वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे गायक अभिजीत भट्टाचार्यचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड (बंद) करण्यात आले आहे. महिलांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याने अनेकांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटविरोधात तक्रार केल्याने ट्विटरने अकाऊंटच बंद केल्याचे समजते.

ट्विटरवर बेताल विधान करुन चर्चेत राहणारा गायक अभिजीतला त्याची टिवटिव भोवली आहे. मंगळवारी संध्याकाळी ट्विटरने अभिजीतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले आहे. अभिजीतच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्यास ‘अकाऊंट सस्पेंडेड’ असा संदेश झळकत आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

abhijeet-screenshot

 

सोमवारी संध्याकाळी अभिजीतने परेश रावल यांच्या ट्विटचे समर्थन केले होते. काश्मिरात दगड फेकणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्याऐवजी अरुंधती रॉय यांनाच जीपला बांधायला हवे होते, असे वादग्रस्त ट्विट परेश रावल यांनी केले होते. या ट्विटचे गायक अभिजित भट्टाचार्यने समर्थन केले. अरुंधती यांना गोळ्या घालायला हव्यात, असे त्याने म्हटले होते.

सोमवारीच जेएनयूतील विद्यार्थी संघटनेतील महिला पदाधिकाऱ्याविरोधातही अभिजीतने असभ्य भाषेचा वापर केला होता. यानंतर संबंधीत महिलेने अभिजीतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यासाठी ट्विटरकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय अभिजीतने आणखी एका महिला ट्विटर युजरवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यानंतर अभिजीतविरोधात सोशल मीडियावर टीका सुरु झाली होती.

मंगळवारी अभिजीतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याचे समोर आले. आता त्याचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्याते आले आहे की तात्पुरत्या काळासाठी बंद केले हे अद्याप अस्पष्ट आहे. अभिजीतने पीटीआय वृत्तसंस्थेला याविषयी प्रतिक्रिया दिली. अरुंधती रॉय आणि जेएनयूतील त्यांचे समर्थकच यामागे आहेत असा आरोप अभिजीतने केला. पण मी याला घाबरत नाही, देशातील जनता माझ्यासोबत आहे असे अभिजीतने म्हटले आहे.