‘ओ नॉटी क्रिश्ना’ या गाण्याला सोशल नेटवर्किंग साइट्स आणि यू ट्यूबवर बरीच पसंती मिळत आहे. त्यात अजून एका नवीन व्हिडिओची भर पडली आहे. शोभित बनवैत या नवोदित कलाकाराने नुकताच त्याचा एक व्हिडिओ फेसबूक आणि यू ट्युबवरुन शेअर केला आहे.
यात त्याने एका इंग्रजी गाण्याला पारंपारिक तबल्याची जोड देत धम्माल ‘फ्युजन’ करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाश्चिमात्य संगीताला मिळालेली ही भारतीय संगीताची जोड खरंच फार श्रवणीय आहे. शोभितच्या या व्हिडिओला सोशल वर्तुळातून सध्या बरीच पसंती आणि प्रसिद्धी मिळत आहे. या वायरल व्हिडिओशिवाय शोभित बनवैतच्या काही वेगळ्या व्हिडिओही त्याने यू ट्युबवर शेअर केल्या आहेत. ‘लिन ऑन’ या गाण्यावरही शोभितने दिलेली तबल्याची जोड यापूर्वी अनेकांच्या पसंतीस उतरली होती. संगीत क्षेत्राकडे हल्ली जास्त कल असणाऱ्या तरुणाईमध्ये शोभितच्या व्हिडिओंची फार चर्चा आहे. त्यामुळे पार्टीमध्ये जर हे फ्युजन कानावर पडले तर नवल वाटून घेऊ नका.