शमिका हैदराबादमधील आपल्या नव्या ऑफीसमध्ये स्वत:च्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काहीतरी काम करण्यात मग्न होती. टेबलावर कॉफी आणि बरीच कागदपत्रं. शमिका प्रोफेशनल लाइफमध्ये खूप यशस्वी होती. शमिकाचं आज कामासोबतच कंपनीत एका रिक्त जागेसाठी इंटरव्हूय घेणं सुद्धा सुरू होतं. सकाळी दहा वाजताची वेळ असूनही एक मुलगी घाईघाईत अकरा वाजता इंटरव्हूयसाठी पोहोचली. केबिनमध्ये येताच त्या मुलीची धावपळ , घामाघूम झालेला चेहरा आणि अस्वस्थता शमिकाला स्पष्ट जाणवली. बायोडेटा आणि इतर माहिती असलेली स्वत:ची फाईल देताना थरथरणारा त्या मुलीचा हात..तिची अस्वस्थता..ओळख करून देताना अडखळणं..इंटरव्ह्यूला आलेल्या त्या मुलीचं हे सगळं पाहून शमिकाला आपल्या भूतकाळाची आठवण झाली. शमिकाच्या मनात आता तीन वर्षांपूर्वी भरून निघालेल्या जखमांवरचे खपले निघण्यास सुरूवात झाली.

शमिकाला कंपनीच्या हैदराबाद ब्रांचची बांधणी करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. तिने मुंबईतील ऑफीस सोडून हैदराबादला नुकतंच जॉईन केलं होतं. मुंबई ऑफीसला मॅनेजर म्हणून काम पाहात असताना अशाच पद्धतीने आकाश नावाचा मुलगा इंटरव्ह्यूसाठी शमिकासमोर आला होता. दिसायला हॅण्डसम अगदी कूलबॉय टाईप होता. करिअरच्या आपल्या पहिल्याच इंटरव्ह्यूला आकाशला उशीर झाला होता. पांढरं फॉर्मल शर्ट कसंबसं इन करत हातातली बॅग आणि गळ्यातील टाय सावरत आकाश केबिनमध्ये आला होता. एखाद्या मुलीने पाहताच क्षणी प्रेमात पडावं अशा लूक्सच्या आकाशच्या बाबतीत शमिकाचंही तसंच झालं. आकाशला पाहताच शमिकाच्या डोळ्यात एक वेगळंच तेज आलं होतं. ते तिलाही कळून चुकलं होतं. उशीर झाल्याबद्दल शमिकाने आकाशबद्दल ब्र सुद्धा काढला नाही. काहीच विचारलं नाही. तोच सुरू झाला..

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

“हाय, मॅम..आय एम आकाश..सॉरी फॉर गेटिंग लेट”

“इट्स ओके..नो इशू”

