”केदार जाना सोन्या जरा बाजारातून टोमॅटो घेऊन ये ना!” आईनं किचनमधून हाक मारली. केदारनं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं.

”जा ना रे सोन्या! असं काय करतोस? जा तुला मस्त सूप करून देते टोमॅटोचं”
”आई प्लीज.. तूच जा बाजारात, मला असलं काहीतरी सांगू नकोस..” केदारने टिव्हीचा रिमोट सोफ्यावर आपटला.
आई ऐकणार थोडीच होती. तिनं केदारच्या मागे तगादाच लावला.
”माझे हात पाय आता दुखतायत. तू आणि तुझे बाबा जराही मला मदत करत नाही. तुझ्यापेक्षा मुलगी असती ना मला, तर तिने घरची दोन काम तरी केली असती आपल्या आईला त्रास होतोय बघून. तुमची कामं करण्यात माझा दिवस जातो आणि तुला माझं एक साधं कामही करता येत नाही का? तुला जेवण बनवायला थोडंच सांगतेय. टोमॅटोच तर आणायला सांगतेय.” आता आईचं असं बोलणं केदारला काही नवं नव्हतं, तो नेहमीच या बोलण्याकडं कानाडोळा करायचा. पण यावेळी आईच्या बोलण्यानं तो पाय आपटत उठला.
”दे पिशवी… काय आणायचंय?”
”हे घे एक किलो टोमॅटो, लिंबू, मिरची आणि जरा येताना कांदे, बटाटेपण आण” आईनं मोठी पिशवी दिली.
”एक मिनिट.. आधी टोमॅटो म्हणाली होतीस आता ही यादी कसली” केदार वैतागला.
”आता तू जातोच आहेस तर प्लीज तेवढं पण घेऊन ये ना!” आईनं पाचशेची नोट आणि पिशवी केदारच्या हाती दिली.
”हे शेवटच. यापुढे तुझं एकही काम मी ऐकणार नाही” केदारने अॅक्टिव्हाची चावी खिशात ठेवली. केदारनं आरशात पाहिले केस स्पाइक्स करण्यात पुढची पाच मिनिटे घालवली.

ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
3 April 2024 Panchang Horoscope Today
३ एप्रिलचे १२ राशींचे भविष्य व पंचांग: वृषभ, सिंहसह ‘या’ राशींचा आजचा दिवस असेल आनंदी; तुमची रास काय सांगते?
Today is Dhulivandan or Rang Panchami Different Types of Holi
आज धूलिवंदन आहे की रंगपंचमी? दोघांमधील फरक व धुळवड कशी साजरी केली जाते, जाणून घ्या

