‘पद्मावती’ चित्रपटाला होणारा विरोध गेल्या काही दिवसांपासून वाढतच असल्याचं चित्र असून, आता या चित्रपटाला विरोध करणारी आणखी एक संघटना समोर आली आहे. जय राजपूताना संझटनेतर्फे या चित्रपटाच्या प्रदर्शिनाला विरोध केला जात असून, चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहांची जाळपोळ करु असा इशारा देण्यात आला आहे.

राजपूत संघटनानांना दाखवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास चित्रपटगृहांमध्ये जाळपोळ करू, अशी धमकीही संघटनेने दिली आहे. ‘इतिहासाची अशी हेळसांड आम्ही खपवून घेणार नाही. त्यातही अलाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मावती यांच्यामध्ये कोणतंही नातं असल्याचं प्रतीत होणारी दृश्य चित्रपटात दाखवण्यात आली, तर आम्ही चित्रपटगृहात जाळपोळ करु’, असं जय राजपूताना संघटनेतर्फे म्हटलं गेलं आहे. याव्यतिरिक्त बऱ्याच घडामोडी कलाविश्वात घडत आहेत. यामध्ये अभिनेता राम कपूरच्या नावाचीही बरीच चर्चा होती. लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. चला तर मग, रामवर हा आरोप नेमका कोणी आणि का लावला आणि काय होत्या बॉलिवूड विश्वातील इतर घडामोडी….

सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना रिक्षावाल्याने मारले, प्रकृती गंभीर

अभिनेता राम कपूरवर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

पाच वर्षांपूर्वी सैफच्या रिसेप्शन पार्टीत घातलेल्या त्याच ड्रेसमध्ये दिसली सारा!

VIDEO : तुमच्या घरातही दिवाळीची ‘ही’ लक्षणं दिसतात का?

सुबोध भावेसोबत झळकणार ‘नकटू’

VIDEO : ..म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली डोसा विकण्याची वेळ!

‘द गुड महाराजा’मधून संजय दत्तचा काढता पाय

वादग्रस्त आयुष्याची कथा लिहिण्यासाठी ‘या’ गायकाला कोट्यवधींची ऑफर

जुबैर खानची सलमानवर शेलक्या शब्दांत टीका