लास वेगासमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने त्यांच्या ‘ब्लेड रनर २०४९’ या चित्रपटाचा रेड कार्पेट प्रीमियर रद्द करण्याचा निर्णय घेतला. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या गोळीबारात जवळपास ५९ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५०० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

वाचा : …नाहीतर मी तुम्हाला मारेन, ऋषी कपूर यांची पत्रकारांना धमकी

स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, काल रात्री झालेल्या दुःखद घटनेमुळे वॉर्नर पिक्चर्स, सोनी पिक्चर्स आणि एल्कॉन एण्टरटेनमेन्टने ‘ब्लेड रनर २०४९’ चा रेड कार्पेट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांसाठी आम्हाला दुःख असून, आम्ही देवाकडे परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो. याआधी ओपन रोड फिल्म्सने ‘मार्शल’चा रेड कार्पेट प्रीमियर रद्द केला.

वाचा : घरगुती हिंसाचार प्रकरणी लिएँडर पेसच्या अडचणीत वाढ

डेनिस विलेनॉवेचे दिग्दर्शन असलेल्या ‘ब्लेड रनर २०४९’ मध्ये रेयान गोसलिंग आणि हॅरीसन फोर्ड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या रीडले स्कॉटच्या ‘ब्लेड रनर’ या सायन्स फिक्शन चित्रपटाचा हा सिक्वल आहे. तब्बल ३५ वर्षानंतर हा सिक्वल येत आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा केवळ निर्मिती खर्च २१५ कोटी रुपये इतका असल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे.