पलीकडून उर्वीच कॉल करत होती. अनपेक्षितपणे उर्वीचा कॉल आल्यामुळे नीरजला आनंद झाला होता. त्यानं लगेचच फोन घेतला.

“हॅलो नीरज, गडबडीत नाही ना…”

A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

“नाही… बोल ना…”

“अरे, उद्याची मीटिंग पोस्टपोन झालीये. मला खन्नांचा मेसेज आलाय. ते नवी वेळ कळवणार आहेत. तू तयारी करत असशील. म्हणून तुला कळवलं.”

“ओके… थॅंक्यू यू… मी त्याच मीटिंगची तयारी करतोय… बरं झालं पटकन कळवलं… बाय द वे… काय म्हणतेस… घरी सगळं ठिक आहे ना?”

“हो… ठिक आहे… चल ठेवू फोन… मी येतीये उद्या ऑफिसला…”, उर्वीनं फोन ठेवला.

उर्वीनं ऑफिसच्या निरोपासाठी फोन केला होता. पण त्यामुळं नीरजला खूप बरं वाटलं. सकाळपासून जीवाची तगमग सुरू होती. त्यावर गार हवेनं फुंकर घातल्यासारखं त्याला वाटलं. त्यानं इंटरकॉमवरून पॅन्ट्रीमध्ये फोन लावला आणि कडक कॉफीची ऑर्डर दिली.

……………………………

Love Diaries : ह्रदयी वसंत फुलताना…

रात्रीचे अकरा वाजले होते… बेडवर पडल्या पडल्या नीरजला झोप लागायची… पण आज त्याला झोपच येत नव्हती… या कुशीवरून त्या कुशीवर वळून वळून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण डोळा लागत नव्हता. शेवटी त्यानं बॅगेतनं हेडफोन काढले आणि मोबाईलवर रेडिओ लावला.

चॅनेल सर्फ करताना एके चॅनेलवर त्याला ‘घर’मधलं ‘तेरे बिना जियां जायें ना…’ गाणं ऐकायला मिळालं आणि तो ऐकू लागला…

जब भी खयालों में तू आए…

मेरे बदन से खुशबू आए…

मेहके बदन में राहा न जाए

गाण्यातलं या कडव्यानं तर त्याच्या मनाला एकदम जवळून स्पर्श केला… गाणं संपल्यावर त्यानं अॅपवरून लगेचच ते गाणं डाऊनलोड केलं. रिपीट मोड लावून तो ते ऐकू लागला…

गाणं ऐकता ऐकताच त्याला शांत झोप लागली होती…

……………………………

आपल्याला उर्वी आवडू लागलीये, हे नीरजला जाणवलं होतं. फक्त ऑफिसमधली कलिग न राहता तिनं वैयक्तिक आयुष्यातही स्थान मिळवलंय… हे सुद्धा त्याला समजलं होतं. त्यामुळंच आपल्यातही काही बदल झालेत, हे सुद्धा त्यानं हेरलं होतं… आता फक्त या बदलांना सामोरं जाताना त्याची अडचण होत होती… कारण आपलं प्रेम एकतर्फी तर नाही ना? अशी शंका राहून राहून त्याच्या मनात येत होती. उर्वीही आपल्याकडं त्याच नजरेनं बघत असेल का, असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. तिच्यापर्यंत आपल्या मनातील भावना पोहोचवायच्या कशा हे ही त्याला समजत नव्हते.

उर्वी ऑफिसला येणारे माहिती असूनही त्यानं तिला मेसेज केला.

“गुड मॉर्निंग… तू येतीये ना ऑफिसला…”

काही वेळातच तिचा रिप्लाय आला…

“व्हेरी गुड मॉर्निंग… हो येतीये… साडेनऊपर्यंत पोहोचेन…”

उर्वीचा रिप्लाय बघून नीरजची कळी खुलली… तो लगेचच आवरण्यासाठी बाथरूममध्ये शिरला… त्याला तिच्या आधी ऑफिसला पोहोचायचं होतं.

………………………..

