थोड्या वेळानं ट्राय करू असं मनातल्या मनात ठरवत प्राजक्तानं फोन ठेवला. पण तिच्या मनात तयार झालेल्या प्रश्नांना काहीच उत्तर मिळत नसल्यानं ती जास्तच अस्वस्थ झाली होती. रोहनचा फोन बंद का असेल… घरी काय झालं असेल… तो अडचणीत तर सापडला नसेल ना… असे एका मागून एक प्रश्न तिच्या डोक्यात येत होते आणि तिच्या मनाची घालमेल वाढवत होते. ज्या रविवारची ती गेल्या काही दिवसांपासून स्वप्न रंगवत होती. तो इतका निष्ठूरपणे उगवेल, असे तिला वाटलेच नव्हते.

“काय झालंय प्राजक्ता… तू अलिबागला जाणार होतीस ना…?”, प्राजक्ताला घरी पाहून आईनं विचारलं. प्राजक्ताचा चेहरा पडला असल्याचं आईच्या लक्षात आलं होतं.

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा

“अगं… रोहनच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तो सांगलीला गेलाय. त्याचा मोबाईलही स्वीच्ड ऑफ येतोय… मला काहीच समजत नाहीये.”

“करेल तो फोन… नको पॅनिक होऊ… चहा देऊका तुला…” आईनं समजावण्याचा प्रयत्न केला.

नऊ वाजून गेले तरी रोहनचा फोन आला नव्हता. इकडं प्राजक्ताचं कशातच लक्ष लागत नव्हतं. काय करावं काही सुचतही नव्हतं.
पावणेदहाच्या सुमारास प्राजक्ताचा मोबाईल वाजला… स्क्रिनवर अननोन नंबर दिसत होता. प्राजक्तानं लगेचच कॉल घेतला.

“रोहन बोलतोय, सॉरी… मी तुला न कळवता इकडे निघून आलो…”

“रोहन काय झालंय… घरी काही प्रॉब्लेम झालाय का…आणि हा कुणाचा नंबर आहे?” रोहनच्या घरी नक्की काय झालंय हे ऐकण्यासाठी प्राजक्ता बैचेन झाली होती.

“अगं माझा फोन डिस्चार्ज झालाय. हा माझ्या काकांचा नंबरे. काल रात्री मला आईचा फोन आला. बाबांना गेल्या दोन दिवसांपासून त्रास होत असल्याचं तिनं सांगितलं. मला काही कळवू नको, असं बाबांनी आईला सांगितलं होतं. पण काल त्यांच्या आवाजातही बदल झाल्याचं आईला जाणवलं. त्यामुळं तिनं लगेचच मला कळवलं. मी कसलाच विचार न करता लगेचच सांगलीची गाडी पकडली. तुला सांगायचं होतं. पण तू घाबरशील म्हणून काही सांगण्याची माझी हिमत नाही झाली. शेवटी तुला मेसेज टाकला.” रोहनच्या आवाजावरून तो डिस्टर्ब असल्याचं प्राजक्ताच्या लक्षात आलं होतं.

“आता कुठं आहेत बाबा… डॉक्टर काय म्हणताहेत…” प्राजक्तानं विचारलं

“बाबांना आम्ही सकाळीच अॅडमिट केलंय. त्यांच्या टेस्ट करायला सांगितल्या आहेत. त्या झाल्यावरच नक्की काय झालंय हे कळेल.”

“रोहन, अजिबात काळजी करू नकोस. बाबा लवकरच बरे होतील. तुला काहीही मदत हवी असेल, तर मला सांग. मी तिकडेही येऊ शकते. डॉक्टर काय म्हणताहेत ते मलाही कळव.” प्राजक्तानं रोहनला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“मला काहीच कळत नाहीये… काय झालं असेल बाबांना… ते लवकर बरे होतील ना?” रोहनचा आवाज कापरा झाला होता. त्याला कधीही रडू कोसळेल, अशीच स्थिती झाली होती.

“नको इतका पॅनिक होऊ रोहन… होईल सगळं व्यवस्थित… मी माझ्या बाबांशी पण बोलते… गरज पडली तर आपण तुझ्या बाबांना इकडंच घेऊन येऊ आणि इथेच ट्रिटमेंट करू…” प्राजक्तानं पुन्हा रोहनला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“डॉक्टर राऊंडला आलेत… मी तुला नंतर फोन करतो…” रोहननं फोन ठेवला.
रोहनच्या फोनमुळं प्राजक्ताच्या मनातील घालमेल काहीशी कमी झालेली असली, तरी त्याच्या बाबांना नक्की काय झालं असेल, याबद्दल तिच्या मनात अनेक शंका येत होत्या. बाबांना हे सगळं सांगू या… असा ठरवत ती बाबांकडे गेली.

