साधू किंवा सत्पुरुषाच्या सहवासात चित्तावर असे संस्कार होऊ लागतात की, आपल्या मनोवेगांची आणि भावावेगांची जाणीव होऊ  लागते. त्यांच्यामुळे होणारी आपली आंतरिक होलपट जाणवू लागते. देहबुद्धीचं ओझं किती जड आहे आणि आपल्या अहंभावाच्या झळा किती दाहक आहेत, याचीही जाणीव होऊ  लागते. या संगतीच्या योगानं काय घडतं, याचं विवेचन समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १०८व्या श्लोकात आहे. हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे।

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हितकारी।। १०८ ।।

प्रचलित अर्थ : हे मना, सज्जन संगतीच्या योगाने अशुद्ध क्रिया पालटून भक्तिभावाची शुद्ध क्रिया आचरणात येऊ  लागते. हे मना तोंडानं नुसतं ब्रह्मज्ञान बोलून काय उपयोग? ते ज्ञान आचरणात नसेल, तर ते व्यर्थ आहे. क्रियेशिवायचा हा वाचाळपणा सोडून दे. वाद तुटेल आणि दुसऱ्याशी संवाद करता येईल, तर तो हितकारी होईल.

आता मननार्थाकडे वळू. इथं पहिल्याच चरणात एक अत्यंत महत्त्वाचा आणि पटकन लक्षात न येणारा शब्द आहे तो म्हणजे ‘सर्वदा’! नव्हे, ही जणू पूर्वअटच आहे. जर आताचे जगाच्या आसक्तीत अधिकाधिक खोल गुंतविणारे क्रियाकलाप थांबवायचे असतील आणि ज्या मार्गानं जाऊन सत्पुरुषांनी अखंड समाधान मिळविलं, त्या भक्तिपंथावर चालायचं असेल, तर सज्जनांचा योग मनाला अधेमधे नव्हे, तर सर्वदा घडला पाहिजे! आता हे कसं शक्य आहे? सत्संग जरी झाला तरी तो काय अखंड टिकू शकतो का? माझे सद्गुरू एकदा म्हणाले की, ‘‘सत्संग चार प्रकारचा असतो. प्रत्यक्ष सहवास हा पहिला सत्संग आहे, पण तो मिळणं, टिकणं आणि त्या सहवासात राहता येणं खूप कठीण आहे, कारण त्यांची आवड आणि आपली आवड, त्यांचा विचार आणि आपला विचार यात खूप मोठं अंतर असतं. त्यामुळे हा सत्संग फार काळ झेपत नाही! दुसरा सत्संग म्हणजे दूरध्वनीवरून किंवा पत्राद्वारे होणारा असतो; पण तोही सतत साधणारा नाही. तिसरा सत्संग हा सद्ग्रंथांच्या वाचनानं साधणारा असतो. त्यालाही मर्यादा आहेत. माणूस वाचून वाचून किती वाचणार? त्यात समजा, डोळे अधू झाले असले तर मर्यादा येणारच. चौथा सत्संग हा नामाचा आहे. तो अखंड टिकू शकणारा तर आहेच, पण त्यात आधीच्या तिन्ही सत्संगांचा लाभ पूर्णपणे सामावला आहे!’’

आता हा जो नामाचा सत्संग आहे तो म्हणजे साधनेचा सत्संग आहे, बोधानुरूप जगण्याचा अभ्यास आहे.. आणि खरं पाहाता असं जगणं ज्याला साधलं त्यालाच सत्संग साधला! तेव्हा सदासर्वदा साधणारा सत्संग जर कोणता असेल तर तो सत्पुरुषांचा जो बोध आहे, जो सांगावा आहे, तो जगण्यात उतरवणं हाच आहे. त्यांच्या विचारात रमणं, त्यांच्या बोधविचारात रमणं, त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळण्याचा प्रयत्न करणं, हा खरा आंतरिक सहवास आहे. हा अभ्यास आहे. तो कधी जमेल, तर कधी जमणार नाही; पण प्रयत्न जितके प्रामाणिकपणे होतील तितका आंतरिक सहवासही वाढत जाईल! जोवर असा सहवास लाभणार नाही तोवर माझ्या संकुचित क्रियाकलापात बदलच होणार नाही. जगासाठीचा भक्तिभाव ओसरणार नाही आणि परमतत्त्वाविषयी भक्तिभाव जागृत होणार नाही. जगणं तत्त्वकेंद्रित होणार नाही.