दहा वाजून गेले तरी उर्वी ऑफिसला पोहोचली नव्हती. तशी ती रोज वेळेवरच येते. पण आज तिला उशीर झाला होता.

सकाळी मेसेजमध्ये तर साडेनऊपर्यंत पोहोचेन असं लिहिलं होतं. मग उशीर का झाला असेल, असा प्रश्न नीरजच्या मनात येत होता. परत घरी काही गडबड झाली नसेल ना, अशीही शंका त्याच्या मनात चुकचुकून गेली. त्याचं लक्ष सारखं उर्वीच्या डेस्ककडं आणि घड्याळाकडं जात होतं. तेवढ्यात संतोष त्याच्या केबिनकडं आला…

अरे… नीरज उर्वीचा अॅक्सिडेंट झालाय पार्किंगमध्ये. तिची गाडी स्लीप झाली.

संतोषचे शब्द ऐकून नीरजला एकदम गळून गेल्यासारखंच झालं. पण त्यानं पटकन स्वतःला सावरलं आणि तो पार्किंगकडं गेला.

उर्वी पार्किंगमध्येच एका कट्ट्यावर बसून होती. तिचा हाताला चांगलंच खरचटलं होतं… वॉचमननं दिलेलं पाणी ती पित होती.

नीरजंन फारसं काही विचारत न बसता पटकन गाडी काढली आणि तिच्याजवळ आणली.

संतोषनं तिला गाडीत बसायला मदत केली आणि ते दोघेही हॉस्पिटलकडे निघाले.

उर्वीला अशा अवस्थेत बघून नीरज खरंतर हादरला होता. उर्वी अधूनमधून कण्हत होती. ते बघून तर त्याला जास्त बैचेन होत होतं.

पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट वेगळी घडली होती. आपल्याला लागलेलं पाहून नीरज खूपच अस्वस्थ झालाय. त्यानं थेट स्वतःची गाडी काढली आणि तोच आपल्याला हॉस्पिटलला घेऊन निघालाय, हे उर्वीनं हेरलं होतं. नीरजमधला हा बदल तिला जाणवण्यासारखाच होता.

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर नीरजनंच उर्वीला ट्रिटमेंट रूमपर्यंत नेण्यासाठी मदत केली. अशा पद्धतीनं त्यानं तिला पहिल्यांदाच स्पर्श केला होता. स्पर्शाचं कारण वेगळं असलं तरी त्याला तिच्या स्पर्शामध्ये उब जाणवत होती.

डॉक्टरांनी उर्वीच्या हाताचे आणि पायाचे एक्स रे काढले. पण सुदैवानं फ्रॅक्चर नव्हतं. तिला फक्त मुका मार लागला होता आणि खरचटलं होतं. त्यांनी खरचटलेल्या जागी बॅण्डेज केलं आणि तिला काही गोळ्या आणि क्रीम लिहून दिल्या. नीरजनं लगचेच फार्मसीमधून गोळ्या आणि क्रीम आणलं. हॉस्पिटलचं बिलही त्यानंच दिलं होतं.

एवढं सगळं होईपर्यंत उर्वीनं घरी काहीच कळवलं नव्हतं. पण आता तिनं बाबांना फोन करून घडला प्रकार सांगितला. बाबांना धक्का बसला होता पण मेजर काही नाही म्हटल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वासही सोडला! त्यांनी तिला लगेचच घरी येण्यास सांगितलं.

नीरजच्या मदतीनं उर्वी पुन्हा गाडीत बसली. दोघांमध्ये काही बोलणं होण्याआधीच नीरजनं गाडी पाषाणच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. गाडी आपल्या घरच्या रस्त्यावर आहे दिसल्यावर उर्वीनं नीरजकडं बघितलं. त्याचवेळी नीरजचही लक्ष काही क्षणांसाठी तिच्याकडं गेलं. तसं तर यापूर्वीही दोघांनी खूपवेळा याच गाडीतून एकत्र प्रवास केला होता. पण यावेळी तसं नव्हतं. उर्वीच्या नजरेमध्ये प्रेमाचे भाव होते. कोणीतरी आपली इतकी काळजी घेतंय, असं समजल्यावर मनाला जो आनंद होतो. तो लख्खपणे तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. नीरजनं तिच्या डोळ्यातील भाव जाणले होते.

