बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी २० जानेवारी रोजी झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन , मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान चित्रपट रसिकांसाठी असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार प़डले. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

‘साहित्यासोबतच चित्रपटदेखील आपले जीवन समृद्ध करत असतो. आयुष्य जवळून पाहण्याची संधी चित्रपट महोत्सव देत असतात. म्हणूनच चित्रपट महोत्सव आवश्यक असतात. या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माझा गौरव करण्यात आला हा मी माझा सन्मान समजतो. मराठी चित्रपट गेल्या काही वर्षात सर्वांगाने प्रगल्भ झालेला आहे,’ असे अभिनेते पंकज कपूर म्हणाले.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

यावर्षी `स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे व्याख्याते म्हणून असणार आहेत. स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘’मी सिनेमाकडे कसा पाहतो’’ या विषयावर व्याख्यान दिले जाणार आहे.

२२ जानेवारी २०१७ रोजी , सायंकाळी ५.०० वाजता यशवंत चव्हाण सेंटरमध्ये हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यान सर्वांसाठी विनामुल्य ठेवण्यात आले आहे. जास्ती जास्त चित्रपट रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी केले आहे.

दरम्यान, ‘मी चित्रपट फारसे पाहत नाही. पण पंकज कपूरसारखे कलाकार चित्रपटांना वेगळी परिभाषा देतात. असे चित्रपट महोत्सव होणे आवश्यक आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू लोकांची चित्रपटाविषयीचे ज्ञान परिपूर्ण करण्याच काम यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या ७ वर्षांपासून करत आहे.’ अशा शब्दात शरद पवारांनी महोत्सवाचे कौतुक केले होते.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ महोत्सवाचे यंदा ‘७ वे’ वर्ष आहे. या महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते. आतापर्यंत अनुपम खेर, वहिदा रेहमान यांसारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.