”अरे बाजारात जातोयस तू, मुलीला बघायला नाही. काय नटतोय जा ना लवकर” आई किचनमधून ओरडली.
”हो बघतात मला मुली बस” केदार उलट उत्तर देत बाहेर पडला. केदार बोलत होता ते खरंही होतं म्हणा. त्याने पांढरा टी-शर्ट त्यावर नेव्ही ब्लू रंगाची शॉर्ट्स घातली होती. केदार उंच होता चांगला सहा फूट. सावळा होता पण दिसायला रुबाबदार होता, जिममध्ये जाऊन बॉडीही बनवली होती. त्याने स्लिपर्स पायात चढवल्या आणि गाडी सुरू करून बाजारात पोहोचला. पहिल्यांदा तो बाजारात आला. गाडी बाजूला पार्क करून तो समोर बसलेल्या भाजीवाल्याकडे गेला.
”अरे भिंडी इतनी ज्यादा? भैय्या ठिकसे भाव लगाओ. मै पाव किलो का सिर्फ पंधरा रुपये दुँगी.” एक मुलगी भाजीवाल्यासोबत भाव करत होती. शॉर्ट जीन्स, टी-शर्ट आणि केस वर बांधलेली पंचवीस एक वर्षांची मुलगी पाठमोरी उभी होती. तिच्या हातात आधीच पिशव्या होत्या. केदारला थोडं आश्चर्य वाटलं
”आज-कालच्या मुलींना भाज्यावगैरेमधलं काय कळतं” तिथं फारशी गर्दी नव्हती म्हणून त्याने त्याच भाजीवाल्याकडून भाजी घ्यायची ठरवली.
”अरे भैय्या ये पाव किलो है क्या? जरा ठिकसे करो वजन. और इसमे थोडी और भिंडी भी डालो.”
”अरे बिटिया ज्यादाही दिया है तुम्हे. और डालूँगा तो कमाऊंगा क्या?” भाजीवाला तिच्यावर वैतागला होता.
”हां ठिक है, और ये बडे गोभी के मै २० रुपयेही दुँगी. उससे उपर एक भी रुपयाँ नही दुँगी”
ती मुलगी कशी भाव करते हे केदार ऐकत होता.
”हा बोलो बेटा तुम्हे क्या चाहिये?” भाजीवाल्यानं आपला मोर्चा केदारकडे वळवला.
”वो टोमॅटो दे ना एक किलो” त्यानं बोट दाखवत म्हटलं, त्याबरोबर भाजीवाल्याने एक टोपली त्याच्या पुढ्यात सरकवली.
”ये लो इसमे डाल दो.”
केदारने भाजीवाल्याकडे पाहिले, ”याला आता काय सांगू मला टोमॅटो घेता येत नाही,” पण पर्याय नव्हता त्यानं समोर ठेवलेले टोमॅटो उचलायला सुरूवात केली. त्याबरोबर शेजारी उभी असलेली ती मुलगी हसली, ”ते कच्चे टोमॅटो आहेत, पिकलेले मध्यम आकाराचे टोमॅटो उचल, हे बघ असे” तिने एक टॉमेटो केदारच्या टोपलीत ठेवला. केदारला भाजीतलं काही कळत नाही हे तिच्या लक्षात आलं. केदारने तसेच टोमॅटो निवडले आणि भाजीवाल्याच्या हातात टोपली दिली. ”भैय्या कितना हुआ?”
”४०”
केदारनं खिशात हात घालून काहीही न बोलता शंभरची नोट काढून दिली. त्याबरोबर त्या मुलीनं केदारकडे पाहिले. डोळे मोठे करत तिने नकारार्थी मान हलवली. तो भाजीवाला जास्त पैसे सांगत आहे हे तिला सुचवायचे होतं. केदारला तिचा इशारा पटकन कळला.

त्याने नोट हातातच ठेवली. ”भैया चालीस ज्यादा है कम करो” पण नेमकं किती सांगायचं त्याला कळत नव्हतं. ”अच्छा चलो पैहतीस देदो” असं म्हणत भाजीवाल्यानं त्याला सुट्टे पैसै देण्यासाठी खिशात हात घातला. त्यानं पुन्हा तिच्याकडं पाहिलं. तिनं पुन्हा नकारार्थी मान डोलवत तीन बोटं दाखली. तीस रुपये असं तिला सुचवायचं होतं. ”पैहतीस नहीं तीस लेलो” केदार आता अधिक आत्मविश्वासाने म्हणाला. भाजीवाल्यानं आढेवेढे न घेता टोमॅटोची पिशवी त्याच्या हातात दिली. ती केदारकडे पाहून हसली, केदारनं तिला छोटीशी स्माईल दिली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला नसला तरी नजरानजरेच्या खेळात दोघंही बरंच काही बोलून गेले होते. तिनं आपल्या पिशव्या उचलल्या आणि ती पुढे निघून गेली. केदार तिला पाहून पुन्हा हसला. ”केवढीशी आहे ती, किती नाजूक. आणि आपल्या वजनापेक्षा जरा जास्तच पिशव्या तिने उचलल्या आहेत.” आपल्याला आलेला पहिला वहिला अनुभव त्याला खूपच आवडला होता. ”बाजारात येणं एवढंही काही वाईट नसतं.” तो मनातल्या मनात पुटपुटला.

त्यानं बाईकला पिशवी अडकवली आणि गाडी सुरू केली. त्याच्या चेहऱ्यावरची लाली जात नव्हती, त्यानं साईड मिररमध्ये स्वत:ला पाहिलं आणि स्वत:शीच हसला. तिचे तपकिरी रंगाचे डोळे त्याला खूपच आवडले होते.
”नैनों की चाल है, मखमली हाल है नीची पलकों से बदले समां
नैना शरमाये जो या आँखे भर आये जो थम के रुक जाए दोनों जहां
रब की नैमत है तेरी निगाहें
जिसमें बसती हैं उसकी दुआएं
ऐसे नैनों की बातों में कोई क्यूँ न आये
हो तेरे नैना, तेरे नैना, तेरे नैना रे तेरे नैना, तेरे नैना, तेरे नैना रे ”
गाडीचा वेग वाढवून तो असाचं जोरजारोत गाणं म्हणतं होता. त्यानं गाडी खाली पार्क केली आणि घरी आला. आईच्या हातात सामान दिलं आणि पुन्हा सोफ्यावर पाय ठेवत टिव्ही ऑन केला. आईला थोडं आश्चर्य वाटलं. केदार आल्यावर कटकट करेल तिला वाटलं होतं पण साहेबांचा मूड तिला थोडा बदलेला दिसला. ”अरे वा सोन्याने एकदम बरोबर टॉमेटो आणलेत, कसं समजलं रे तुला?”
”आई डोन्ट फरगेट आय एम टू स्मार्ट, उद्यापासून काही बाजारातून आणायचं असेल तर मला सांगात जा”
आई फक्त हसली.

