दिवाळसणाच्या निमित्ताने अनेक बॉलिवूडकरांनी गेल्या काही दिवसांमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून पार्टीच्या निमित्ताने ही सर्व सेलिब्रिटी मंडळी एकत्र येतात. बॉलिवूडमधील ‘ए-लिस्टर्स’ कलाकारांच्या चाहत्यांनी त्यांच्या फॅनपेजवर पार्टींमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये एक खास व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. यात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ रणबीर कपूर ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘बोले चुडियाँ’ गाण्यावर नाचताना दिसतात.

दिवाळी २०१७ : ‘चिन्मय म्हणजे माझ्यासाठी फराळातला चिवडा’

रणबीरच्या फॅनपेजने शेअर केलेल्या या व्हिडिओत हा हरहुन्नरी अभिनेता मूळ गाण्यातील शाहरुखच्या डान्स स्टेप्स करताना दिसतो. तर शाहरुखनेही त्याला तशीच साथ दिल्याचे पाहायला मिळते.

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात रणबीर आणि शाहरुखने अवघ्या काही मिनिटांसाठी स्क्रिन शेअर केली होती. पण, व्हिडिओमधील त्यांची केमिस्ट्री पाहता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच त्यांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहायला आवडेल यात शंका नाही.

Aamir Khan’s Diwali bash PHOTOS : आमिर खानची ग्रॅण्ड दिवाळी पार्टी

दरम्यान, रणबीरच्या चुलत बहिणी करिष्मा कपूर आणि करिना कपूर खान यांच्यासोबतचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे. या सेल्फीमध्ये करिष्मा पाउट करताना दिसत असून, रणबीर आपल्या बहिणीच्या गालाचे चुंबन घेताना दिसतो. बॉलिवूडमधील कपूर कुटुंब हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा कोणताही सण असो हे कुटुंब नेहमीच एकत्र पाहावयास मिळते.

https://www.instagram.com/p/Bafb-WsHcbL/

हिंदी चित्रपटसृष्टीतील झक्कास अभिनेता अनिल कपूरनेही पार्टीचे आयोजन केलेले. या पार्टीतील एका व्हिडिओत ‘वीरे दी वेडिंग’ची गर्ल्स गँग पाहायला मिळते. स्वरा भास्कर, सोनम कपूर, करिना यात ‘चिटिया कलाइयाँ’ गाण्यावर थिरकताना दिसतात.

https://www.instagram.com/p/Bae9s2wndyd/

https://www.instagram.com/p/Baelqi4HrYa/