मग पुढे इंटरव्ह्यूमध्ये शमिकाने आकाशबद्दलची संपूर्ण माहिती काढून घेतली आणि जॉबबाबत फोनवर कळवलं जाईल असं सांगून निरोप घेतला. दोन दिवसांनी आकाशला फोन आला आणि जॉईन करण्याचं सांगण्यात आलं. आकाशलाही जॉबची गरज असल्याने त्याने तातडीने होकार कळवला. महिन्याचा एक तारखेपासून आकाश शमिकाच्या कंपनीमध्ये जॉईन झाला. शमिका आकाशपेक्षा हुद्द्याने आणि वयाने सुद्धा मोठी होती. दोघांच्या वयात चार वर्षांचा फरक होता. कामाच्या एकंदर पद्धतीवरून आकाश स्मार्ट असल्याचं हळूहळू शमिकाला कळू लागलं होतं. आकाशचं बोलणं..वागणं..एखादी गोष्ट समजून घेण्याची त्याची वृत्ती हे सगळं शमिकाला भावू लागलं होतं. नॉर्मली शमिका तिच्या फ्लोअरवरील दुसऱया मॅनेजरसोबत लंचला जायची. एकदा शमिका नेहमीप्रमाणे दुसऱया मॅनेजरसोबत लंचला बसली असताना आकाश त्याचा डबा घेऊन आला आणि एकाच टेबलवर लंचला बसण्याची विनंती शमिकाजवळ त्याने केली. आकाशचा हा पहिलाच जॉब असला तरी त्याचा कॉन्फीडन्स लेव्हल खूप चांगला होता. तो गप्पा मारण्यात पटाईत होता. त्यादिवशी लंच टाईममध्ये शमिका आणि आकाशमध्ये खूप गप्पा रंगल्या. दिवसेंदिवस शमिका आणि आकाश यांच्यात खूप चांगलं नातं निर्माण होत गेलं. प्रोफेशनल लाइफमध्ये एकमेकांचे सहकारी आहेत याची पूर्ण कल्पना दोघांनाही होती. पण आकाशबद्दल शमिकाच्या मनात असलेला सॉफ्ट कॉर्नर आता आणखी बळकट होऊ लागला होता. शमिकाला आकाशच्या बऱयाच गोष्टी आवडू लागल्या होत्या. शमिका आता लंच टाईमसाठी आकाशसोबत जाण्याची वाट पाहू लागली होती. लंचची वेळ झाली की हळूच आपल्या केबिनमधून बाहेर पाहात आकाश काय करतोय..जेवायला गेला का? किंवा तशी तयारी करण्यास सुरूवात केलीय का? याच्याकडे शमिकाचं वारंवार लक्ष जाऊ लागलं होतं. आकाश लंचसाठी उठला की शमिका देखील तातडीने कॅन्टीन गाठत होती. आकाशने सुटी घेतली त्याची फोन करून विचारपूस करणं, ऑफीसमध्ये आकाशला फेव्हर करणं..हे असं सगळं शमिकाचं सुरू झालं होतं. शमिकाच्या अशा वागण्याने आकाशच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. शमिकाचं वागणं आकाश नोटीस करू लागला होता. आकाशला शमिका आवडत नव्हती अशी गोष्ट नव्हतीच मुळी. फक्त शमिका बॉस असल्याने आकाश तिच्याबाबत तसा विचार करण्यास धजावला नव्हता इतकचं. शमिकाच्या पुढाकारामुळे आकाशलाही बळ मिळू मिळालं. आकाश देखील शमिकाबाबत हळूहळू व्यक्त होण्यास सुरू झाला. ऑफीसच्या पार्टीत तर दोघं खूप जवळ आले आणि प्रेमाची कबुली देखील दिली. आकाशला जॉईन होऊन अगदी वर्षभराच्या कालावधीतच दोघं रिलेशनशीपमध्ये गुंतले. शमिका प्रोफेशनल लाइफमध्ये स्थिरस्थावर असली तर आकाश देखील महत्त्वाकांक्षी होता. त्यामुळे दोघं प्रोफेशनल पातळीवर एकाच विचाराचे होते. शमिकाने आकाशच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेतला असला तरी प्रपोज मात्र आकाशनेच केलं होतं. शमिकाने फक्त सुरूवातीपासून आकाशला दिलेल्या हिंट्सवरून आकाशला प्रपोज करण्याचं बळ मिळालं होतं. किंबहुना शमिकाच्या होकाराबाबात त्याला खात्री होतीच. पार्टीत ड्रींक्स वगैरे झाल्यानंतर आकाशने शमिकाचा हात पकडून तिला एका बाजूला नेलं.

“आकाश…काय झालं? काय काम आहे..सांग. असं का घेऊन आलायस तू मला इथे”

आकाशने आजूबाजूला पाहून आपल्याला कोणी पाहात नाही ना याची खात्री झाल्यानंतर शमिकाला जवळ घेऊन तो व्यक्त झाला.

“शमिका..आय लव्ह यू” असं ताडकन आकाशने म्हणून टाकलं

”मी याचीच वाट पाहात होते”, असं उत्तर देऊन शमिकानेही आपला होकार कळवला होता.