नीरजनं रेडिओ ऑन केला. चॅनेलवर परत एकदा ‘घर’मधलं गाणं लागलं होतं.

आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं

आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं

गाणं ऐकल्यावर दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांकडं बघितलं. दोघांच्या डोळ्यांनी एकमेकांच्या डोळ्यांतील भाव हेरले होते.

उर्वीचे बाबा तिला घ्यायला खाली आले होते. तिनं नीरजची त्यांच्याशी ओळख करून दिली. तसं नावानं ते त्याला ओळखत होते. पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच त्यांनी नीरजला बघितलं होतं.

उर्वीसाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी नीरजचे आभार मानले.

“चला ना वर… कॉफी घेऊयात…” बाबांनी विचारलं.

“नको मला थोडी गडबड आहे. परत कधीतरी… मी निघतो.” नीरज म्हणाला. त्यानं उर्वीला काळजी घेण्यास सांगितलं आणि तो परत गाडीत बसला.

……………………………..

Love Diaries : ह्रदयी वसंत फुलताना… (भाग दोन)

आईनं आज जेवणामध्ये कोथिंबिरीच्या वड्या केल्या होत्या. नीरजला  कॉलेजमध्ये असताना या वड्या खूप आवडायच्या. पण गेल्या काही वर्षांपासून नीरजचं वागणं खूपच बदलल्यामुळं त्याच्या आवडीनिवडीही बदलल्या होत्या. कोथिंबिरीच्या वड्या तो खायचा पण त्याबद्दल फारसं काही बोलायचा नाही. आजचा दिवस वेगळा होता.

डायनिंग टेबलवर कोथिंबिरीच्या वड्या बघूनच त्यांनं ‘वॉव कोथिंबीर वडी!’ अशी उत्स्फूर्त कमेंट केली होती. शिवाय वड्या खाल्ल्यावर त्यानं आईला घट्ट मिठी मारून खूप छान झाल्या होत्या वड्या असं सुद्धा सांगितलं. नीरजला या रुपात बघून आईला धक्काच बसला होता. त्याची इतकी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आईला अगदी अनपेक्षित होती. नीरजमधला हा बदल आईसाठी अनपेक्षित पण हवाहवासा होता.

नीरजचा मूड चांगला दिसतोय. परत एकदा लग्नाचा विषय काढावाच. असं आईनं मनोमन ठरवलं.

शनिवार असल्यामुळं नीरजला आज ऑफिसची गडबड नव्हती. त्यामुळं आईनं ब्रेकफास्टवेळीच पुन्हा विषय काढला.

“नीरज, काय ठरलं तुझं लग्नाचं? मला आता होत नाही राजा. थकत चालले रे मी…” आईच्या बोलण्याचा सूर एकदम आर्जवी होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. पदरानं ते टिपत तिनं त्याच्याकडं पाहिलं.

आईला असं बघून नीरजही भावूक झाला. तो उठून आईजवळ गेला. आईचा हात हातात घेऊन त्यानं आपल मन रितं केलं. आईजवळ त्यानं उर्वीबद्दल सगळं सांगितलं. सगळं बोलून झाल्यावर त्याच्या डोळ्यांच्या पापण्याही पाणावल्या होत्या.

नीरजचं वेगळंच रूप आज आईला बघायला मिळालं होतं. उर्वीला सून करून घेण्यात आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मुळात नीरज लग्न करायला तयार झालाय. हेच तिच्यासाठी दुधात केशर घातल्यासारखं होतं. तिनं लगेचचं हे सगळं नीरजच्या बाबांना सांगितलं. त्यांचाही या नात्याला अजिबात विरोध नव्हता. उर्वीच्या घरच्यांशी कसं बोलायचं, तिचे वडील या लग्नाला मान्यता देतील का, हा प्रश्न नक्कीच बाकी होता.