पुढचे दोन तीन दिवस असेच गेले. त्या दिवशी बाजारातल्या रस्त्याने केदार परतत होता, तेव्हा पुन्हा त्याला ती मुलगी दिसली. त्या दिवशी सारख्याच हातात पिशव्या, पण यावेळी जरा जास्तच पिशव्या तिच्या हातात होत्या. पुन्हा भाज्यांचे भाव कमी करण्यासाठी त्याच भाजीवाल्यासोबत तिची खटपट सुरू होती. ”या मुलीपण ना! भाव करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही हे साले भाजीवाले आम्हाला कायच्या काय किंमती सांगतात आणि मुलींना बरं देतात भाव कमी करून” केदार पुटपुटला. ती पैसे देऊन वळली एवढ्यात तिच्या हातून एक पिशवी खाली पडली. ती इतर मुलींसारखीच जोरात ओरडली ”ओ शीट” त्याबरोबर केदारने तिच्याकडे पाहिलं, कांदे बटाट्यांच्या वजनांनी तिची प्लॅस्टिकची पिशवी फाटली होती. रस्त्यावर कांदे बटाटे पडले. हातातल्या पिशव्या खाली ठेवून तिने ते त्रासिक चेहऱ्याने भरायला सुरूवात केली.

केदारने गाडी बाजूला थांबवली आणि तिच्या मदतीला तो धावून गेला. त्यानं एक एक कांदा बटाटा उचलून दुसऱ्या पिशवीत ठेवला. आपल्याला कोण मदत करतोय हे पाहायलाही तिने वर बघितलं नाही. मोकळे सोडलेले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. त्यामुळे तिचा चेहरा त्याला नीट पाहता आला नाही. दोन्ही हाताने ती पटापट कांदे बटाटे पिशवीत भरत होती. ती फारच वैतागली होती. एकदाचं सगळं भरुन झाल्यावर तिनं मान वर करून पाहिलं आणि चेहऱ्यावर आलेले केस तिने अलगद बाजूला केले. आज पहिल्यांदा केदारला तिला खूप जवळून पाहता आलं होतं. स्टाईलीश दिसावं म्हणून तिनं डोळ्यावर बहुदा मोठ्या फ्रेमचा चष्मा लावला होता, कारण त्या दिवशी तिने चष्मा लावला नव्हता हे केदारला स्पष्ट आठवलं. चौकटीचा पांढरा आणि मरिन ब्लू रंगाचा शर्ट त्यावर डेनिम जीन्स. छानच दिसत होती ती. रस्त्यावरून उठत उभी राहिली, ”hey thanks a lot” तिने खाली ठेवलेल्या पिशव्या उचलत केदारकडे पाहिलं आणि हलकीशी स्माईल दिली. बेबी पिंक रंगाचं लिप ग्लॉस लावलेल्या तिच्या नाजूक ओठांकडे केदारचं लक्ष गेलं. तो हसला, केदार कुठे बघतोय हे पटकन तिला कळलं आणि तिनं आपली मान घातली. ”excuse me” म्हणत ती बाजूला होऊन पुढे निघून गेली.

