सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत दीपिका पदुकोनच्याच नावाची  चर्चा सुरु आहे. ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका चर्चेत आहे. पण, दीपिकासोबतच अाणखी एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिनेता विन डिझेलचे. या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने भारतात आलेल्या हॉलिवूडच्या या अॅक्शन स्टारसाठी बॉलिवूडविश्व आणि खुद्द दीपिकाही सज्ज झाली आहे. विन डिझेल भारत दौऱ्यावर आला असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.