शाळेमध्ये सामान्य ज्ञानाचा तास…
शिक्षिका- मुलांनो ऋतू किती?
एकसाथ उत्तर आले- तीन.
तितक्यात बंड्याने हात वर केला- ‘बाई मी सांगू?’ असे म्हणत ‘चार’ असे उत्तर दिले.
‘कोणते सांगू पाहू’ शिक्षिकेने प्रश्न केला.
‘उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा’