखील पूजा एखाद्या अल्लड तरूणीसारखी दिसते आहे. निळया पोशाखातील पूजा एखाद्या कॉलेज कुमारीप्रमाणे दिसते.

Pooja Gupta

श्वेता साळवे –
आधुनिक तरीही पारंपरिक वाटावा असा हा श्वेताचा साडीतील लूक अतिशय आकर्षक असा आहे. ३३ व्या वर्षीदेखील ती रुपाची खाण दिसतेय.

Shweta Salve

कॅरल ग्रेसिअस –
एखाद्या पार्टीत अथवा कार्यक्रमात खुलून कसे दिसावे हे या सुंदरीकडून शिकावे. आकर्षक काळ्या शॉर्ट ड्रेसमधील ३८ वर्षीय कॅरल स्टाईलिश दिसत आहे.

Carol Gracias