वेब सीरिज जगतातील प्रसिद्ध अशा ‘द व्हायरल फिव्हर’चा संस्थापक अरुणभ कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर अरुणभविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्हीएफचीच माजी कर्मचारी असणाऱ्या या महिलेने १३ मार्चला अरुणभवर विनयभंगाचा आरोप केला होता.

तेव्हापासूनच या प्रकरणाच्या विविध चर्चांना मनोरंजन विश्वात उधाण आले होते. व्हायरल फिव्हरच्या पीडित महिलेने अरुणभवर आरोप लावल्यानंतर इतरही काही महिलांनी त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावला होता. आता एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन अरुणभ विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…
Ranveer Singh Angry Criticizes Narendra Modi Calls PM
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

या सर्व प्रकरणाला जवळून हाताळणाऱ्या अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी पुराव्यांअभावी अरुणभवरील हा खटला रद्द झाल्याची अफवा फेटाळून लावली. त्यासोबतच त्यांनी हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. अरुणभ विरोधातील हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलिसांवर रिझवान यांनी या विषयात लक्ष देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

१३ मार्चला समोर आलेल्या या सर्व प्रकारानंतर वेब सीरिजच्या विश्वात आणि चित्रपटसृष्टीमध्येही अनेकांनीच या विषयी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. ‘द इंडियन उबर-दॅट इज टिव्हीएफ’ या ब्लॉगवर ‘इंडियन फॉलर’ नावाने टीव्हीएफच्या कर्मचारी महिलेने स्वत:ची व्यथा मांडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अरुणभ कुमार आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपाविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. टीव्हीएफमधील काही प्रसिद्ध चेहऱ्यांनी अरुणभची बाजू घेतली. पण, ट्विंकल खन्नासहित काही बी-टाऊन सेलिब्रिटींनी त्याच्यावर निशाणा साधला होता. या सर्व घटनेबद्दलचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे रितसर तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतील अरुणभ म्हणला होता, ‘कोणत्याही सुंदर स्त्रीची प्रशंसा करणं हा काही गुन्हा नाही.’ त्याच्या याच वक्तव्याला निशाणा करत महेश भट्ट, ट्विंकल खन्ना, स्वरा भास्कर यांनी अरुणभविरोधात नाराजीचा सूर आळवला होता. या प्रकरणाची चर्चा थंडावत नाहीत तोच अरुणभच्या वक्तव्याने पुन्हा एकदा अनेकांचा रोष जागा झाला असेच म्हणावे लागेल.