अभिनेता राजकुमार राव यांचा ट्रॅप्ड चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरनंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रलरमध्ये राजकुमार बहुमजली इमारतीमधील घरामध्ये अडकल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी राजकुमारला ज्यापद्धतीने घरामध्ये अडकल्याचे दाखविले आहे. ते पाहून या चित्रपटातील रहस्याबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहलता नक्कीच निर्माण होईल. ट्रलरला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन अस्वस्थ राजकुमारची कहाणी पाहण्यासाठी प्रक्षेक चित्रपटगृहात तीन तास अडकणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. फँटम फिल्म्स द्वारा निर्मित ‘ट्रॅप्ड’ची कथा एकदम वेगळी आहे. बहुमजली इमारतीमध्ये आपल्या घरात अडकलेल्या एका व्यक्तीची कथा दिग्दर्शकांनी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात राजकुमार राव मुख्य भूमिका करीत आहे.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

गेल्या वर्षी १८ व्या जियो मामी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रिमियर झाला होता. यावेळी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. २०१३ मध्ये ‘लुटेरा’ या रोमँटीक चित्रपटानंतर मोटवाणी राजकुमारला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राजकुमारच्या चित्रपटाबाबत बोलायचे तर, त्याचा‘न्यूटन’ हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार आहे. यंदाच्या वर्षीच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये ‘न्यूटन’ चित्रपटचा खास शो दाखविण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार रावने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मासुरकर यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव एका कारखुनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक छत्तीसगडच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणारे असून नक्षलवाद आणि माओवादीच्या दहशतीमध्ये असणाऱ्या छत्तीसगडमधील निवडणूका पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राजकुमार प्रयत्न करताना दिसणार आहे.

राजकुमारने ‘अलिगढ’ चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ या चित्रपटात मनोज वाजपेयीबरोबर अभिनेता राजकुमार राव याने स्क्रिन शेअर केली होती. मनोज वाजपेयी यांनी चित्रपटामध्ये सिरास नावाच्या प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. प्राध्यापक सिरास यांना मदत करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत राजकुमार दिसला होता. अभिनेता म्हणून एक तप काम केल्यानंतर राजकुमारसारख्या नव्या पिढीच्या कलाकारांबरोबर संवेदनशील विषयावरच्या चित्रपटात काम करणे ही आपल्यासारख्या अनुभवी अभिनेत्यासाठी पर्वणी असल्याचे मनोज वाजपेयी यांनी म्हटले होते. अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांची सत्यकथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केला होता. या चित्रपटाने देखील आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजविल्याचे दिसले होते. अर्थातच राजकुमारचे चित्रपट दर्जेदार असतात यात शंका वाटत नाही. त्यामुळेच या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चित्रपट १७ मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.