‘पर्मनंट रूममेट्स’, ‘पिचर्स’,  ‘उम्रिका’ या वेब सीरिजची कास्टिंग डिटेक्टर आणि त्यात काम करत असलेल्या निधी बिश्तविषयी..! वेब सीरिजच्या डिजिटल जगात आज हे महत्त्वाचं नाव ठरलंय.

ते  म्हणतात इंटरनेट इज फुल ऑफ इंटलिजन्ट पिपल स्टक इन डिफरंट जॉब! ‘थ्री इडिएट्स’मध्येही बाबा रणछोडदासांनी आपली मूळ आवड, आपले पॅशन आणि आपले करिअर यांवर ज्ञानामृत दिले आहे. पण प्रत्येकातच ही हिंमत नसते.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

हातचं सरळ साधं करिअर, नोकरी सोडून आतल्या ऊर्मिला बाहेर येऊ देऊन तिचा पाठलाग करत आपला रस्ता स्वत: तयार करणे हे चित्रपटात बघायला छान वाटतं; पण प्रत्यक्षात तसं करताना मात्र खरोखरच पाय लटपटतात. पण कधी नियती, तर कधी कितीही दमन केलं तरी उफाळून येणारी आतील ऊर्मी, कधी परिस्थिती ही त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आणते आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात मोलाची भर टाकते.

अशीच गोष्ट आहे निधी बिश्तची!

वेब सीरिज या क्षेत्रात आज निधी बिश्त हे महत्त्वाचे नाव आहे.

‘पर्मनंट रूममेट्स’, ‘पिचर्स’,  ‘उम्रिका’ या वेब सीरिजची कािस्टग डिटेक्टर आणि त्यात काम करत असलेली ही निधी बिश्त!

कास्टिंग डिटेक्टरचे काम म्हणजे एक प्रकारे थँकलेस जॉब असतो. त्यांचं काम खरं तर प्रेक्षकांच्या लक्षातही येत नाही असं! पण कािस्टग डिरेक्टरने योग्य कािस्टग केलं असेल तरच ती मालिका, चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा हृदयाला भिडतात. खऱ्या वाटतात. महाभारत आणि रामायण या मालिका म्हणजे एकेकाळी विक्रमी लोकप्रिय झालेले दूरदर्शनवरील कार्यक्रम. यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या महामालिकांमधील कािस्टग! यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही जणू खरीच आहे असं वाटावं अशा पद्धतीने त्यातील प्रत्येकाने सादर केली आहे असं  सर्वजण म्हणतात. हेच काम असतं कािस्टग डायरेक्टरचं. निधी बिश्तने पर्मनंट रूममेट्समध्ये निधी सिंग आणि प्रफुल्ल व्यासचे प्रमुख भूमिकेसाठी कािस्टग केले आणि आज ती व्यक्तिरेखा हीच त्यांची ओळख बनली आहे. ‘पिचर्स’ या उत्तम वेब सीरिजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा जणू त्या त्या अभिनेत्या अभिनेत्रीसाठीच तयार केले आहे असे वाटते. हे सर्व श्रेय जातं कािस्टग डिरेक्टर निधी बिश्तला!
कािस्टग डिरेक्टरकडे एक अंतप्रेरणा असावी लागते. निधीला जणू हे ईश्वरी वरदान लाभलेय. ती म्हणते मी संहिता वाचून काढते तेव्हा त्याक्षणी मला आतून प्रेरणा मिळतात की ही भूमिका कोण योग्य रीतीने करू शकेल!

हे काम करण्याआधी ती दिल्लीला वकिली पेशात होती. इतरांसारखंच सर्वसामान्य आयुष्य जगत होती. दिल्लीला हायकोर्टात नोकरी करताना तिच्या आतील अभिनयाची ऊर्मी मात्र तिला शांत बसू देत नव्हती. वकिली करताना तिने अभिनयाचा एक छोटासा कोर्स केला आणि तिचे िहदी नाटकांच्या रंगमंचावर आगमन झाले. नाटय़ प्रयोग करताना तिला तिचे सुप्त गुण समजू लागले. नवनव्या कल्पना सुचू लागल्या. त्यावर ती काम करू लागली. आवाजावर, शब्दांवर, संवादावर प्रचंड नियंत्रण असलेल्या या मुलीला, तिची अभियानाचे प्रचंड आवड, प्रेम पाहून या क्षेत्रात येण्याचे सुचवलेही गेले. एक दिवस तिने खरोखरच तसा निर्णय घेतला आणि बॅग भरून मुंबईकडे प्रस्थान केले. प्रवासात रेल्वेच्या आवाजापेक्षा मनात चाललेल्या वैचारिक वादळाचा गदारोळ जास्त मोठा होता.

मुंबईत आल्यावर मात्र तिला सगळीकडे नकार मिळू लागला. तिचा चेहरा गोल प्रकारात मोडत असल्याचे कारण सांगून तिला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अपात्र ठरवले जाऊ लागले. पण ती तग धरून राहिली. पुढे तिची ओळख ‘टीव्हीएफ’ या वेब सिरीज कंपनीचे संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याशी झाली आणि तिथून ती टीव्हीएफ या वेब सिरीज निर्मितीमधील ब्रॅण्ड असलेल्या निर्मिती चॅनलची प्रमुख घटक झाली. निधी बिश्तने सुपरहिट सीरिज ‘पर्मनंट रूममेट्स’, ‘ट्रिपिलग’मध्ये कामही केलं आहे. ‘माँ के हात की सिगारेट’, ‘कॉलर नना’ हे विडंबनात्मक व्हीडिओज आणि तिची एकता कपूरची भूमिका नेटिझन्सना प्रचंड आवडली आहे. आता अनुष्का शर्माच्या ‘फिलोरी’ या चित्रपटातही ती काम करते आहे.

वेब सीरिजसारख्या डिजिटल,  चित्रपटसारख्या व्यवहारी माध्यमांत काम करतानाही तिचे रंगभूमीवरील प्रेम कायम आहे. स्वत:ची नाटक कंपनी असावी, त्यात नवोदित कलाकारांना संधी मिळावी हे तिचं स्वप्नही तिने पूर्ण केलंय. तिने स्वत:ची ‘न्यू ब्रेन थिएटर वोक्स’ ही कंपनी सुरू केली आहे. स्वत:ची वाट स्वत: शोधणारी निधी बिश्त सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे.
response.lokprabha@expressindia.com