काही दिवस निघून गेले होते.. मंजिरीचा फोन लागत नव्हता.. मंजिरी अचानक कुठे गेली, तिला काही झालंय का, काहीच समजत नव्हतं.. अखेर एक दिवस मंजिरीचाच फोन आला..

‘कुठे आहेस इतके दिवस..? मेसेज नाही, कॉल नाही.. किती काळजी करत होतो मी.. असं अचानक कुठे निघून गेलीस तू?’ निरंजनचे प्रश्न संपत नव्हते..

pune school girl suicide, pune school girl attempts suicide
धक्कादायक! तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

‘अरे किती प्रश्न विचारशील..? माहितीय तू जर्नलिस्ट आहेस.. पण ही काय प्रेस कॉन्फरन्स नाहीय.. बरी आहे मी.. मला तुला भेटायचं आहे.. प्लीज तू येशील का..? मी अॅड्रेस मेसेज करते..’ मंजिरी पूर्वीसारखीच बोलत होती..

मंजिरीचा फोन आल्याने निरंजनचा जीव भांड्यात पडला होता.. तेवढ्यात मंजिरीचा मेसेज आला.. त्यामध्ये एका हॉस्पिटलचा पत्ता होता.. आता पुन्हा एकदा निरंजनच्या हृदयाची धडधड वाढली होती.. मंजिरीला काही झालं असेल का?, असा प्रश्न त्याच्या मनात आला.. मात्र मंजिरीनेच त्याला सकारात्मक विचार करायची सवय लावली होती, त्यामुळे निरंजनने स्वत:ची समजूत काढली.. मंजिरीला काय होणार? मंजिरी कायम अगदी ठणठणीत, आनंदी असते.. मंजिरीला काहीही होणं शक्यच नाही.. तिच्या घरातलं कोणीतरी अॅडमिट असेल, म्हणून तिनं फोन केला नसेल.. मनात असंख्य विचारांचं काहूर उठलं होतं.. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हॉस्पिटलमध्येच मिळणार होती.. निरंजन हॉस्पिटलमध्ये पोहोचला..

मंजिरीच्या नावाची विचारपूस केल्यावर रिसेप्शनिस्टकडून माहिती मिळाली.. निरंजन मंजिरीजवळ पोहोचला.. मंजिरी बेडवर झोपली होती.. शेजारी तिची ताई होती.. मंजिरीला काहीतरी गंभीर आजार झालाय, हे तिला पाहताच क्षणी निरंजनच्या लक्षात आलं.. निरंजन आतून कोलमडला होता.. मात्र इतक्या दिवसांनी निरंजनला पाहिल्यानं मंजिरीला आनंद झाला होता.. आजारपणाने कोमजलेल्या चेहऱ्यावरही तो आनंद स्पष्ट दिसत होता..

‘हे सर्व काय आहे मंजिरी..? नेमकं काय झालंय तुला..?’ निरंजनने धीर एकवटून कसंबसं विचारलं..

‘काही विशेष नाही रे.. अशीच अॅडमिट आहे.. बरं वाटलं की सोडतील घरी..’ मंजिरी शांतपणे म्हणाली.. निरंजनला इतक्या दिवसानंतर पाहिल्याने मंजिरी आनंदात होती..

‘निरंजन, तू आहेस ना..? मी येते औषधं घेऊन..’ मंजिरीची बहिण अतिशय खोल आवाजात म्हणाली.. तिच्या चेहऱ्यावरचे भाव परिस्थिती खूप गंभीर असल्याचं सांगून गेले..

‘मंजिरी, प्लीज सांग.. नेमकं काय झालंय तुला..?’ मंजिरीची बहिण जाताच निरंजननं पुन्हा विचारलं..

‘ब्रेन कॅन्सर… लास्ट स्टेजला आहे..’ मंजिरी अगदी शांतपणे म्हणाली..

‘काय?’ निरंजनच्या पायाखालची जमीन सरकली होती.. मंजिरी मात्र शांत होती..

‘अरे, हे बघ.. मी तुझ्यासाठी एक पत्र लिहिलंय.. नीट ऐक हा.. कागदावर शक्य नव्हतं.. म्हणून बसल्या बसल्या फोनवर लिहिलं.. तुला पाठवते नंतर.. आता फक्त ऐक..’ मंजिरी त्याच शांतपणे बोलत होती.. निरंजन इतका हादरुन गेला होता की त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता..

