‘बेगम जान’ या सिनेमात आपल्या हरहुन्नरी अभिनयाने विद्या अनेकांची मनं जिंकत असली तरी पाकिस्तानी प्रेक्षकांचे मन जिंकायची संधी कदाचित तिला मिळणार नाही, अशीच चिन्हं सध्या दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बेगम जान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली सिनेमाचा ‘बेगम जान’ हा हिंदी व्हर्जन आहे. भारत- पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा बेतला आहे. फाळणीच्या कथेमुळेच हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगताना दिसत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जावा यासाठी ‘बेगम जान’ सिनेमाचे निर्माते महेश भट्ट यांनी पाकिस्तानी सरकारला पत्र लिहिले आहे. पण अजून त्यांना या संदर्भात कोणतेही उत्तर आलेले नाही.

या सिनेमात विद्या देहव्यापार करणाऱ्या एका कुंटणखान्याची मालकीण दाखवण्यात आली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विद्या शिवीगाळ करतानाही दिसते. शिव्या देताना तुला फार अवघडल्यासारखं झालं होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना विद्या सहज हसून म्हणाली की, ‘नाही माझ्यात अजिबात अवघडलेपण नव्हतं. कारण मी रोज शिव्या देते. यानंतर नाही मी असं कधीच करत नाही असंही तिने स्पष्ट केले. मी समाजशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे भारतातील देहविक्रीशी निगडीत समस्यांबद्दल मला माहिती आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मी त्यांच्या समस्या अधिक जवळून पाहिल्या, त्यांचे कष्ट समजून घेतले. कोणाचेही शारीरिक शोषण करणं, देहविक्री करणं हे कधीही सोपं असू शकत नाही. या सगळ्याचीच मला चीड यायची. हा राग मी सिनेमातून व्यक्त केला आहे.’

स्त्री-प्रधान सिनेमांबद्दल बोलताना विद्या म्हणाली की, ‘मला प्रत्येक सिनेमात वेगवेगळी भूमिका करायला अधिक आवडतं. या सिनेमासाठी मला फार काही वेगळी तयारी करावी लागली नाही. दिग्दर्शक श्रीजितला कशा पद्धतीने हा सिनेमा बनवायचा आहे हे आधीपासूनच ठरले होते.’

 

'बेगम जान'
‘बेगम जान’

begum-jaan-759

begum-jaan-8

begum-jaan-9