छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाईं या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरांमध्ये पाठकबाईंच्या नावाने ओळख निर्माण केली. या मालिकेत सध्या राणा आणि अंजली यांच्या लग्नानंतरची प्रेम कहाणी बहरताना बघायला मिळतेय.

वाचा : ‘विरुष्का’ची लगीनघाई?

Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?

छोट्या पडद्यावर राणादासोबत पाठकबाईंचे लग्न झालेय आणि त्यांच्यातील प्रेमकथा हळूहळू बहरतेय. त्यात प्रेक्षक रंगले असताना, ‘रिअल लाइफ’मध्येही अक्षयाची प्रेमकथा सुरू असल्याचे दिसते. ‘का रे दुरावा’ मालिका फेम सुयश टिळक आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. अक्षया आणि सुयशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते दोघे नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. या फोटोंना दिलेले कॅप्शनही सर्वांचे लक्ष वेधणारे आहेत.

वाचा : अन् मलायका आणि अर्जुनने एकमेकांना टाळले

नुकताच पाडवा झाला. त्यानिमित्त अक्षयाने सुयशसोबतचा फोटो शेअर केला. यात तिने मोती रंगाचा सुंदर ड्रेस घातलेला दिसत असून, सुयशने मद्रासी लोकांप्रमाणे पांढरे शर्ट आणि लुंगी घातली आहे. ‘आनंदी क्षण. पाडवा सेलिब्रेशन. मी जेव्हा तुझ्यासोबत असते तेव्हा माझ्यासाठी प्रत्येक दिवस दिवाळी असते’, असे कॅप्शन तिने फोटोला दिलंय.

https://www.instagram.com/p/BagK9GTD5wJ/

अक्षया तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुयशसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते. कालही तिने सुयशसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला दिलेले कॅप्शन नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे. तिने लिहिलंय की, ‘मिसिंग…… तुमचं प्रेम किती दूर जाऊ शकतं याची परीक्षा म्हणजेच दुरावा.’

https://www.instagram.com/p/Baje7HDDqeX/

https://www.instagram.com/p/BaD3JjrjM-b/