‘प्रिय निरंजन.. तू खूप बदललास रे, असं वाक्य एखाद्या प्रेयसीनं प्रियकराला म्हटलं की त्याचा अर्थ बऱ्याचदा किंवा सगळ्याच वेळी नकारात्मक असतो.. मात्र निरंजन तू बदललास, याबद्दल मला आनंद आहे.. कारण तुझ्यातला बदल सकारात्मक आहे.. ईएमआयच्या चिंतेत आयुष्यदेखील हफ्त्या हफ्त्यानं जगणारा माझा निरंजन आता आयुष्य भरभरुन जगतोय, याचा आनंद आहे.. परिस्थिती, त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, प्रश्न, समस्या या आयुष्याच्या भाग असतात.. त्या आयुष्य नसतात.. किंबहुना त्यांना आपल्या आयुष्याचा ताबा मिळवू द्यायचा नसतो.. तू आता नेमकं तेच करतोयस.. कदाचित काही दिवसांनी मी नसेन या जगात.. मात्र तू रडायचं नाही.. कारण माझ्या निरंजननं रडलेलं मला मुळीच चालणार नाही.. आता तू तक्रारी करत नाहीस.. मात्र तुला न भेटता गेले असते, तर आयुष्यभर ही तक्रार तुझ्या मनात कायम असली असती.. म्हणून तुला भेटायला बोलावलं..’

निरंजनच्या अश्रूंचा बांध फुटला होता.. मात्र तरीही तो अश्रू अडवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता.. त्याच्या डोक्यावरुन मायेनं हात फिरवत मंजिरी पत्र वाचत होती..

‘तुला माहितीय निरंजन, तू एकदा म्हणाला होतास.. मंजिरी तुझं नाव अगदी सार्थ आहे.. मंजिरी म्हणजे तुळशीला येणारं बी.. मातीत मिसळल्यावर ते बी तिथेही छान तुळस फुलवतं.. तशी तू माझ्या आयुष्यात रुजलीस.. तुझ्या येण्यामुळे मी खूप समृद्ध झालो.. निरंजन, तुझ्यातला बदल पाहून मला आयुष्य सार्थ झाल्यासारखं वाटतं.. मी कदाचित काही दिवसांनी या जगात नसेन.. पण तुझ्यात रुजलेली मंजिरी कायम असेल.. ती तशीच कायम राहिल, याची खात्री आहे.. आणि तसंही मंजिरी तुळशीतच असते आणि निरंजन कायम त्या तुळशीजवळ असतं.. आपलं नातं तसंच काहीसं.. आयुष्य कायम असाच भरभरुन जग.. मी कायम तुझ्यासोबत असेन.. फक्त तुझीच लाडकी मंजिरी..’

निरंजन आणि मंजिरी त्यानंतर फक्त आणि फक्त रडत होते.. काही दिवसांनी मंजिरी गेली.. मात्र कॅन्सर असूनही, तो बरा होणार नाही, याची खात्री असूनही तिनं निरंजनला जगणं शिकवलं होतं.. मरण समोर दिसत असताना, रडण्याचं, कोलमडून पडण्याचं एक प्रचंड मोठ्ठं कारणं आयुष्यानं दिलं असतानाही, तिनं निरंजनला आयुष्याला हसत हसत जगण्याची कला शिकवली होती.. आयुष्य एकदाच मिळतं.. ते तक्रार करतही जगता येतं आणि मनमुराद आनंद लुटतही घालवता येतं.. यातलं कोणता मार्ग निवडायचा हे आपल्या हातात असतं.. मंजिरीनं यातला दुसरा मार्ग निवडला आणि निरंजनलादेखील त्या मार्गानं जगायला शिकवलं..

पूर्वी आयुष्याच्या तक्रारी करणारा निरंजन आता मात्र त्याप्रकारे जगत नाही.. खूपदा एकटं वाटतं.. मंजिरीची प्रचंड आठवण येते.. तेव्हा तिचं ते शेवटचं पत्र वाचतो.. मनात रुजलेल्या मंजिरीला त्या पत्रानं जणू सूर्यप्रकाश आणि पाणी मिळतं.. आणि त्या मंजिरीतून एक सकारात्मक रोपटं निरंजनच्या मनात जोम धरु लागतं.. त्या एका ‘मंजिरी’मुळे निरंजनला जगण्याचं बळ मिळतं..
समाप्त.

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित