”अच्छा तर हा प्रोजेक्ट हाती घेतलाय चिरंजींवांनी… चांगलंय” बाबा हसले, पण आईला मात्र त्यांनी यातलं काहीच सांगितलं नव्हतं. पुढे दोनदा तिनदा त्यानं केदारच्या नकळत त्याचा पाठलाग केला आणि ही तिच मुलगी असल्याची खात्री करून घेतली.
त्या दिवशी रविवार होता, केदार मित्रांसोबत खेळायला बाहेर गेला होता. आठवड्याभराचे कपडे त्याने धुवायला टाकले. आईने खिसे वगैरे न चाचपता सगळे कपडे मशीनमध्ये टाकले. कपडे धुवून झाल्यानंतर केदारचं पाकिटही आपण धुवायला टाकल्याचं तिच्या लक्षात आलं.
”अरे रे मुलाच्या पाकिटातलं पैसे भिजले असणार, मला मेलीला आधी का सुचलं नाही.” आईनं पाकीट खोलंलं पैसे तर होतेच. पण त्याचबरोबर तिला त्यात जे काही दिसलं त्यानं तिला धक्काच बसला. एका मुलीचे पासपोर्ट साईज पाच सहा फोटो होते त्यात.
”बापरे एका मुलीचे एवढे फोटो” आईनं फोटो बाबांना दाखवले. बाबांनी फोटो पाहिले आणि एकही शब्द न बोलता फक्त हसले. त्यांनी फोटो गोळा केले आणि डायनिंग ठेबलवर मांडून ठेवले. केदार दुपारी घरी आला. बघतोय तर काय समोर मनालीचे फोटो सुकत ठेवले होते. आता काय आपलं खरं नाही आई आणि बाबा चांगलंच फैलावर घेणार असं त्याला वाटलं पण दोघांनीही एक शब्दही काढला नाही. केदारनं पटकन फोटो गोळा केले आणि बॅगेत भरले. जणू काही घडलंच नाही असंच सगळं एकमेकांशी वागत होते. आई बाबांना फोटो पाहून काय वाटलं असेल त्याने मनात विचार केला. त्याला फारच अस्वस्थ वाटत होतं, त्याला मनालीशी बोलायचं होतं. त्याने बाहेर जाऊन मनालीला फोन लावला.

”हॅलो, तुला काहीतरी सांगायचं आहे”
”बोल ना”
”आज घरात जरा विचित्रच प्रकार घडला, तुझे फोटो बाबा आणि आईंनी पाहिले. पाहिले ते सोडच पण डायनिंग टेबलवर मांडून पण ठेवले.”
केदारच्या तोंडून हा प्रकार ऐकून तिला खूपच हसायला आलं ती हसूच लागली.
”तू हास. माझी कसली मजबूत लागली होती तुला माहिती नाही.”
”ओके ओके सॉरी, मग आई बाबा काही बोलले का तुला”

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate first gudi padwa celebrated with family in alibag
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने पहिला गुढीपाडवा ‘या’ ठिकाणी केला साजरा, फोटो शेअर करत गायिका म्हणाली…
Son Of Farmer Placed To Job Pass Goverment Exam While Farming
VIDEO: जिथे संघर्ष तिथे विजय! वडील शेतात असताना लेकाचा रिझल्ट लागला; एकमेकांना मिठी मारुन रडू लागले बाप-लेक
pooja sawant shares beautiful video of her marriage
लेकीच्या लग्नात आईला अश्रू अनावर अन् बाबा…; पूजा सावंतच्या लग्नाला १ महिना पूर्ण! शेअर केला खास व्हिडीओ
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate completed 3 months of marriage shared celebration photos
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला झाले ३ महिने पूर्ण, ‘असा’ साजरा केला दिवस, पाहा फोटो

Love Diaries : तुझा माझा लपंडाव (भाग २)

