कमल हासन हे नाव आता कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेले नाही. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळते. ते बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकेच लोकप्रिय आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ‘सदमा’,’चाची 420′ असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या प्रयोगशील अभिनयाने एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. लवकरच कमल हासन यांचा विक्रम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटातील एका गाण्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

कमल हासन यांचा बहुचर्चित विक्रम हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले. ‘पत्थला पत्थाला (pathala patthala) असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे कमल हासन यांनी लिहिले असून अनिरुद्ध रविचंदर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मात्र याच गाण्यामुळे कमल हासन अडचणीत सापडले आहेत. ‘पत्थला पत्थाला (pathala patthala) गाण्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gautami Deshpande post about electricity
“निवडणुका चालू झाल्या ना”, गौतमी देशपांडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मज्जा आहे नाही…”
actress Mumtaz visits Pakistan
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर
A fan of Shiv Thakare got a tattoo on his hand video viral
Video: “आपल्या आई-वडिलांशिवाय…”, चाहत्याने हातावर काढलेला टॅटू पाहून शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…
While playing the role of Arundhati, Madhurani Prabhulkar find out a new these in herself
अरुंधतीची भूमिका करताना मधुराणी प्रभुलकरला स्वतःमधल्या ‘या’ नव्या गोष्टीचा लागला शोध, म्हणाली…

कोठारे कुटुंबात बिनसलंच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, उर्मिला कोठारेने आदिनाथसोबत फोटो शेअर करत दिले स्पष्टीकरण

नेमकं प्रकरण काय?

विक्रम या चित्रपटातील ‘पत्थला पत्थाला (pathala patthala) या गाण्याचे बोल वादग्रस्त आहेत. यामुळे केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली जात आहे. तसेच यामुळे लोकांमध्ये फूटही निर्माण होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सेल्वम यांनी केला आहे.

त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करुन ते काढून टाकावे, अशी विनंती त्या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. या प्रकरणी कमल हासन यांच्याविरोधात चेन्नई येथील पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सेल्वम यांनी केलेल्या पोलीस तक्रारीवर काहीही कारवाई न झाल्यास त्यांनी ‘विक्रम’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे.

“माझ्या आयुष्यातील…” म्हणत राणादाने दिल्या पाठकबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अक्षया देवधरची कमेंट चर्चेत

सध्या हे गाणे टॉप ट्रेंडीगमध्ये पाहायला मिळत आहेत. या गाण्याला ७७० हून अधिक लाइक्स आणि १४ लाख व्ह्यूजही मिळाले आहेत. त्यामुळे कमल हासन या चित्रपटातील ते गाणं काढणार का? गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करण्यात येणार का? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत.