अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा ठोठावून तुरुंगाबाहेर आलेला अभिनेता संजय दत्त याचा ‘भूमी’ चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातून संजूबाबाने बॉलिवूमध्ये पुनरागमन केले. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच समीक्षक आणि प्रेक्षकांनी मात्र संजयच्या कामाची प्रशंसा केलीय.

वाचा : जाणून घ्या, ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘न्यूटन’ची पहिल्या दिवसाची कमाई

जवळपास तीन वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण करणाऱ्या संजूबाबाने चित्रपटाच्या प्रसिद्धीत कोणतीच कसर बाकी ठेवली नव्हती. त्याने विविध चॅट शो आणि कार्यक्रमांना उपस्थिती लावत अनेक मुलाखती दिल्या. यापैकीच एक चॅट शो म्हणजे डॉ. संकेत भोसलेचा ‘बाबा की चौकी’. शाहरुख खान संकटात असताना त्याने संजूबाबाची मदत मागितली होती या घटनेची आठवण संकेतने यावेळी करून दिली. याबद्दल संजयला मुलाखतीत विचारण्यात आले असता तो म्हणाला की, बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. मला आता नीट आठवतसुद्धा नाही. शाहरुख या क्षेत्रात नवीनच होता. तेव्हा, तुला कधीही गरज लागल्यास मला सांग. मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. तू एकटा नाहीयेस. मी तुझ्या भावासारखा आहे, असे मी त्याला म्हटले होते.

पुढे संजूबाबा म्हणाला की, शाहरुखची एक चांगली गोष्ट म्हणजे तो हे सगळं विसरलेला नाही. खरंतर मी त्याच्यासाठी खास काही केले नव्हते. पण, आजही त्याला याची जाणीव असून तो मला इज्जत देतो. धन्यवाद.

वाचा : बिकिनीतील फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला नेटिझन्सनी दिला पोट कमी करण्याचा सल्ला

बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकारांना त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपकारांची जाणीव असल्याचे दिसून येते. संजूबाबाने केलेले हे वक्तव्य पाहता शाहरुख खऱ्या अर्थाने मनावर राज्य करणारा बादशहा आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.