”नाही ना त्याचीच तर भीती वाटतेय, दोघांनी काही रिअॅक्ट केलं नाही उलटं काही घडलंच नाही असंच दोघं वागत होते.”
”कमाल आहे आई बाबांची. जाऊदे त्यांनी विचारलं नाही ना मग तूही काही बोलू नकोस” मनालीनं आपला उगाचच केदारला सल्ला दिला.
”ठिक आहे” केदार थोडावेळ तिच्याशी बोलला आणि फोन ठेवला.
मनालीचे फोटो घरच्यांच्या हातात लागल्यापासून केदार अधिक सावध वागायचा. त्या दिवशी त्याला मनालीला भेटायचं होतं, पण खूपच उशीर झाला होता. सुट्टी असल्यानं त्यानं तिच्यासोबत पिक्चरला जायचा प्लान केला होता, आईही मैत्रिणीबरोबर बाहेर गेली होती. पण आई गडबडीत असल्यानं घरची कामं तिनं तशीच टाकली होती, केदारला ते पटकन आवरून निघायंचं होतं. बाबा सकाळीच घराच्या बाहेर पडले होत. बाबा एकदा का घरातून बाहेर पडले की संध्याकाळपर्यंत घरी येतंच नाही हे त्याला माहिती होतं, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाच नव्हती म्हणा. सगळा पसारा आवरता आवरता आपल्याला खूपच उशीर झालांय हे त्याच्या लक्षातच आलं नाही. बराच वेळ त्याचा फोन वाजत होता. कामाच्या गडबडीत त्याचं लक्षही गेलं नाही, काही वेळानं त्याने फोनंकडं पाहिलं. मनालीचे १२ मिस्ल्ड कॉल होते. त्याने तिला फोन लावला.

त्यांचं काही ऐकायच्या आधीच मनालीने ओरडायला सुरूवात केली.” अक्कल आहे का मूर्खा. तूला कधीपासून फोन करतेय मी. तुला फोन उचलता येत नाही का? मी घरातून कधीच बाहेर पडलेय तुझी अर्ध्या तासापासून वाट बघतेय मी. कुठे आहेस तू?”
”अगं हो हो किती बोलशील. ऐकून तर घे, आय एम व्हेरी सॉरी मी काम करत होतो. कामाच्या गडबडीत विसरलो.”
”कसलं काम करतोय एवढं. आपल्याला पिक्चरला जायचं आहे विसलास का? मला ते काही माहिती नाही तू आत्ताच्या आता इथे ये”
”मनाली एकून घे अगं… आई बाबा दोघंही घरात नाहीत. घरात पसारा आहे तो आवरत होतो. मी अजून आंघोळही केली नाही. तू असं करतेस, तू घरी जा किंवा बस स्टॉपवर थांब मी सगळं आवरून येतो अर्ध्या तासांत ”
”अजिबात नाही. मी घरी जाणार नाही आणि बस स्टॉपवर थांबण्याचा प्रश्नच येत नाही. तिथं लोकं भलत्याच नजरेनं बघतात.”

”मग तू कॉफी शॉपमध्ये बस प्लीज.”
”अजिबात नाही. तू येणार आहेस की नाही ते सांग. मी आधीच तूझी खूप वाट बघितली. आता मी वाट बघणार नाही.”

”अगं राणी ऐक ना माझं प्लीज.”
”नाही, मला तूझा खूप राग आलाय, मी कुठेही थांबणार नाही. तुझ्या घरी कोणी नाही ना तसंही. मी तुझ्याच घरी येते”

Love Diaries : तुझा माझा लपंडाव

”नको प्लीज माझ्या घरी नको”
”का नको, मी दुसरीकडे कुठं थांबणार नाही आधीच सांगून ठेवते तुला आणि मी आले तर काय फरक पडतोय, कोणाला कळणार आहे आणि तसंही आई बाबा नाहीच आहेत ना. तू आंघोळ कर मी बसते बाहेर”
”हे बघ तू असं काहीही करणार नाहीस प्लीज… मला अडचणीत आणशील तू”

