बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. विनोदजींच्या निधनानंतर अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली वाहात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध धाटणाचे चित्रपट साकारणाऱ्या या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात एका खलनायकी भूमिकेतून पदार्पण केलं होतं. १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ हा विनोदजींचा पहिला चित्रपट होता.

ch310063

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

२२ व्या वर्षी ज्यावेळी विनोदजींनी ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हा त्यांच्या भूमिकेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी त्यांची देहबोली आणि व्यक्तीमत्त्व सर्वांनाच भावलं.

moab

‘मन का मीत’ नंतर विनोद खन्ना यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. परंतु, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली.

ch244656

खलनायकी भूमिकांनंतर विनोद खन्ना यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांतूनही आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘हम तूम और वो’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले.

ch123656

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथनी’ या सिनेमांमधील भूमिकांनी लोकांची भूरळ घातली.

vinod khanna

(सर्व छायाचित्रे – एक्स्प्रेस आर्काइव्ह्ज )