“बघू आपण काय झालंय ते… रिपोर्ट आले की मला सांग… मगच आपण ट्रिटमेंट ठरवू शकतो… फार काळजी करू नकोस.” बाबांनी प्राजक्ताला समजावलं.

रोहनच्या बाबांचं कळल्यापासून प्राजक्ताच कशातच लक्ष लागत नव्हतं. तिच लक्ष सारखं मोबाईलकडंच जात होतं. संध्याकाळ होत आली तरी रोहनचा फोन आला नव्हता. तिला सारखी रोहनचीच आठवण येत होती. कॉलेजमध्ये रोहनसोबत घालवलेला वेळ तिला सारखा सारखा आठवत होता. रोहननं दिलेल्या नोट्स तिनं कपाटातून काढल्या. त्याचं सुंदर अक्षर बघून प्राजक्ताच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या.

…………………………

Love Diaries : लव्हस्टोरी, पुणे व्हाया सांगली! (पूर्वार्ध)

रोहन आणि त्याच्या काकांना डॉक्टरांनी भेटायला बोलावलं होतं. त्यामुळे ते दोघे डॉक्टरांच्या केबिनकडं गेले. टेस्टचे रिपोर्ट आले होते. त्यामुळं बाबांना नक्की काय झालंय, हे कळणार होतं. रोहनच्या मनातील अस्वस्थता जास्तच वाढली होती.

gडॉक्टरांनी रिपोर्ट बघून काय झालंय हे रोहनला सांगण्यास सुरुवात केली.

“गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कानात दुखतं आहे. त्यांचा आवाजही बदललाय. हे सर्व सिम्प्टम्प्स आणि रिपोर्टवरून काही एक निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत. पण आम्हाला त्यांच्या आणखी काही टेस्ट करायला लागतील.” डॉक्टर सांगत होते.

“पण नक्की काय झालंय बाबांना… काही मेजर तर नाही ना…”, रोहननं विचारलं.

“टेस्टवरून तरी त्यांच्या स्वरयंत्राला गाठ आल्याचं दिसतंय. ही गाठ नक्की कशाची हे बघावं लागेल. त्यासाठी बायोप्सी करावी लागेल.” डॉक्टरांनी सांगितलं.

बायोप्सी हा शब्द ऐकताच रोहनच्या छातीत धस्स झालं. बाबांना काय झालं असू शकेल, याची पुसटशी कल्पना रोहनला आली होती. त्याचे हातपाय कापायला लागले होते.

“रोहन, घाबरू नकोस. जोपर्यंत बायोप्सीचे रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. आणि आता कॅन्सरही पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्व ट्रिटमेंट उपलब्ध आहे आपल्याकडं…” डॉक्टरांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

………………………

इकडं प्राजक्ता रोहनच्या फोनची वाट बघत होती. पण त्याचा काहीच रिप्लाय न आल्यानं प्राजक्तानचं त्याला फोन लावला. रोहन नुकताच डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला होता. त्यानं प्राजक्ताचा फोन उचलला. प्राजक्ताला सांगावं की न सांगावं, अशा द्विधा मनःस्थितीत तो होता. पण त्याला लपवून ठेवता आलं नाही आणि त्यानं सगळं प्राजक्ताला सांगितलं. तिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं. त्यामुळं तिनं स्वतःच्या भावना रोखून रोहनला सावरण्याचा प्रयत्न केला.

“तू अजिबात काळजी करू नकोस. तुला माहितीये ना बाबा ऑन्कोलॉजिस्ट आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलते. आपण काकांवर इथेच ट्रिटमेंट करूया… ते लवकरच बरे होतील”

रोहन जास्त बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो आतून पुरता हादरून गेला होता. त्यानं फारसं काही न बोलता फोन ठेवला.

प्राजक्तानं बाबांपुढं जाऊन सगळं सांगितलं. परिस्थिती नक्की काय असेल, हे तिच्या बाबांच्या लक्षात आलं होतं. आणि आपली मुलगी यामध्ये कुठंतरी भावनिक गुंतली आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं होतं. पण त्यांनी डॉक्टर म्हणून पेशंटला बरं करण्याला प्राधान्य द्यायचं ठरवलं. त्यांनी प्राजक्ताकडून सगळी माहिती घेतली आणि सांगलीच्या डॉक्टरांना फोन करून पुढील व्यवस्था लावली.

