बॉलिवूडमध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना लाँच करणारा अभिनेता सलमान खान आता आणखी एक नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता चंकी पांडेच्या मुलीला म्हणजेच अनन्या पांडेला लाँच करण्यासाठी सलमान सज्ज झाला असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर सध्याच्या घडीला बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होणाऱ्या सेलिब्रिटी किड्सच्या यादीत चंकीची लेकही समाविष्ट झाली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनन्याने नुकतंच तिचं पदवी शिक्षण पूर्ण केलं असून सध्या ती गोव्यामध्ये मित्रमंडळींसह सुट्टीचा आनंद घेत आहे. सुट्टीवरुन परत आल्यानंतर अनन्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. त्यासोबतच येत्या काळात ती बॉलिवूड पदार्पणाच्या दृष्टीनेही तयारी करणार आहे.

https://www.instagram.com/p/BRD17PAhmlS/

नवोदित कलाकार आणि सलमान खान हे समीकरण काही नवं नाही. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या काही नवोदित कलाकारांच्या पदार्पणामागे सलमान खानचं नाव जोडलं गेलं होतं. सोनाक्षी सिन्हा, डेझी शाह, सूरज पांचोली या कलाकारांच्या पदार्पणातही सलमानचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे बरेच कलाकार या दबंग अभिनेत्याचे सतत नेहमीच आभार मानत असतात. सध्याच्या घडीला सर्वांच्या मदतीला धावणारा भाईजान सलमान ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून येत्या ईदच्या मुहूर्तावर हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा: प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे आतापर्यंत लग्न झाले नाही!

https://www.instagram.com/p/BP0p7DLh4hj/