क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या आत्मचरित्रपटात पत्नी साक्षी धोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कियाराने धोनीसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, नुकतंच तिला बी-टाऊनच्या एका सेलिब्रिटीसोबत लंच डेटला जाताना पाहिलं गेलं. त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. आदित्य पांचोलीचा मुलगा आणि अभिनेता सूरज पांचोली आणि कियाराला एकत्र पाहिलं गेलं. मुंबईतल्या एका रेस्तराँमध्ये हे दोघे लंच डेटला गेले होते. त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, याचीच चर्चा बी-टाऊनमध्ये होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेस्तराँमध्ये जाताना हे दोघे माध्यमांच्या कॅमेरामध्ये टिपले गेले. कियारा आणि सूरज यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसले. कियाराने गुलाबी रंगाचा जंपसूट घातलेला तर सूरज ब्लॅक लोअर आणि ब्ल्यू टी शर्टमध्ये होता. यापूर्वी देखील कियारा आणि सूरजला लंच आणि कॉफी डेटला जाताना पाहिलं गेलं. त्यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘एम.एस. धोनी’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेनंतर कियारा प्रसिद्धीच्या झोतात आली. तर सूरजने ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघे एका चित्रपटात स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. सध्या तरी बी-टाऊनमध्ये कधी कोणाचे कोणाशी सूर जुळेल याचा काही नेम नाही, असंच म्हणावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is brewing between m s dhoni onscreen wife kiara advani and sooraj pancholi
First published on: 17-10-2017 at 15:04 IST