दोघांच्या नव्या आयु्ष्याला आता सुरूवात झाली होती. शमिका आणि आकाश दोघंही आपलं रिलेशनशीप एन्जॉय करु लागले होते. ऑफीस बाहेर भेटीगाठी..एकत्र डीनर..शमिकाने आकाशला वारंवार केबिनमध्ये बोलावणं..दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस बहरत जात होतं. दोघही एकमेकांचे साथीदार झाले होते.

पण तीन वर्षांनंतर सर्व परिस्थिती बदलली होती. आकाश आता शमिकाच्या आयुष्यात नाही. आकाशने शमिकासोबत ब्रेकअप केलंय. हे आठवल्यावर शमिका भानावर आली. हैदरबादच्या ऑफीसात इंटरव्ह्यूला आलेल्या मुलीला शमिकाने ”कळवते” असं सांगून तिचा निरोप घेतला. शमिकाच्या अशा गोंधळात टाकणाऱया वागण्याने त्या मुलीला देखील काहीच कळलं नाही.

”यस मॅम..नाईस टू मिट यू” म्हणत ती मुलगी केबिनमधून निघाली.

भानावर आलेल्या शमिकाने त्या मुलीला ”सी यू सून” असा रिप्लाय दिला.

केबिनचा दरवाजा बंद झाला आणि शमिका पुन्हा आपल्या भावविश्वात हरवून गेली. मनाने हळव्या आणि भावनिक असणाऱया शमिकाला आकाशने दिलेल्या धक्का पचावता आला नव्हता. त्यामुळे कंपनीने दिलेल्या संधीचे निमित्त करून तिने मुंबईपासून किंबहूना आकाशपासून दूर जाण्याचा प्रय़त्न केला आणि ती हैदराबादमध्ये सेटल झाली होती. मुंबईहून हैदराबादला शमिका आली असली तरी तिच्या मोबाईलच्या स्क्रिनसेव्हरवर अजूनही आकाशचा फोटो होता. आकाशची आठवण आली की तिचा हात त्वरित मोबाईलकडे जायचा. मोबाईल सुरू करून ती आकाशच्या चेहऱयाकडे एक टक पाहू लागली..मोबाईलचा लाईट बंद होऊन तो लॉक होताच..स्क्रिनवर आता शमिकाला स्वत:चं प्रतिबिंब दिसलं आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं.

मुंबईत असताना शमिकाचा अपघात झाला होता. अपघातानंतर आकाश रितसर पद्धतीने शमिकासोबतचे रिलेशनशीप हळूहळू टाळत होता. काही कालावधीने शमिकालाही त्याची जाणीव झाली होती. अपघातात शमिकाचा चेहऱयाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. चेहरा कुरूप झाला होता, तर एक पाय कृत्रिम बसवण्यात आला होता. एका अपघातामुळे शमिकाचा चेहरा कुरप होणं आणि शारिरीक अंपगत्वाचा परिणाम प्रेमावर होईल, अशी कल्पनाच कधी तिने केली नव्हती. रिलेशनशीप पुढे सुरू ठेवण्यात आकाशने उघडउघड असमर्थता दाखवली आणि शमिका आणखी खचून गेली होती. अपघाताच्या धक्क्यातून सावरल्यानंतरही आकाशने दिलेला धक्का पचवणं तिला खूप कठीण गेलं. तरी कसंबसं तिने स्वत:ला सावरून हैदराबादमध्ये शिफ्ट होऊन नव्याने जगण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पण आठवणींना मरण नसतं, हेच खरं.

आकाशचा फोटो मोबाईलमध्ये पाहात असताना मोबाईल बंद झाल्यावर शमिकाला प्रतिबिंबात आपल्या बदललेल्या चेहऱयाचं दर्शन झालं होतं. पण प्रतिबिंबात दिसलेल्या वस्तुस्थितीपेक्षा आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाने आपली साथ सोडणं हे तिला जास्त जिव्हारी लागलं होतं. लग्नाचं वय निघून जात असलं तरी शमिका आजही सिंगल आहे. चेहऱयाचं नाही, तर प्रेमाचं ‘सौंदर्य’ जपेल अशा साथीदाराच्या शोधात..

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित