शहराच्या गर्दीत आणि गडबडीत निसर्ग सौंदर्य, फॅमिली सोबत वेळ घालावणे, सिनेमा, नाटक पाहणे, छंद जोपासणे यांचा कधीच ताळमेळ बसत नाही. या इण्टरनेट, प्रगती, जागतिकीकरणाच्या वेगवान युगात माणूस आपले माणूसपण हरवत चालला आहे. त्याच्याकडे साध्या गोष्टींसाठी वेळ नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. चुलीवरची चवदार भाजी भाकरी, कालवण सुकी मासळी तोंडी लावण. गुरगुट्या भात त्यावर लाल वाटणाचे सार असे काहीसे खाण्याचा कितीही मोह झाला तरीही शहरात जागोजागी बनलेल्या गावाच्या आठवणीतले जेवण फिकचे असते.

शहरातील जेवणात गावाची चव कधीच मिळत नाही त्यासाठी शहरातील ताणतणावापासून दूर गावी जाऊन निवांत आराम करणे हा एकच राजमार्ग असतो. पण प्रत्येकाच्या नशिबात हे असतेच असे नाही. पण सध्या झी युवा या वाहिनीवरील दोन मालिकांमधील कलाकारांच्या नशिबात हा अनुभव आला आहे आणि त्यामुळे रोजच्या सेट पासून थोडा हटके निसर्गरम्य अशा वातावरणात सध्या यांचे मालिकेचे चित्रिकरण सुरु आहे.

‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत सर्व कलाकार नागपूरला आले आहेत. विषय आहे विनयचा साखरपुडा. या साखरपुड्यासाठी सगळेच सध्या विनयच्या गावी नागपूरला दोन कार घेऊन आणि लाँग ड्राईव्हची मजा घेत आले आहेत. आता नागपूरला ‘लव्ह लग्न लोचा’ मधील कलाकार किती रमतात, तिथे काय काय मजा होते आणि मुख्य म्हणजे विनयचा साखरपुडा होतो का? ही सर्व धमाल अनुभवायची असेल तर पाहात राहा झी युवावर ‘लव्ह लग्न लोचा’, सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८:३० वाजता!

‘फ्रेशर्स’ मालिकेतसुद्धा सध्या नाशिकला जाण्याचा प्लॅन सुरु आहे. पुढील भागात अशी एक गोष्ट होते कि पहिला सायलीला आणि तिच्या पाठोपाठ संपूर्ण ‘फ्रेशर्स’च्या टीमला नाशिकला जावे लागते. ‘फ्रेशर्स’ची टीमसुद्धा बऱ्याच काळानंतर त्यांच्या कॉलेजच्या सेटवरून बाहेर पडून निसर्गाचा आणि नाशिककरांचा अनुभव घेणार आहेत. आता नाशिकमध्ये जाऊन ‘फ्रेशर्स’ची टीम नक्की काय मजा करणार आहे हे पुढच्या काही भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेलच. झी युवावर ‘फ्रेशर्स’ सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ७:०० वाजता पाहायला मिळेल.