”ते काही मला माहिती नाही. मी येतेय” मनाली खूप हट्टी आहे आणि ती सांगून ऐकणारी नव्हती हे केदारला माहिती होतं.
पुढच्या दहा मिनिटांत मनाली केदार राहतो त्या कॉलनीत पोहोचली. पण केदारची विंग कोणती हे काही तिला कळलं नाही.
खाली असलेल्या एका व्यक्तीला तिने विंग विचारली आणि पटकन जिने चढत वर पोहोचली. तिला पाहून बिल्डिंगखालची ती व्यक्ती गालातल्या गालात हसली.
केदारच्या दरवाज्याची बेल वाजली. त्यानं दरवाजा उघडला, बघतो तर काय समोर मनाली.
”तू”
”हा मग अजून कोणी येणार होती का?” तिला पाहून केदारला धडकीच भरली.
त्यानं हात पकडून तिला आत ओढलं.
”तुला सांगितलेलं ना मनाली इथे नको येऊ. तू ना एक नंबरची हट्टी आहेस”
”मग मी उन्हात तुझी वाट बघत उभी राहू का?”
तिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नव्हता केदारला कळलं होतं, त्यानं तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
”तुला कोणी येताना पाहिलं नाही ना? आणि तुला पत्ता बरोबर कसा कळला?”
”नाही पाहिलं कोणी रे बाबा मला, किती मोठी कॉलनी आहे ही मला काही कळतंच नव्हतं, एका काकांना विंग विचारली मी फक्त, कुठे जातेय हे सांगितलं नाही, त्यामुळे फारसं काही फरक पडत नाही. चील यार”
”तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस मनाली”
”तू जा आवर आधी. मी बसते”
”ओके मी पटकन आंघोळ करून येतो, तू टिव्ही बघ तोपर्यंत”
केदार बाथरूममध्ये निघून गेला. आंघोळ करून केदार बाहेर आला. कमरेभोवती त्यानं टॉवेल गुंडाळलं होतं. जीममध्ये जाऊन केदारचं शरीर पिळदार झालं होतं, त्याला तसं पाहून मनाली लाजली. तसं दोघंही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतेच पण एकमेकांच्या जवळ येण्याची संधी दोघांनाही मिळाली नव्हती. केदारला पाहून मनाली राहवलं नाही ती त्याच्या जवळ गेली, ”छान दिसतोय असाही” ती लाजून म्हणाली.

”हो का” त्यानं तिला कमरेला पकडून जवळ ओढलं. तुही छान दिसतेय. त्याने तिला किस केलं. मनालीने आपले दोन्ही हात केदारच्या कमरेभोवती धरले आणि त्याला मिठी मारली. दोघंही एकमेकांना किस करण्यात मग्न होते एवढ्यात दरवाज्याची जोरात बेल वाजली. एकदा नाही तिनदा. ”आता कोण आलं असेल आई बाबा तर नसणार मग कोण?”
”कुरिअरवाला वगैरे असेल, डोन्ट वरी कोणी नाहीय तू थांब इथेच आलो मी”
तो दरवाज्याकडे गेला मॅजिक आयमधून बाहेर कोण उभं आहे ते त्याने पाहिल्यावर तो तिथेच गार पडला. कारण बाहेर बाबा उभे होते. आता झालं कल्याण संपलोच आपण. एकतर टॉवेलवर त्यातून मनाली घरात आता काही खरं नाही तो धावत बेडरूमध्ये गेला. ”मनाली मेलो आपण. बाबा आलेत बाहेर”
”काय” हे ऐकून मनाली तर थरथरायलाच लागली.
”मी आता काय करू, मला भीती वाटतेय केदार”
”शू शांत. तू लप कुठेतरी आत. मी बघतो”
मनालीला काही सुचेना ती टॉयलेटमध्ये जाऊन लपली.
केदारने थरथरत दरवाजा उघडला.
”काय रे एवढा वेळ का दरवाजा उघडायला, झोपलेलास की काय”
”नाही आंघोळ करत होतो”
बाबांनी रागानं केदारकडं पाहिलं.
”तुम्ही या वेळी कसे आलात, बाहेर गेलेलात ना? मग लवकर कसे आलात?”
”तुला त्रास झाला का मला बघून?” बाबा रागात त्याच्यावर ओरडले.
आत शिरताच त्यानं इथे तिथे पाहायला सुरूवात केली. ते काहीतरी शोधत आहे हे केदारच्या लक्षात आलं. ”काय हवंय का तुम्हाला? मी शोधून देतो?”
”ते मी बरोबर शोधतो तू जा कपडे घाल आधी”
पण केदार काही जागचा हालत नव्हता, मनाली त्यांच्या नजरेस नको पडू दे एवढीच प्रार्थना तो देवाला करत होता.
”काय रे ती चप्पल कोणाची आहे बाहेर” बाबांनी केदारला विचारलं

