बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री आणि सध्याच्या घडीला लेखिका म्हणून ओळख निर्माण करणारी ट्विंकल खन्ना नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर पडद्यापासून दुर असणारी ट्विंकल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. ट्विंकल बॉलिवूडपासून दुर असली तरी तिचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. ट्विंकल जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडते तेव्हा आजही तिला पाहण्यासाठी तिचा चाहता वर्ग गर्दी करताना दिसतो. याचीच प्रचिती ट्विंकलला आली. तिच्या एका चाहत्याला ट्विंकलसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नसल्याचे पाहायला मिळाले. ‘पिंकविल्ला’ वेबसाइटने ट्विंकचा तिच्या चाहत्यासोबत सेल्फी देताना एक फोटो त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये ट्विंकल तिच्या चाहत्याला मनात नसताना फोटो देताना दिसत आहे.

चाहत्याच्या चेहऱ्यावर तिच्यासोबत सेल्फी घेतानाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत असला तरी, ट्विंकलच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी गायब झाल्याचे दिसते. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिची सहकारी अनू धवन देखील दिसत आहे. अभिनयानंतर लेखिका म्हणून ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या ट्विंकलने काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या शेजाऱ्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याचे पाहायला मिळाले होते.

ट्विंकलने आपल्या शेजाऱ्याचा चोरुन फोटो काढण्याचा आनंद घेत तिने हा फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता. ट्विंकल आणि अक्षय जुहू चौपाटीसमोरील एका इमारतीमध्ये राहतात. या इमारतीतीमध्ये ह्रतिक रोशनचा देखील फ्लॅट आहे. या परिसरात बाबा राम रहिम इन्सान वास्तव्यास आले आहेत. विशेष म्हणजे ट्विंकलने त्यांचा फोटो चोरुन काढला होता. सोशल मीडियावर सक्रिय असणारी ट्विंकल तिच्या चाहत्यांसाठी अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. या फोटोच्या माध्यमातून ट्विंकलने तिच्यातील छुपी फोटोग्राफी दाखवून दण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले होते.