पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर झालेली अभिनेत्री सनी लिओनी हिने तिच्याबाबतीत पसरलेल्या एका अफवेला चक्क चुंबनदृश्याने प्रत्युत्तर दिले आहे. सनी लिओनी चित्रपटासाठी करार करतेवेळी चित्रपटात चुंबनदृश्य करणार नाही, अशी अट ठेवत असल्याची अफवा बॉलीवूड वर्तुळात पसरली होती. ही चर्चा खोडून काढण्यासाठी सनीने आपला पती डॅनियल वेबरचे चुंबन घेतानाचे छायाचित्र इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, ‘कोण म्हणतं मी कॅमेरासमोर चुंबनदृश्य देत नाही’, असा खोचक सवाल उपस्थित करून टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.

सनी लिओनी बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ‘मस्तिजादे’, ‘क्या कूल है हम ३’ आणि तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘वन नाईट स्टँड’ या सर्व चित्रपटात सनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. पण चित्रपटाचा करार करतेवेळी आपण चित्रपटात एकही चुंबनदृश्य करणार नाही, अशी अट सनी ठेवत असल्याची चर्चा पसरली होती. याशिवाय, ‘सनी’चे प्रदर्शित झालेल्या बॉलीवूडपटांमध्ये तीने एकही चुंबनदृश्य दिलेले नाही. त्यामुळे या चर्चेला आणखी पेव फुटले होते. अखेर सनीने आपल्या बोल्ड अंदाजात प्रत्युत्तर देऊन अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Who said I don't kiss on camera?!?!?! @dirrty99

A photo posted by Sunny Leone (@sunnyleone) on