बाबांनी नीरजकडून उर्वीबद्दल तिच्या घरच्यांबद्दल माहिती घेतली.

………………………….

लागल्यापासून उर्वी दोन-तीन दिवस ऑफिसला आलीच नव्हती. पण यावेळी नीरज आणि ती दोघेही मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. नीरज सारखा मेसेज करून तिची विचारपूस करायचा.

ब्रेकफास्ट झाला का, गोळ्या घेतल्या का, ज्यूस प्यायली का, या प्रश्नांनी सुरू होणारा दिवस तू लवकर परत ये ऑफिसला… मला तुझी खूप आठवण येतेय… Miss you… यासारख्या संवादांनी व्हायचा. उर्वीकडूनही या सगळ्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळायचा. काही दिवसांनी उर्वीला बरं वाटायला लागलं आणि ती ऑफिसला जॉईनही झाली.

……………………………..

इकडं नीरजच्या आई-बाबांनी त्याला न सांगता उर्वीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. नीरज उर्वीबाबत खूपच पझेसिव्ह झाला होता. तिच्या वडिलांनी या नात्याला नकार दिला असता, तर तो कोलमडून पडला असता, हे त्याच्या आई-बाबांनी ओळखलं होतं. त्यामुळंच त्याला न सांगता त्यांनी तिच्या घरी जाण्याचं निश्चित केलं. नेमकं त्याचदिवशी नीरज आणि उर्वी पहिल्यांदा दोघं एकत्रपणे कॉफी प्यायला जाणार होते.

…………………………

उर्वीच्या घराबाहेर पोहोचल्यावर नीरजच्या बाबांनी बेल वाजवली. उर्वीच्या बाबांनीच दरवाजा उघडला.

“आम्ही नीरजचे आई-बाबा… मिस्टर अॅण्ड मिसेस काळे… तुमच्याशी बोलायचं होतं. आम्ही आत येऊ का?”

“हो या ना… या या बसा… उत्कर्ष पाणी आणरे” त्यांनी आवाज दिला.

“नीरजला भेटलो मी त्यादिवशी… उर्वीच्या अॅक्सिडेंटनंतर त्यानंच सगळं केल तिच्यासाठी… तिला सोडायलाही आला होता…”

“हो, सांगितलं त्यांनी आम्हाला… कशी आहे उर्वी आता? ऑफिसला जायला लागली ना परत…”

“चार-पाच दिवस झाले जायला लागली परत… घरी बसून कंटाळली होती…” उर्वीच्या बाबांनी सांगितलं.

उत्कर्ष पाणी घेऊन आला होता… तो पाणी देत असतानाच… हा उर्वीचा लहान भाऊ उत्कर्ष… अशी ओळखही तिच्या बाबांनी करून दिली.

“वा… काय करतो उत्कर्ष?”

“लॉ करतोय… सेकंड इयरला आहे” त्यानं सांगितलं आणि तो आत निघून गेला.

“तुम्ही काय करता?” उर्वीच्या बाबांनी विचारलं.

“मी फिनिक्समध्ये होतो. दोनच वर्षांपूर्वी सिनिअर मॅनेजर म्हणून रिटायर झालो. सध्या घरीच असतो.”

काळेंना बघितल्यापासून उर्वीच्या बाबांना त्यांना आधी कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं त्यांनी आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली.

“आपण कुठेतरी भेटलो आहोत… मला तुमचा चेहरा ओळखीचा वाटतोय…” उर्वीच्या बाबांनी सांगितलं.

“मला सुद्धा तुम्हाला भेटल्यासारखं वाटतंय…पण कुठं ते आठवत नाही.” नीरजच्या बाबांनी सांगितलं.

“तुम्ही रोलिंग्जमध्ये होता का काहीवर्षे?” उर्वीच्या बाबांनी विचारलं.

“हो… पाच वर्षे होतो मी तिथं. त्यांच्या पर्जेस डिपार्टमेंटला असिस्टंट मॅनेजर होतो.”

