‘यो के हुआ ब्रो’ ही नवी वेबसीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हरयानासारख्या पुरूषप्रधान राज्यात घडलेली ही कथा या वेबसीरिजमार्फत दाखवण्यात आली आहे. दोन मित्र जे मुलींना डेट करणं, मजा करणं यामध्ये इतके गुंतलेले असतात की त्यांना या सगळ्यात आपण कधीतरी अडकू शकतो याचं भानदेखील राहत नाही. अखेर संकटात पडल्यावर त्यांच्यावर ‘यो के हुआ ब्रो’ म्हणण्याची वेळ येते.

वाचा : बॉलिवूडमधून अचानक गायब झालेली फाल्गुनी नवरात्रीत कमवते कोट्यवधी रुपये

‘दंगल’ फेम अपारशक्ति खुराना, गौरव पांडे, शमिता शेट्टी आणि ‘बहु हमारी रजनीकांत’ फेम रिधिमा पंडित या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. या सर्वांच्या गोंधळामध्ये आणखी भर पाडणाऱ्या पोलिसाच्या भूमिकेत सुमित व्यास दिसणार आहे. ही एक सुपर कॉमेडी वेबसीरिज आहे.

वाचा : हे संवाद ऐकल्यावर ‘पार्टीशन १९४७’ चित्रपट पाहण्यास तुम्हीही व्हाल प्रवृत्त

‘पियुशची भूमिका मी साकारतोय. त्याची व महेंद्रची म्हणजेच गौरव पांडे यांची घट्ट मैत्री आहे. एक वेगळा विषय असल्यामुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांना नक्की आवडेल,’ असे अपारशक्ती खुराना याने सांगितले. ”यो के हुआ ब्रो’ ही माझी पहिली वेबसीरिज आहे. सेन्स ऑफ ह्युमर असलेली ही सीरिज करताना मला नक्कीच खूप मजा आली. सुमन ही व्यक्तिरेखा मी साकारली असून, प्रेक्षकांनाही ही भूमिका नक्की आवडले,’ असे शमिता शेट्टीने सांगितले. अशी ही कॉमेडी, फ्रेंडशिप, ब्रोमान्स, देसी अंदाजमधील वेबसीरिज १८ ऑगस्टपासून वूट या अॅपवर पाहता येणार आहे.