एखाद्यासोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जेव्हा अचानक कधी त्याचा सामना होतो, तेव्हा अनेकदा दोघांमध्ये संकोचलेपणा जाणवतो. असंच काहीसं अभिनेत्री बिपाशा बासू आणि हरमन बावेजासोबत झालं. काही वर्षांपूर्वी बिपाशा आणि हरमन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांना अनेक वेळा, अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं होतं. दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर रिलेशनशिपचा स्वीकारही केला होता. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केलं. दिवाळीच्या निमित्ताने सेलिब्रिटींच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. अशाच एका पार्टीमध्ये बिपाशा आणि हरमन आमनेसामने आले. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील संकोचलेपणा स्पष्ट दिसत होता.

पहिला किस्सा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकता कपूरने तिच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. यावेळी करण सिंग ग्रोवरसोबत बिपाशानेही हजेरी लावली होती. अचानक हरमन आणि बिपाशा एकमेकांसमोर आले. या भेटीत दोघेही ना एकमेकांशी बोलले ना शुभेच्छा दिल्या. इतक्यात करणने बिपाशाला तेथून नेलं.

Mumbai Pune Mumbai 3: मुक्ता- स्वप्निलचा प्रवास सुरूच

दुसरा किस्सा
एकता कपूरच्या पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा हे दोघे एकमेकांसमोर आले. शिल्पा शेट्टीच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमधील ही घटना आहे. मात्र यावेळी हरमनने बिपाशाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. दोघांनी एकमेकांशी बोलण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी त्यांच्यामधील संकोचलेपणा यावेळीदेखील लपला नव्हता.