तुम्हाला आठवतंय का जेव्हा अनुराग कश्यपने अर्जुनवर त्याला आवडणाऱ्या मुलीला त्याच्यापासून दूर करण्याचा आरोप केला होता. त्यावर अर्जुनने हे सगळे कश्यपच्या मनाचे खेळ आहेत असे उत्तरही त्याने दिले होते.

याआधी कश्यपने स्पष्ट केले होते की, ‘मला एक मुलगी आवडायची, पण दुसऱ्याच दिवशी अर्जुन तिला डेट करताना दिसला. तेव्हा मला खूप राग आला. मग खूप वर्षांनी जेव्हा दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मला सांगितले की, मस्त (१९९९) सिनेमासाठी तो अर्जुनला घेण्याच्या विचारात आहे, तेव्हा मी रामूला सांगितले की तो एक खराब अभिनेता आहे. त्यामुळे या सिनेमातून अर्जुनचे नाव वगळून आफताब शिवदासानीला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कश्यप म्हणाला की, आम्ही नेहमीच त्याचा तिरस्कार करायचो. कारण तो नेहमीच आम्हाला आवडणाऱ्या मुलींना आमच्यापासून दूर करायचा.’

अनुराग कश्यपने अर्जुनवर केलेले हे आरोप खरे आहेत का हे विचारण्यासाठी अर्जुनशी संपर्क साधला असता तो म्हणाला की, ‘जर मी स्वतः मुलगी असतो तर मीही तेच केले असते.’

हा सर्व प्रकार समजवताना अर्जुन म्हणाला की, ‘तो ज्या मुलीला डेट करत होता ती मिरांडाची होती. तेव्हाच कश्यपलाही ती मुलगी आवडायला लागली. त्याने स्वतःच डोक्यात ठरवले होते की तो त्या मुलीला डेट करत आहे. त्यामुळे मी तिला त्याच्यापासून दूर केले असे त्याला वाटत होते.
नंतर तो म्हणाला की, त्यानंतर कश्यपने अशा पद्धतीचे सिनेमे बनवायला सुरुवात केली. पण त्याने माझ्या विरोधात जे काही केले ते माझ्यासाठी चांगलेच झाले. कारण मला कधीच मस्त सिनेमात काम करायचे नव्हते. देव त्याचे कल्याण करो. त्याच्यासोबत असे परत होऊ नये असेच मला वाटते. भविष्यात मी कोणाला डेट करण्यापूर्वी त्याला फोन करुन नक्की विचारेन की त्यालाही ती मुलगी आवडते का ते…’