पुण्यातल्या नाट्यसृष्टीचे माहेरघर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. या नाट्यगृहांमध्ये नाटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक कलाकारांना नाट्यप्रयोग करणे फार कठीण जात आहे. नुकतंच अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केले आहे.

विशाखा सुभेदार हिने नुकतंच फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बालगंधर्व नाट्यगृहाच्या अवस्थेबद्दल भाष्य केले आहे. नुकतंच तिच्या कुर्रर्रर्रर्र या नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी तिने सविस्तर एक पोस्ट केली आहे. यावरुन हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

विशाखा सुभेदारची फेसबुक पोस्ट

“बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे ला ” कुर्रर्रर्रर्र “चा प्रयोग झाला. सातत्याने गंधर्व बद्दल बातम्या कानावर येत आहेत.. बांधकाम करायचं आहे.. पण म्हणून आत्ता जे नाटका साठी वापरात येत आहेत त्याची काळजी घ्यायला नको का?

बालगंधर्व.. जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो. मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आरसे डागळलेले.. Makeup box ठेवायला त्या खालचा कट्टा जेमतेम, बसायला “खुर्च्या” नुसत्या म्हणायला.. चारपाय आणि बुड टेकायला एक फळी प्लास्टिक ची इतकीच तीची खुर्ची म्हणून ओळख.. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था.. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही..

आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणारंच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत…? बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते.प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची.काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत…!

आणि ac ची सोय.. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं…इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बर ह्याबद्दल तक्रार करावी तर, तर तिथले कर्मचारी म्हणतात.. कीं तो स्लोच आहे.. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय.

श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ…timming साधायच, कपडे बदल, ही तारेवरची कसरत असते.. घामामुळे कपडे चिकटलेले असतात.. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंग ची वेळ बदलते.. अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही. वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा. भाडे मात्र नीट आकारलं जातं.” असे तिने म्हटले आहे.

“आण्णाभाऊ साठे.

तिथेही तेच..अस्वच्छ बाथरूम, अंधारलेले भकास green रूम..,AC ची बोंब, आणि तिथेले स्पीकर गायब झालेले.. थिएटरचे स्पीकर चोरीला गेले.. त्यामुळे त्याचा भुर्दंड पुनः कंपनीला.

Lights ची सोय फक्त एकाच पट्टी मधले ले lights चालू स्थितीत… बाकी नाहितच.प्रयोगनंतर जेवायला घेतो आम्ही अहो.. साधं बसायला खुर्च्या नसतात.. जिथे जेवायला घेणार तिथे मोडक्या लाकडी फळ्या एकावर एक टाकलेल्या.. त्यावर बसायला गेलो तर कुल्ले सोलवटुन निघतील. काहीच सोय नाही. आणि सगळ्या तुटक्या मोडक्या, गायब सोयीसाठी साठी भाडं मागितलं जातं.

अतिशय निंदनीय आहेत. आपली परंपरा टिकविण्यासाठी. रंगभूमी टिकून राहावी, थोडेच पैसे मिळवावे म्हणून, म्हणून आम्ही सगळे कलाकार जीवाचं रान करतो. मग तिथले व्यवस्थापक, जे आहे त्याची डागडुजी करून का घेत नाहीत..आहे, ते जपत का नाही?

जाऊ दे, आत्ता काय मोडायचं आहे. म्हणून दुर्लक्ष करणारी कर्मचारीं मंडळी. ह्या सगळ्याच काय करायचं? आत्ता कोकण गोवा दौरा केला.. मग त्यामानाने तिथली अवस्था बरी आहे. उन्हाळा कडक आहे यंदा .हे उत्तर मात्र सगळीकडे सारखंच”, अशी पोस्ट विशाखा सुभेदारने केली आहे.

विशाखा सुभेदारने केलेल्या या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी कमेंट करत याबाबत पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री आणि निर्मात्या मुग्धा गोडबोले हिने संताप. चीड, अशी कमेंट केली आहे. गडकरी रंगायतनच्या सिटिंग ॲरेंजमेंटही अत्यंत अन् कम्फर्टेबल आहेत. मी त्यामुळे रंगायतनला जाणं कटाक्षाने टाळतो. हीच सेम तक्रार माझी बालगंधर्व बाबत आहे, असेही एकाने म्हटले आहे.