”अ अ अ.. आईच्या आहेत वाटतं”
”आपण मनालीला तर लपवलं पण तिची चप्पल लपवायचं आपल्या कसं काय लक्षात आलं नाही” तो पुटपुटला.

”तुझी आई दिवसेंदिवस तरूण होत चाललीय, मुलींसारख्या हिल्स घालायला लागलीय.”
”अ अ अ……” केदारच्या तोंडून पुढचं शब्द फुटलेच नाही आपलं खोटं आता पकडलं गेलंय त्याला समजलं.
”तू जा कपडे घाल. सांगितलेलं कळत नाही का तुला?” बाबा खूपच रागात होते.
बाबा हॉलमधून आता थेट किचनमध्ये शिरले तिथे मनाली तर एवढी घाबरली होती की इथून जर सुखरूप बाहेर पडले तर केदारच्याच काय पण इतर कोणाच्याही घरी जाणार नाही अशीच तिने शप्पथ घेतली. टॉयलेटच्या दरवाज्यामागे उभी राहून ती प्रार्थना करत होती, हात तर एवढे थरथरत होते की विचारायची सोय नाही, असं कोणा मुलाच्या घरात आपण पकडलं गेलो तर काय इज्जत राहिली आपली तिला कल्पना करूनच रडायाला येत होतं.
बाबा जे काही शोधत होते ते त्यांना मिळतच नव्हतं, शेवटी त्यानं टॉयलेटकडं आपला मोर्चा वळवला. एवढ्यात केदार जोरात ओरडला.

”थांबा”
”काय रे काय झालं? ओरडायला?” बाबांनी विचारलं. बाबांचा एक हात टॉयलेटच्या हँडलला होता. काही सेंकद आणि आपला खेळ खल्लास. केदारला पटकन कल्पना सुचली.
”मला टॉयलेटला जायचंय, मला जोरात कळ आलीय” त्यानं धावत जाऊन बाबांना बाहेर केलं आणि तो टॉयलेटमध्ये शिरला. मनाली बाहेरून सगळं ऐकत होती, भीतीने आता ती चक्कर येऊन खाली पडायची बाकी होती.
केदारने आत शिरून तिच्या तोंडावर हात धराला, ती रडायला सुरूवातच करणार होती.
”शू शू ..रडू नकोस मी आहे. काही होणार नाही” केदार अगदी हळू आवाजात तिच्या कानात म्हणाला. काही होणार नाही असं जरी बोललं असलो तरी बरंच काही होणार होतं, हे त्याला माहिती होतं.
तो पाच एक मिनिटं बाहेर येतच नव्हता. बाबा नावाचं संकट दत्त बनून बाहेर उभं होतं.
”अरे येतोय ना की झोपलास?”
”हा हा”
”आता आपला लंपडाव संपला, आपण आऊट होणार ” अशाही परिस्थितीत आपल्याला फाल्तू विनोद कसे काय सुचू शकतात त्यालाच आश्चर्य वाटलं.
त्याने हातानेच मान कापण्याचा इशारा केला आणि सगळं संपलंय असं मनालीला सांगितलं. तिनं तोंड दाबून आपलं रडू पुन्हा कसं बसं आवरलं.
एवढ्यात काय चमत्कार झाला कोणास ठावूक, बाबांचा बाहेरून आवाज आला.
”तू बस आतच. मी जातोय खाली, देशमुख काका वाट बघतायत. मूर्ख कुठचा. दरवाजा ओढून घेतलाय नंतर नीट लॉक करून बाहेर जा”
दोघांनाही देव पावला. केदारने दरवाज्याला कान लावले. बाहेरचा दरवाजा बंद झाल्याचा त्याला आवाज आला.
”हुश्श गेले.” त्यानं मनालीला मिठी मारली.
”चल ते पुन्हा यायच्या आत तू निघ आधी” त्यानं टॉयलेटचा दरवाजा उघडला आणि मनाली पटकन बाहेर पडली ती हॉलच्या दिशेन पळत सुटली ती बाहेर आली आणि बघते तर काय केदारचे बाबा कमरेवर हात ठेवून दत्त म्हणून उभेच होते. ते बाहेर गेलेच नव्हते त्यांनी फक्त बाहेर जाण्याचं नाटक केलं होतं. केदारला तर आता धरती फाटावी अन् मला तिने पोटात घ्यावं असंच झालं होतं.
”ब ब…ब.. बाबा” एवढंच काय ते तोंडून फुटलं.
”बाबा” मनालीला आणखी एक धक्का बसला. तिनं खाली ज्या व्यक्तीला पत्ता विचारला होता ते केदारचे बाबाच होते हे तिला आता कळलं.
”अच्छा तर आई बाबा घरात नसताना तुमचं असं सुरू असतं तर सगळं” बाबा जोरात ओरडले. त्यांच्या आवाजाने तर मनाली थरथरू लागली.
”मी हिला खालीच बघितलं तेव्हाच समजून गेलो ही तीच पासपोर्ट फोटोतली आणि तोंडाला स्कार्फ बांधून तुझ्या मागे बसते ती” बाबांनी केदारजवळ येत सांगितलं.

