बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळानंतर थरारक आणि रहस्यमय असा चित्रपट येऊ घातला आहे. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’ चित्रपटाचा ट्रेलर अंगावर अक्षरशः काटा आणणारा होता. त्यानंतर चित्रपटकर्त्यांनी आता ‘रात बाकी बात बाकी’ या जुन्या गाण्याचे रिहॅश व्हर्जन प्रदर्शित केलेय. ‘इत्तेफाक से (रात बाकी)’ हे गाणे मूळ गाण्याशी साम्य असणारे असले तरी गाण्याचे काही बोल बदलण्यात आले आहेत.

वाचा : उर्मिलाचे डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

सध्याच्या घडीला ‘रिहॅश’ गाण्यांचा बादशहा असलेल्या जुबिन नौतियाल याने हे गाणे गायले आहे. ‘सोचा है’ ( ‘कह दू तुम्हे’ रिमेक), ‘द हम्मा’ गाणे ( एआर रेहमानचे ‘हम्मा हम्मा’ मूळ गाणे) गायल्यानंतर जुबिन पुन्हा एकदा संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करण्यासाठी परतला आहे. त्याला या गाण्यात निकिता गांधी हिने साथ दिली आहे.

वाचा : रेखा बिग बींच्या नातीला भेटतात तेव्हा…

‘इत्तेफाक से’ गाणे सुरु होताच तुम्हाला १९८२ साली आलेल्या ‘नमक हलाल’मधील मूळ गाण्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. मूळ गाण्याला न्याय देण्याचा बराचसा प्रयत्न यात करण्यात आला असला तरी जुन्या गाण्याला टक्कर देणे आताच्या संगीतकारांना फारसे जमलेले नाही असेच दिसून येते. अखेर ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते चुकीचे नाही. गाण्यातील सोनाक्षी, सिद्धार्थ आणि अक्षयचा ऑनस्क्रिन ड्रामा मात्र लक्षवेधक ठरतो.

अभय चोप्रा दिग्दर्शित क्राइम ड्रामा असलेला ‘इत्तेफाक’ चित्रपट ३ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.