काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, रणबीर कपूरपुढे विनवणी करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण ती रणबीरकडे नक्की कशासाठी विनवणी करत होती हे काही कळले नव्हते. पण आता त्यावरचा पडदाही उठला आहे. माहिराच्या मित्राने ‘मुंबई मिरर’ला याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, त्या व्हिडिओवरुन जे काही तर्क काढले जात आहेत ते चुकीचे आहेत.

रणबीर आणि माहिरा जेव्हा भेटले तेव्हा ते सिनेमांबद्दल चर्चा करत होते. त्यावेळी माहिरा, रणबीरला ‘रईस’ सिनेमाचे शाहरुख खानसोबत प्रमोशन करण्यासाठी ती किती उत्सुक होती ते सांगत होती. तिची इच्छा असूनही राजकीय गोष्टींमुळे तिला ‘रईस’चे प्रमोशन भारतात करता आले नव्हते. ती तिच्या मनातल्या भावना हावभाव करुन बोलून दाखवत होती पण व्हिडिओमध्ये मात्र काही वेगळेच दिसून येत होते.

दरम्यान, दुबईत पार पडलेल्या कार्यक्रमात माहिरा आणि रणबीर एकत्र आले होते. कॅमेऱ्यासमोर सर्वकाही सुरळीत सुरु असताना कॅमेऱ्याच्या मागे या दोघांमध्ये फारसे काही चांगले नाही, असे अनेकांना वाटत होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना वाटण्याचे कारण म्हणजे या दोघांचा बॅकस्टेजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात रणबीरसमोर माहिरा अक्षरशः विनवणी करताना दिसत होती.

https://www.instagram.com/p/BR02mO_FSuh/

https://www.instagram.com/p/BR1JqDJF7QG/