”हिला वर येताना पाहिलंच मी. फक्त कुठे लपून बसली होती ते कळतं नव्हतं, आता बरोबर चोरी पकडली गेली तुमची.” बाबा आणखी गंभीर झाले.
”काय गं काय नाव तुझं” त्यांनी आपला मोर्चा मनालीकडं वळवला.
ती काहीच बोलली नाही ती एवढी घाबरली होती की शब्दच फुटतं नव्हते.
”आता बोलतेस का की देऊ एक रपाटा” हे ऐकल्यावर केदार घाबरला.
”तुम्ही तिला अजिबात हात लावायचा नाही” केदार मध्ये पडला.
”गप रे! मी बोलतोय ना तिच्याशी. तिकडे शांत उभा राहा नाहीतर तुलाही एक ठेवून देईन. नाव सांग ग तुझं.?”

”मनाली” तिनं रडत उत्तर दिलं.
”काय ग घरच्यांनी हेच शिकवलं का तुला? चांगल्या घरातली दिसते आणि अशी काम करते. कुठे राहते तू?”
”नाही काका…” मनालीला आता रडू आवरतं नव्हतं आपली काहीच इज्जत राहिली नाही ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती.

”कुठे राहतेस ते सांगतेय” बाबांचा आवाज आणखी चढला.
”इथेच”
”इकडे आमच्या घरात काय करतेस? तुझ्या घरच्यांना माहितीय एका मुलाच्या घरात तू आहेस ते?”

”बाबा तुम्ही समजता तसं काही नाही” केदार सगळं शांत करण्यासाठी मध्ये पडला.
”ए तूला सांगितलं ना गप्प बस म्हणून, एक शब्द मध्ये बोलायचा नाही”
”फोन दे तुझा” बाबांनी मनालीच्या फोनकडे बोट दाखवत म्हटलं.
”तुझ्या घरी फोन लाव आत्ताच्या आता. तुझ्या आई बाबांना फोनच करुन सांगतो त्यांच्या मुलीचे काय चालू आहे ते”
हे ऐकताच मनाली एवढी घाबरली की ती आणखी जोरजोरात रडू लागली.
”काका प्लीज घरी काही सांगू नका, प्लीज मला माफ करा. प्लीज आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही. माझ्या घरी कळलं तर आई बाबांना खूपच वाईट वाटेल. माझं चुकलं पण माझ्या चुकीसाठी आई बाबांना ऐकवू नका प्लीज. मी तुमच्या पाया पडते.”

