अभिनेता इम्रान हाश्मीची ओळख सीरियल किसर अशीच आहे. त्याची ही ओळख स्वतः तोही नाकारू शकत नाही. प्रत्येक सिनेमात तो असे सीन कसे देऊ शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. अभिनेत्री विद्या बालनने ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये इम्रानशीसंबंधित एक किस्सा सांगितला. या शोमध्ये विद्या अनेक विषयांवर मनसोक्त बोलली. अगदी इश्कियापासून ते डर्टी पिक्चरपर्यंत आणि व्यावसायिक आयुष्यापासून ते खासगी आयुष्यापर्यंत अनेक विषयांवर तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिला ऑनस्क्रिन किसिंगबाबात विचारले असता तिने अनेक किस्से सांगितले.

माधवनला केलेले किस आठवत नाही
विद्या बालनने सर्वात आधी ‘गुरू’ सिनेमात आर. माधवनला किस केले होते. पण त्याबद्दल तिला आता फारसं आठवत नाही. जेव्हा गुरू सिनेमात किसिंगचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि मी व्हीलचेअरवर बसले होते. आता त्यावेळी नेमके काय घडले मला फार आठवत नाही, असे विद्या म्हणाली.

https://www.instagram.com/p/BZ0H_KjltN_/

इम्रानला किस करण्यापूर्वी दडपण यायचं
‘घनचक्कर’ सिनेमात विद्या आणि इम्रान यांच्यात अनेक किसिंग सीन चित्रीत करण्यात आले होते. त्याबद्दलच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, किसिंगच्या प्रत्येक सीननंतर इम्रान मला कोणतातरी प्रश्न विचारायचा. सिद्धार्थ (सिद्धार्थ रॉय कपूर) हा किसिंगचा सीन पाहिल्यावर काय म्हणेल? अशा स्वरुपाचेही प्रश्न असायचे. बरेचवेळा त्याला हिच चिंता असायची की सिद्धार्थ काय विचार करत असेल आणि त्याचवेळी मला सीन झाल्यावर इम्रान काय प्रश्न विचारेल, याची चिंता वाटायची.

नसिरुद्दीन शाह यांची भीती वाटायची

अर्शदसोबत असलेल्या मैत्रीबद्दल विद्या म्हणाली, माझ्या आणि अर्शदच्या चांगल्या मैत्रीसाठी मी नसिरुद्दीन शाह यांनाच श्रेय देईन. कारण मी नसीर सरांना फार घाबरायचे. ‘इश्किया’च्या सेटवर नसीर यांना घाबरून मी अर्शदशी फार बोलायचे. कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायची इच्छा आहे, असा प्रश्न विचारल्यावर विद्याने रणबीर कपूरचे नाव घेतले.

https://www.instagram.com/p/BZxjRvHlmER/

श्रीदेवी खूप आवडते

विद्या म्हणाली, मला श्रीदेवी खूप आवडते. तिच्या ‘तुम्हारी सुलु’ चित्रपटामध्ये श्रीदेवीच्या ‘हवाहवाई’ गाण्याला रिक्रिएट केले गेले. याबद्दल दिग्दर्शक सुरेश त्रिवेणींकडून कळल्यावर तिच्यावर दडपण आले होते. श्रीदेवींच्या त्या गाण्याला आपण योग्य न्याय देऊ शकणार नाही, असे तिला वाटत होते. पण दिग्दर्शकाने मनधरणी केल्यानंतर विद्याने गाणे करण्यास सहमती दर्शवली.