“यह फिल्म बनेगी, जरूर बनेगी…किसी बडे हिरो के बिना बनेगी…लेकिन गीता बाली के बिना… नहीं!”…एक अलबेला चित्रपटाच्या टीझरमध्ये हा डायलॉग आला आणि पडद्यावर विद्या बालनच्या रूपात शोला भडकला…हल्लीच एक अलबेलाचा टीझर लाँच सोहळा पार पडला आणि १९५१ चा काळ नजरेसमोर आला. या टीझरची हवा ताजी असतानाच विद्या बालनच्या हस्ते या चित्रपटाचे गाणे लाँच करण्यात आले आहे.
मुंबईत रंगलेल्या या सोहळ्यात भगवान दादांच्या भूमिकेत असलेला मंगेश देसाई आणि गीता बालीच्या भूमिकेतील विद्या बालन यांनी “शोला जो भडके, दिल मेरा धडके” या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. इतकेच नाही सर्वांनी वन्स मोअर म्हणत विद्या आणि मंगेशला पुन्हा एकदा नृत्य करण्याची विनंती केली.
मंगलमूर्ती फिल्मस् प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित एक अलबेला येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.