”हे सगळं करण्याआधी तू आधी विचार करायला हवा होतास मनाली. तू फोन लावतेस का मी शोधून काढू घर”
”केदार समजाव ना बाबांना तुझ्या. प्लीज मी माफी मागतेय ना त्यांची”
केदारच्या बाबांनी खिशातला मोबाईल काढला आणि फोन लावला.
”जिथे असाल तिथून तडक घरी निघून या. मुलाने मोठे दिवे लावलेत तुमच्या” त्यानं केदारच्या आईला फोन केला होता.
”तुझ्याकडे अर्धा तास आहे. आई वडिलांना फोन कर तुझ्या आणि इथे बोलावून घे नाही तर तुम्ही काय केलंत ते तुझ्या घरी जाऊन सांगू विचार कर”

सोफ्यावर बसून मनाली फक्त रडत होती, त्यापेक्षा आणखी अर्धा तास उन्हात उभं राहिलं असतं तर बरं झालं असतं. हे काही घडलंच नसतं. तिला वाटू लागलं होतं. केदार अजूनही टॉवेल गुंडाळून उभा होता.
घरातलं वातावरण खूपच टाईट होतं. बाबा एवढा गंभीर चेहरा करून बसले होते की त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हालत नव्हती. एवढ्यात दरवाज्याची बेल वाजली आणि शांतता भंगली.
केदारची आई घाईघाईत आत आली. ”काय हो काय झालं एवढं तातडीनं का बोलावून घेतलं?” तिनं पाहिलं तेव्हा केदार टॉवेल गुंडाळून उभा होता. सोफ्यावर एक मुलगी रडत बसली होती.
”हा काय असा उभा आहे उघडा आणि ही मुलगी कोण”
”विचारा लेकाला. आपण घरात नाही म्हटल्यावर काय दिवे लावत होता ते विचारा” घरात काय झालंय याचा अंदाजा आईला आलाच. तिनं रागानं केदारकडं पाहिलं, त्यानं मान खाली घातली.
”चल हिच्या घरी. ही पोगरी काय घरातल्यांना फोन लावत नाही. हिच्या घरीच जाऊन सांगूया चल.” बाबा उठले. त्याबरोबर मनाली आणखी जोरात रडू लागली. ती सोफ्यावरून उठली आणि तिने केदारच्या बाबांचे दोन्ही पाय पकडले.
”बाबा प्लीज तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे पण प्लीज माझ्या आई बाबांना यात ओढू नका.” तिला असं बाबांच्या गयावया करताना पाहून केदारलाही रडू आलं. त्यानंही बाबांचे पाय धरले,
”बाबा माझं चुकलं, प्लीज जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. मनालीला नको.” दोघांनीही खाली मान घालून बाबांचे पाय पकडले होते. बाबांनी आईकडे पाहिलं आणि जोरजोरात हसू लागले. मनाली आणि केदारला काही कळलंच नाही. बाबा आणखी जोरात हसू लागले. त्यात आईही सामील झाली. हे दोघंही राक्षसासारखे का हसतात केदार आणि मनालीने थोडा धक्का लागल्यासारखं डोळे पुसत वर पाहिलं.
”अहो सूनबाई उठा आता, पुरे झालं रडणं. म्हटलं जरा गंमत करू तुमची, म्हणून जरा खेचत होतो, फार रडवलं असेल तर माफ करा आम्हाला” बाबांनी मनालीच्या खांद्याला पकडून वर उचललं. केदारही उठला बाबांनी दोघांनाही मिठी मारली.
”बाकी सून बाई छान आहेत हो केदार, थोड्या भित्र्या आहेत पण आईला आणि मला पसंत आहे मुलगी” केदारच्या पाठीवर थाप मारत बाबा म्हणाले.
”मुलांनो तुमचा लपंडाव आम्हाला माहिती होता बरं का? तुही काही आम्हाला सांगायला तयार नव्हता तर म्हटलं जरा मस्करी करून तुला घाबरवू” आई म्हणाली.

मनालीची कळी पटकन खुलली, प्रेमाचा लंपडाव खेळता खेळता आपण पकडलं गेलो असलो तरी तो खेळताना जी काही मज्जा आली ती तिला खूपच आवडली होती.
(समाप्त)
– तीन फुल्या, तीन बदाम