आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या बराच चर्चेत आहे. या सिनेमात सनी लिओनी व इमरान हाश्मीची जाेडी एकत्र दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक विशिष्ट पर्वणीच असेल.

नुकताच ट्विटर चॅट दरम्यान त्या दोघांनी सिनेमातील ‘पिया मोरे’ या दुसऱ्या गाण्याचे नाव उघड केले. पण त्याआधी त्यांच्यात काही शाब्दिक देवाणघेवाण झाली. ”मी आणि लाज कधीच एकत्र येऊ शकत नाही, हे तुम्हाला मान्य आहे का? असे इमरानने लिहीले” त्याला लगेचच उत्तर देत सनी म्हणाली, ”तू निश्चितच भोळसट नाहीस” असे तिने लिहिले आहे.