तरुणाईत आपल्या कुल लूकसाठी प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध रॅपर हनी सिंग आता बराच बदलला आहे. हनी सिंगने त्याचा नवा लूक फेसबुक या सोशल साइटवर प्रसिद्ध केला असून त्याच्या चाहत्यांना तो कितपत आवडेल याबाबत शंकाच आहे.
हनी सिंगने शेयर केलेल्या फोटोत त्याचे वजन बरेच वाढलेले दिसते. तसेच त्याने आता दाढी मिशाही ठेवल्या आहेत. हनी सिंगचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना थक्क करणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून हिट रॅपर म्हणून प्रसिद्धीस आलेला हनी सिंग अचानक लाइमलाइटपासून दूर गेला होता. त्या दरम्यान त्याच्याविषयी अनेक बातम्या समोर आल्या. तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचीही चर्चा होती. पण आता हनी सिंगने परतत आपण बायपोलर डिसऑर्डर आणि तणावाचे शिकार झाल्याचे सांगितले. यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही पुनर्वसन केंद्रात न जाता तो आपल्या घरीच उपचार घेत होता.
‘लुंगी डान्स’, ‘पार्टी विथ द भूतनाथ’, ‘धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना’ रिमेक, ‘राणी तू में राजा’, ‘आइस क्राइम खाउंगी’ यांसारखी अनेक गाणी हनी सिंगने गायली आहेत.

All set to rock lucknow👍🏻 #seeyouallthere #loveforlucknow #yoyoinlucknow #yoyohoneysingh #loveyouall #keepblessing

A photo posted by Yo Yo Honey Singh (@yyhsofficial) on