साऊथ सुपरस्टार धनुष आणि काजोल यांचा बहुचर्चित तामिळ सिनेमा व्हीआयपी २ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धनुष आणि काजोलने रविवारी रात्री सिनेमाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या सिनेमाच्या माध्यमातून सुमारे २० वर्षांनंतर काजोल तामिळ सिनेमात परत एकदा काम करत आहे. याआधी १९९७ मध्ये आलेल्या मिनसारा कनवू या सिनेमात काजोलने काम केले होते. व्हीआयपी २ सिनेमाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, अडीच मिनिटांचा हा ट्रेलर फारच मजेशीर आहे.

तानाजी गलगुंडेला जॅकपॉट, लवकरच दिसणार हिंदी टिव्ही शोमध्ये

यात धनुष इंजीनिअर रघुवरन आणि काजोल एका कॉर्पोरेट कंपनीची मालकीण वसुंधरा दाखण्यात आली आहे. धनुष, काजोल आणि सिनेमाच्या टीमने व्हिआयपी २ चा ट्रेलर रविवारी मुंबईमध्ये ऑडिओ लॉन्चच्यावेळी प्रदर्शित केला. २०१४ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या व्हीआयपी सिनेमाचा हा सिक्वल आहे.

vip-2

vip-2-launch

vip-2-launch-2

vip-2-launch-3

vip-2-launch-4

या ट्रेलरमध्ये धनुषची रघुवरन ही व्यक्तिरेखा एका मजेशीर स्वरूपात दाखवण्यात आली आहे. त्याला एका बेरोजगार मुलाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. व्हीआयपी सिनेमाचा पुढचा भाग दाखवण्यात आला असल्यामुळे त्याला बेरोजगार दाखवणे साहजिकच आहे. ट्रेलर पाहून हे स्पष्ट कळतं की हा सिनेमा काजोल आणि धनुष यांच्यातील मतभेदांवर आधारित आहे.

सौंदर्या रजनीकांत हिने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. २८ जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात धनुष आणि काजोलसह अमला पॉल, समुथिराकनी आणि विवेक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती धनुषच्या प्रोडक्शन हाऊसकडूनच करण्यात आली आहे.