नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक सेलिब्रेटी जोडी वेगळी होणार असल्याचे वृत्त आहे. ‘रोडीज्’ फेम रघु राम आणि अभिनेत्री सुगंधा हे आता विभक्त होणार आहेत. जवळपास लग्नाला १० वर्ष उलटल्यानंतर या जोडप्याने स्वखुशीने वेगळ होण्याचा निर्णय घेतलाय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बातमीला सुगंधाने स्वतः दुजोरा दिलाय. यासंदर्भात सुगंधाशी फोनवर बातचीत करण्यात आली होती. या दोघांमध्ये विभक्त होण्याविषयी कोणतेही मतभेद नसून ते समन्वयाने वेगळे होत आहेत. रघु आणि सुगंधाला कामामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे एकमेकांपासून विभक्त होणे हा त्यांना योग्य पर्याय वाटला. विभक्त होण्यामागे अजून वेगळे काही कारण आहे का? असे सुगंधाला विचारले असता तिने आपण व्यस्त असल्याचे सांगत फोन ठेवला.