“बरोबर… मग तिथेच आपण भेटलो आहोत… मी सुद्धा नऊ वर्षे त्याच कंपनीत होतो… मी अॅडमिनिस्ट्रेशनला होतो. तिथेच आपली भेट झालीये.”

उर्वीच्या वडिलांशी निघालेली जुनी ओळख नीरजच्या बाबांच्या पथ्यावरच पडली होती. त्यामुळे त्यांना लग्नाचा विषय काढणे अधिक सोपं झालं होतं.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर नीरजच्या बाबांनी थेट विषयाला हात घातला.

‘”नीरज आमचा एकुलता एक मुलगा… स्वतःच्या जीवावर आज त्यानं डायरेक्ट सेल्स क्षेत्रात नाव कमावलंय. घरचं सगळं व्यवस्थित असूनही तो आमचा कोणताही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहिला. गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्याच्या लग्नाचा विषय काढतो. पण तो या ना त्या कारणामुळं टाळतं आला. पण अलीकडं त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याची बोलणी करण्यासाठी आम्ही तुमच्याकडं आलो आहोत”

उर्वीच्या बाबांना विषय लक्षात आला होता. पण त्यांनी लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.

“उर्वी आणि नीरज गेल्या तीन वर्षांपासून एकत्र काम करताहेत. ऑफिसच्या कामात दोघं एकमेकांचे कलिग्ज आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून नीरजला उर्वी आवडू लागलीये. त्यामुळेच तिच्यासाठी आम्ही नीरजचं स्थळ घेऊन तुमच्याकडं आलो आहोत.” नीरजच्या बाबांनी सांगितलं.

“नीरजला न सांगताच आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. तुमची काही हरकत नसेल, तर आम्हाला उर्वीला सून करून घ्यायला आवडेल.” नीरजचे बाबा बोलत होते.

“मी पण गेल्या काही महिन्यांपासून लग्नासाठी उर्वीच्या मागं लागलोय. तिच्यासाठी काही स्थळंही आणलीत. पण एक-दोन स्थळांना तिनं नकार दिला. आता नीरजसारखं स्थळ असेल आणि उर्वीचाही त्याला होकार असेल तर मी नाही म्हणणार नाही.”

उर्वीच्या बाबांच उत्तर ऐकून नीरजच्या आई-बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नीरजच्या बाबांनी तर उभं राहून उर्वीच्या बाबांना घट्ट मिठीच मारली.

……………………………….

इकडं नीरज आणि उर्वी एकमेकांकडे बघत बघत कॉफीचा एक एक घोट घेत होते. दोघं एकमेकांशी फार बोलत नव्हते. पण एकमेकांच्या मनात काय चाललंय हे दोघांनाही समजत होतं. तेवढ्यात नीरजचा मोबाईल वाजू लागला. डिस्प्लेवर आई-बाबा असं लिहून आलं होतं. नीरजनं फोन घेतला.

“Congratulations बेटा… कधीची तारीख पक्की करायची?”

बाबांचं बोलण ऐकून नीरज काही क्षण गोंधळून गेला. त्याला नक्की काय झालंय तेच कळेना.

“बेटा, उर्वीच्या घरी गेलो होतो आम्ही दोघं. तिच्या बाबांशी बोलायला… तिच्या बाबांना सगळं सांगितलं आणि त्यांनी तुमच्या लग्नाला होकार दिलाय.”

बाबांचे हे शब्द ऐकून नीरजच्या चेहऱ्यावरची कळी खुलली होती. त्यानं हे सगळं लगेचच उर्वीला सांगितलं. तिला तर आपण स्वप्नात आहोत, असंच वाटत होतं. नीरजचे बाबा उर्वीशीही बोलले आणि तिचेही त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी तिला घरीही यायला सांगितले.

नीरजनं उर्वीकडं बघितलं

I Love You

Me Too…

दोघे एकमेकांकडे बघत होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये हेच शब्द दिसत होते…

(समाप्त)

– तीन फुल्या, तीन बदाम