कॅट ‘भिगी बिल्ली’ नाहीये हे तिने ‘एक था टायगर’ या चित्रपटामधून दाखवून दिले आहेच. आता ती ‘बिल्ली’ही नाहीये हे दाखवून देण्यासाठीही सज्ज झाली आहे.  ‘एक था टायगर’ चा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ साठी कतरिना सध्या एक नव्हे तर अनेक हॉलीवुड स्टंटट्रेनर कडून प्रशिक्षण घेत आहे. कतरिना सध्या टॉम स्ट्रथर्स, बस्ट रव्हीर्स आणि ‘द डार्क नाईट राईझेस’ या बॅटमॅन सीरीजमधील हॉलीवुडपटाचे स्टंट ट्रेनर ख्रिस्टोपर नोलन्स यांच्याकडून अ‍ॅक्शन सिन्सचे धडे घेत आहे. प्रत्येकजण या चित्रपटातील त्यांना दिलेल्या भागातील अ‍ॅक्शन सिन्स दिग्दर्शित करत आहे. कतिरानही यासाठी लागणाऱ्या फिटनेसवर विशेष मेहनत घेत आहे.

यश चोप्रांच्या आठवणींना उजाळा

मसक्कली आणि तिच्या मित्रांमध्ये आठवणींची देवाणघेवाण नेहमीच होत असते. मसक्कलीचे ज्येष्ठ मित्र अमिताभ यांनी काहीच दिवसांपुर्वी तिच्याशी बोलताना यश चोप्रांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यशजींसबोत चित्रपटाचं चित्रीकरण करणे म्हणजे सहलीचा आनंदच! या शब्दांत बिग बींनी यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काश्मीर असो अथवा दिल्ली किंवा अगदी अ‍ॅम्स्टरडॅमही चोप्रा यांच्या चित्रपटात काम करण म्हणजे या निरनिराळ्या ठिकाणांची सैर करण होय. चोप्राजींनी चित्रीकरणावेळी अभिनेत्यांसोबत त्यांच्या कुटुंबालाही सोबत येण्याचे आमंत्रण दिल्याने रोज चित्रीकरण आटोपल्यानंतर फिरायला जाणे, थट्टामस्करी, बैठे खेळ खेळण्यात वेळ घालवणे हे क्षण आजही ताजेतवाने करतात. बिग बींनी यावेळी सिलसिला या चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख केला. काश्मीरमध्ये चित्रीकरण करणे आणि त्यानंतर ‘दाल लेक’ मध्ये मोठय़ा होडय़ा ज्यांना ‘डोंगास’ म्हटले जाते त्यातून तलावाची सफर करणे. त्यात लोकसंगीतासोबतच नवनवीन खाद्यपदार्थाच्या मेजवानीचा आनंद लुटत तासन्तास वेळ घालवणे हा आमचा चित्रीकरणा दरम्यान नित्यक्रम होता. शेवटी भावनिक होत हे क्षण आता परत येणार नाहीत आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. इतकं म्हणून अमिताभजींनी मसक्कलीची रजा घेतली.