‘xXx रिटर्न ऑफ द झेंडर केज’ या चित्रटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पदुकोण सध्या चांगलीच चर्चेत आहे. भारतामध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेला तिचा पहिला हॉलिवूडपट नुकताच जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दरम्यान या चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेचे सर्वस्तरावर कौतुक होताना दिसत आहे. भारतामध्ये दीपिकाने ‘xXx रिटर्न ऑफ द झेंडर केज’ या चित्रपटाचे अनेक कार्यक्रमातून प्रसिद्धी केल्याचे पाहायला मिळाले. या पद्धतीचा दीपिकाने अमेरिकेत देखील प्रयोग केला. अमेरिकेतील लोकप्रिय चॅटशोमध्ये सहभागी होऊन तिने आपल्या अॅक्शनपटाची प्रसिद्धी केली. अमेरिकेतील चॅट शोमध्ये दीपिकाने तिचा बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास सांगितला.

बॉलिवूडमध्ये जवळ जवळ ३० चित्रपट केल्यानंतर ती हॉलिवूडमध्ये झळकली आहे. अमेरिकेतील एका चॅट शोमध्ये दीपिकाला हॉलिवूड आणि बॉलिवूड या दोन चित्रपटसृष्टीतील फरक विचारण्यात आला होता. यावर दीपिका म्हणाली की, मला इकडचे लोक ओळखत नाहीत. त्यामुळे चित्रपटात काम करताना फारसा दबाव नव्हता. बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीत काहीच फरक नसल्याचे वाटते, असेही दीपिका म्हणाली. यावेळी दीपिकाने हॉलिवूड चित्रपटामध्ये अपयश आलेल्या आठवणींना उजाळा दिला. यासंदर्भात तिने ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या चित्रपटाचा अनुभव कथन केला. विन डिझेल झळकलेल्या या चित्रपटासाठी देखील दीपिकाने ऑडिशन दिले होते. मात्र तिला या चित्रपटामध्ये संधी मिळाली नव्हती, असे दीपिका म्हणाली.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Jawan director atlee failed ranveer singh with his super dancing skills
Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी

मात्र ‘xXx रिटर्न ऑफ द झेंडर केज’ या चित्रपटामध्ये ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’मुळेच संधी मिळाल्याचे दीपिकाने सांगितले. ‘xXx रिटर्न ऑफ द झेंडर केज’च्या निर्मात्यांना माझी आणि विनची केमिस्ट्री चांगली वाटली, त्यामुळेच तिला संधी मिळाल्याचे देखील दीपिकाला वाटते.तिने चित्रपटातील अॅक्शन दृष्यावर देखील भाष्य केले. माझ्या कुटुंबात खेळाचा वारसा असल्याचा मला अॅक्शन दृष्ये करण्यामध्ये फायदा झाल्याचे दीपिका म्हणाली. यावेळी तिने शालेयस्तरापासून बॅडमिंटनमध्ये घाम गाळल्याचे किस्से देखील शेअर केले. दीपिका पदुकोणचे वडिल प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत.

या चॅटशोमध्ये सहभागी होण्यापूर्वी दीपिका तिच्या हॉलिवूडमधील पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाछी ‘द लेट लेट शो’ मध्ये देखील दिसली होती. या चॅट कार्यक्रमामध्ये दीपिकाने सूत्रसंचालक जेम्स कॉर्डनला बॉलिवूड नृत्याचे धडे दिल्याचे पाहायला मिळाले होते. जेम्सला जॅकेट परिधान करण्याची नवी शैली शिकवून तिने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स..’ या गाण्यावर थिरकायला लावले होते.