………………………………

थोड्याच वेळात डॉक्टरांनी पुन्हा रोहनला बोलावून घेतलं.

“पुण्याचे डॉ. देशपांडे तुमच्या ओळखीचे आहेत का? त्यांचा फोन आला होता. त्यांनी पुढील ट्रिटमेंट पुण्याला होईल, असं आम्हाला सांगितलंय आणि पेशंटला पुण्याला न्यायची व्यवस्थाही केलीये.” डॉक्टर रोहनला सांगत होते.

रोहननं सगळे डॉट्स जोडल्यावर त्याला काय घडलंय याची कल्पना आली. प्राजक्तामुळंच हे सगळं घडलंय, हे अगदी लख्ख होतं. त्यानं क्षणाचाही विलंब न लावता तिला फोन लावला.

“Thank you……” काही वेळ पलीकडून काहीच आवाज आला नाही. रोहन भावनाविवश झाला होता. त्याच्या हुंदक्याचा आवाज ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. तिनं स्वतःला सावरलं.

“रोहन, काका लवकर बरे होतील. तू अजिबात काळजी करू नकोस. माझं बाबांशी बोलणं झालंय. तू लवकर त्यांना इकडं घेऊन ये. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.”

प्राजक्ताच्या त्या शब्दांनी काहीवेळासाठी रोहनला खूप हायसं वाटलं. सोबत सगळे नातेवाईक असतानाही प्राजक्ता तिचे घरचे त्याला खूप जवळचे वाटू लागले होते. रोहनन घरच्यांशी बोलून बाबांना दोनच दिवसांत पुण्याला नेण्याचं नक्की केलं.

……………………….

इकडे प्राजक्ताच्या बाबांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवस्था लावून ठेवली होती. रोहनच्या बाबांचे सर्व रिपोर्टसही त्यांनी आधीच मागवून घेतले होते. काय झालं असेल, याचा अंदाज त्यांनी आधीच बांधून ठेवला होता आणि त्यांचा अॅक्शन प्लानही ठरला होता.

ठरल्याप्रमाणं सगळं घडलं. रोहननं बाबांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. पुढील आवश्यक टेस्ट केल्यावर ट्रिटमेंटही सुरू झाली. लॅरिंक्सचा कॅन्सर होता. पण अगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यामुळं कोणतीही सर्जरी न करता उपचार करता येणं शक्य होतं.

हॉस्पिटलमधल्या उपचारांच्या काळात रोहन बाबांना सांभाळण्याचं काम जितक्या खंबीरपणे करत होता. त्यापेक्षा किंचितसं जास्तच रोहनला सांभाळण्याचं काम प्राजक्ता करत होती. कदाचित अलिबागला जाऊन दोघं एकमेकांना जितकं ओळखू शकले नसते, त्यापेक्षा जास्त या प्रसंगामध्ये दोघांनी एकमेकांना ओळखलं होतं.

स्पष्टपणे व्यक्त न करताही एकमेकांसाठी करत राहण्यातलं प्रेम अधिक टिकाऊ असतं. हे उमलत्या वयात दोघांनीही ओळखलं होतं. रोहनचं प्राजक्तावर प्रेम होतंच. पण या काळात त्याला तिच्याबद्दल अभिमान वाटू लागला होता. या दोघांमध्ये फुलणाऱ्या नात्यांचा अंदाज दोघांच्या कुटुंबीयांनाही आला होता. पण त्यांना विरोध करण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. इतकं सुंदर नातं फुलत असताना जात, पैसा, प्रतिष्ठा अशा तकलादू कारणांमुळं त्याला विरोध करण्याइतके दोघांचेही कुटुंबीय संकुचित विचारसरणीचे नव्हते.

………………………….

दोन महिन्यांच्या ट्रिटमेंटनंतर रोहनचे बाबा पूर्णपणे बरे झाले होते. आजच ते सांगलीला परतणार होते. त्यांना सोडण्यासाठी प्राजक्ताही आली होतीच. रोहननं आई-बाबांना गाडीत बसवलं.

“मी शनिवारी कॉलेज झालं की येतो… गोळ्या चुकवू नका…जास्त दगदग करू नका” बाबांना सांगत रोहननं गाडीचा दरवाजा बंद केला. गाडी निघून गेली.

आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. कधीही पाऊस सुरू होईल, असं चित्र होतं. रोहन आणि प्राजक्तानं एकमेकांकडे बघितलं. प्राजक्तानं रोहनचा हात हातात घेतला.

… रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित