scorecardresearch

Premium

…म्हणून काळा कोट घालण्यावर देव आनंद यांना होती बंदी

‘है अपना दिल तो आवारा…’

dev anand
देव आनंद

‘है अपना दिल तो आवारा…’ असं म्हणत आपल्या अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर येणारे देव आनंद आजही अनेक तरुणींच्या मनाचा ठाव घेतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांच्या यादीत देव आनंद यांचं नाव आवर्जून घेण्यात येतं. त्यांच्या सहाबहार अभिनयापासून ते अगदी आपल्या अनोख्या अंदाजात अभिनेत्रीला भुलवण्याच्या युक्त्यांपर्यंत आजही सर्व काही चर्चेचा विषय ठरतं.

बऱ्याच चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या देव साहेबांच्या संवाद कौशल्याचेही अनेक चाहते आहेत. पण, या अभिनेत्याच्या ‘फिमेल फॅन फॉलोइंग’बद्दल सांगावं तितकं कमीच. तुम्हाला माहितीये का, या अभिनेत्याबद्दलची अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. देव आनंद यांना अडचणीत टाकणारी ती गोष्ट म्हणजे काळा कोट, काळ्या रंगाचे कपडे.

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Ajit Pawar and rohit pawar
अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…”
School Boy Kidnapped, pune, 50 Lakhs Ransom, Safely Rescued, police, Kidnappers, search,
पुणे : शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू
husband wife dispute
‘पती आईला वेळ-पैसे देतो’ म्हणून पत्नीने केली कौटुंबिक हिंसाचाराची केस; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

पांढऱ्या रंगाच्या शर्टवर काळ्या रंगाचा कोट घातलेल्या या अभिनेत्यावर त्या काळात अनेकजण फिदा झाले होते. मुख्य म्हणजे आजही त्यांची ती अदा अनेकांची मनं जिंकते. त्यांचा हा अंदाज त्या काळात खऱ्या अर्थाने चर्चेत होता. कारण तरुणी अक्षरश: देव आनंद यांच्यासाठी वेड्या होत्या. ‘काला बाजार’ या चित्रपटानंतर देव आनंद यांचा काळ्या कोटमधील लूक प्रचंड चर्चेत आला होता. मुख्य म्हणजे देव साहेबांना या लूकमध्ये पाहून मुली अक्षरश: वेड लागल्याप्रमाणे वागायच्या. इतकंच नव्हे तर आपल्या आवडत्या अभिनेत्यापोटी त्या कोणतंही संकट ओढवून घेण्यासाठी, इमारतीवरुन उडी मारण्यासाठीही तयार असायच्या. सरतेशेवटी हाताबाहेर जाणारी ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि कोणाच्याही जीवाला धोका पोहोचू न देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This is why ban imposed on bollywood actor dev anands black suit kala bazar

First published on: 21-08-2017 at 18:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×