दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता महेश बाबू हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही, असे वक्तव्य केले होते. यानंतर सिनेसृष्टीत पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य सिनेमा असं वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच महेश बाबूने केलेल्या विधानावर प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी भाष्य केले आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी नुकतंच ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी महेश बाबूच्या विधानावर अप्रत्यक्षरित्या समर्थन दिले आहे. मुकेश भट्ट म्हणाले, “जर बॉलिवूडला त्याची किंमत परवडत नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. मी त्याला त्याच्या भविष्याकरिता शुभेच्छा देतो. तो सध्या जिथे आहे, त्याचा मी आदर करतो.”

‘बॉलिवूडला मी परवडणार नाही’ असे म्हणणारा अभिनेता महेश बाबू एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो? जाणून घ्या 

त्यापुढे ते म्हणाले, “तो फार कतृत्ववान आहे. त्यासाठी ‘X’ फॅक्टर फार महत्त्वाचा असून गेल्या अनेक वर्षात त्याने तो तयार केला आहे. तो फार यशस्वी अभिनेता आहे आणि जर बॉलिवूड त्याच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल तर त्यात काहीही गैर नाही. त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो.”

“जर मला कोणासाठी फुकटात काम करायचे असेल तर ती माझी स्वतःची मर्जी आहे आणि जर मी कोणासाठी १०० कोटी रुपये आकारत असेल तर तीही माझी निवड आहे. मी अनेक कलाकारांसोबत कमी पैशात काम केले आहे आणि काहींसोबत अगदी त्या उलट. दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री या सर्वांची फी काही काळानंतर बदलत असतात. त्यामुळे कोणालाही त्याच्या किंमतीमुळे अपमानित का करावे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे”, असेही मुकेश भट्ट म्हणाले.

“हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही, त्यामुळेच…”, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने बॉलिवूडबद्दल मांडलं स्पष्ट मत

“मी चित्रपटांवर प्रेम करतो आणि सर्व भाषांचा आदर करतो. मी जिथे चित्रपट करत आहे तिथे काम केल्याने मला छान आरामदायी वाटते. तेलुगू चित्रपटांना मिळत असलेली पसंती पाहून त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला आनंद आहे”, असेही मुकेश भट्ट यांनी म्हटले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सरिलेरू नीकेव्वरू (Sarileru Neekevvaru) या चित्रपटात महेश बाबू झळकला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता तो सरकार वारी पेटला (Sarkaru Vaari Petla) या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट आज १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.