वरुण धवन सध्या त्याच्या बद्रीनाथ की दुल्हनिया या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण वरुण आपल्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो क्रिकेट मॅच बघायला विसरत नाही. नुकताच वरुण भारताचा कर्णधार विराट कोहलीला भेटला तेव्हा विराटप्रती त्याचे प्रेम लपवू शकला नाही.

वरुण, विराट कोहलीचा एवढा मोठा चाहता आहे की, वरुणने अगदी विराटसारखीच हेअरस्टाइल करुन घेतली. वरुण आणि विराटने एकाच सलुनमध्ये बसून आपले केस कापून घेतले. वरुणचे नवीन हेअरस्टाइलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये वरुण आणि विराट एका सलुनमध्ये उभे असलेले दिसत आहेत आणि त्या दोघांचा हेअरकटही अगदी सारखा आहे.

हा फोटो शेअर करताना वरुणने लिहिले की, बद्री फक्त विराटचाच चाहता आहे. यानंतर त्याने लिहिले की, जेव्हा मी बद्रीनाथ की दुल्हनिया सिनेमाच्या दिग्दर्शकाला विचारले की बद्रीचे कोणावर प्रेम आहे तेव्हा शशांक खेतानने विराट कोहली असे नाव घेतले. हे माझ्य भाग्य आहे की विराटने त्याच्यासोबत मला केस कापायला परवानगी दिली. विराट खूपच साधा आणि विनम्र आहे. मी चार वर्षांपूर्वी त्याला भेटलेलो तसाच तो मला आजही भेटला.

https://www.instagram.com/p/BRFMw9lAkx8/

काही दिवसांपूर्वी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाच्या पहिल्या टिझरमध्ये अभिनेता वरुण धवनचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले होते. या ट्रेलरमधील वरुणचे रुप पाहिले तर ते कोणत्याही सर्वसामान्य मुलाप्रमाणेच दिसले होते. कोणत्याही हिरोची, विनोदी कलाकाराची झलक त्याच्या या नव्या लूकमधून पाहायला मिळत नाहीये. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल आहे. २०१४ मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरुणाईने हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. त्यामुळे या सिनेमाबाबतही तरुणाईमध्ये उत्सुकता नक्कीच असेल.