जिच्या इशाऱ्यावर दाऊ द आणि हाजी मस्तान काम करायचे, अशा शब्दांत एकेकाळी पुरुषी सत्ता असलेल्या अंडरवर्ल्डवर वचक ठेवणाऱ्या माफिया क्वीन जेनाबाई दारूवालीचे क ौतुक के ले जाते. सत्तरच्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्डची सूत्रे आणि पोलिस दोन्ही समीकरणे सांभाळणाऱ्या जेनाबाईच्या कथेवरून प्रेरित असलेली नवीन मालिका ‘झी टीव्ही’वर दाखल होत आहे. ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या ५२ भागांच्या मालिकेतून एकीकडे एका मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीचा माफिया क्वीन म्हणून झालेला प्रवास उलगडणार आहे तर दुसरीकडे हीच माफिया क्वीन त्या काळी मुंबईतील चाळींमधून दहशतीखाली जगणाऱ्या समाजासाठी कसा आधारस्तंभ ठरली याची कथा पाहायला मिळणार आहे.
एखाद्या ठरावीक व्यक्तीचा चरित्रपट म्हटल्यावर अनेक बंधने येतात. त्यामुळे ‘अम्मा’ या मालिकेत जेनाबाई नव्हे तर झीनतच्या रूपाने ही माफिया क्वीन पाहायला मिळणार आहे. नवरा पाकिस्तानात पळून गेल्यानंतर मुलांना घेऊन मुंबईत एकटीने त्या काळी जीवन जगणेही मुश्कील होते. त्या काळात मुलांना टाकून पळून जाण्यापेक्षा मिळेल तो व्यवसाय पत्करून तिने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ते करत असताना तिची गाठ त्या काळी मुंबई शहरावर राज्य करणाऱ्या हाजी मस्तान, दाऊद, मुनीस्वामी मुदलियारसारख्या गुंडांशी पडली. आणि आपल्या हुशारीने तिने त्यांनाही आपल्या हुकमाखाली ठेवले, ही तिच्या जिद्दीची कथा लोकांसमोर येणे खूप महत्त्वाचे वाटले, अशी माहिती मालिकेचे निर्माते फरहान पी. झाम्मा यांनी दिली. या मालिकेची व्याप्ती मोठी असल्याने तिची निर्मितीही भव्य स्तरावर होणे अपेक्षित होते. त्यानुसार संपूर्ण मालिका चित्रपटासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यावर चित्रित होणार असून चित्रीकरणही रामोजी फिल्मसिटीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील मुंबईत घडलेली ही कथा आहे. त्यामुळे त्यानुसार सेट तयार करून त्या वेळची मुंबई दाखवणे हेही अवघड काम होते. त्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकापासून अनेक ऐतिहासिक इमारतींची ५० वर्षांपूर्वीची जुनी छायाचित्रे मिळवण्यात आली. त्यावर कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये काम करून त्याचा वापर करण्यात आला आहे. शिवाय, त्या काळी स्त्री-पुरुषांच्या कपडय़ांची स्टाइल, केसांची स्टाइल यावरही लक्ष देण्यात आले आहे. म्हणजे त्या काळी दाऊद किंवा हाजी मस्तान यांच्यावर बॉलीवूड कलाकारांचा प्रभाव होता. कित्येक डॉन राजेश खन्ना, अमिताभ, दिलीप कुमार यांच्या हेअरस्टाइलची नक्कल करत होते. या सगळ्याचा खास अभ्यास करून त्याचा वापर मालिके त के ला असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऊर्मिला मातोंडकर ‘अम्मा’..!
‘अम्मा’ या मध्यवर्ती भूमिकेसाठी खूप मोठय़ा कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. ऊर्मिला मातोंडकरलाही ही भूमिका करण्यात रस होता. मात्र टेलिव्हिजनच्या चित्रीकरणाचे सत्र काहीसे किचकट, जास्त दिवसांचे असते. शिवाय चित्रीकरण हैद्राबादमध्ये होणार असल्याने ऊर्मिलाला शक्य झाले नाही. आता ही भूमिका उर्वशी शर्मा या बॉलीवूड अभिनेत्रीने केली आहे. उर्वशीबरोबरच अमन वर्मा दाक्षिणात्य डॉन मुनीस्वामी मुदलियारच्या भूमिकेत दिसणार असून हाजी मस्तान आणि दाऊदच्या व्यक्तिरेखाही वेगळ्या नावाने दिसणार आहेत. त्यासाठी नवाब शाह, दीपराज राणा, शावर अली, नासिर खान वॉकर अशा अनेक नावाजलेल्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?