”शीट यार तिला काय वाटलं असेल? मी तिच्याकडे असं पाहत बसल्यावर. तिला मी थर्ड क्लास वाटलो असेल” तो मनात म्हणाला आणि गाडी चालवत घरी आला. बाजारात दिसलेली ती मुलगी त्याला का कोण जाणे खूपच आवडली होती. पुढे दोन तिनदा त्याला ती दिसली, त्याच भाजीवाल्याकडे. ही इथेच कुठेतरी राहत असणार आणि याच भाजीवाल्याकडे भाजी घेत असणार हे त्याला कळलं होतं. बाजारात जाण्याचं निमित्त तो करत होता. अधून मधून ती त्याला दिसत होती नेहमीसारखी हातात भाज्यांच्या पिशव्या घेऊन, तिला पाहिलं की त्याची कळी खुलायची. असं किती दिवस तिला चोरून चोरून बघणार आपण, हा लपंडाव अजून किती दिवस चालणार, आज तिच्याशी काही करून बोलूया आणि ओळख काढूया असा निश्चय त्याने केला. त्यादिवशीही ती भाजीवाल्याकडे होती, तो उगाचच भाजी घेण्याच्या निमित्तानं तिच्याकडं गेला. भैय्या आधा किलो भिंडी देना! अपेक्षेप्रमाणे भाजीवाल्यानं टोपली त्याच्यापुढे सरकवली, ”मुझे नही पता आपही दे दो” तिच्या कानावर ते पडलं पण तिने फार लक्ष दिलं नाही. आपला प्लान फसला, त्यामुळे त्याचा चेहरा पडला. ‘पण शेवटंच एक ट्राय करण्याचं त्याने ठरवलं. ”आई मला बाजारात पाठवते. कधीकधी मला काय घ्यायचं हे कळतं नाही पण आईचं मन मोडवत नाही मला” त्याने एक इमोशल डॉयलॉग फेकून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

ती हसली. आता त्याचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढला.
”भाजी घ्यायची म्हणजे फार काही रॉकेट सायन्स नाही.” तिच्या रुपाप्रमाणे तिचा आवजही फार गोड होता. तिने त्या दिवशीसारखी भिंडी निवडून त्याला दिली. त्याने पैसे दिले.
”हाय थॅक्स बाय दे वे आय अॅम केदार”

”आय एम मनाली”
”ओ नाइस नेम, तुला एक विचारू?”
”हो विचारना.” तिनं हातातल्या पिशव्या उचलल्या
”मी तुला अनेकदा बाजारात पाहिलंय, तुझ्याकडे बघून अशी टिपिकल मुलींसारखी बाजारात वगैरे येणारी वाटत नाहीस”
”म्हणजे मला समजलं नाही”
”आय मिन टू से बाजारात आंटी टाईप मुली येतात ना? ”
हे ऐकून ती जोरात हसली.
”अरे काही काय, बाजारात आल्यावर कोणी आंटी होत नसंत. मला आवडतं खूप. आणि तशीही आई किती करणार ना. एवढं बाजारात फिरायचं, सामान घ्यायचं, तिचेही हात पाय दुखतात ना. ती बिचारी किती करते माझ्यासाठी आणि बाबांसाठी. मी तिला छोटी मोठी मदत नक्कीच करू शकते.” केदारला त्या दिवशीचं आईचं ते बोलणं आठवलं. तो हसला. ”तू इथेच राहतेस का ?”
ती केदारला ओळखत नव्हती, अशा अनोळखी व्यक्तीला कसं सांगायचं म्हणून ती काहीच बोलली नाही, तिनं केदारकडं पाहिलं. केदार तिला चांगला मुलगा वाटला म्हणून थोडा विचार करून तिने उत्तर दिलं ”हो इथेच राहते” आजच्यापुरता एवढं बसं झालं नाहीतर हिला गैरसमज व्हायचा म्हणून केदार तिला बाय म्हणत निघाला.

”मनाली… मनाली…” तिचं नाव दोनदा तिनदा त्यानं मनात घोळवलं आणि तो घरी आला. त्यानं फेसबुक ऑन केलं आणि मनाली असं नाव टाकून सर्च केलं. किमान पन्नास एक मनाली त्याला दिसल्या आता त्यात तिला कुठं शोधायचं, त्याने प्लेसप्रमाणे सर्च करून पाहिलं आणि खूप काही मिळवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. त्याला बाजारात दिसणारी मनाली तिच होती. फोटोवरून त्यानं ओळखलं, आपल्या शाळेतला एक म्युच्यअल फ्रेंडही त्याला तिच्या लिस्टमध्ये दिसला तिच्यासोबत त्याचे एक दोन फोटोही अकाऊंटमध्ये होते. अच्छा तर आपला मित्र हिच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. केदार हसला आणि लॅपटॉप बंद केला. मनालीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्याला सापडला. आपल्या जुन्या मित्राकडे जाण्याच्या निमित्तानं त्याला मनातील प्लान पूर्ण करायचा होता. दोन-तिनदा तो आपल्या मित्रांच्या बिल्डिंगमध्ये गेला पण मनाली त्याला काही दिसली नाही, एक दिवस मित्रासोबत खाली उभा असताना मनाली त्याला दिसली. केदारला आतून खूपच बरं वाटलं. पण उगाचच मनाली इथे राहत असल्याचं आपल्याला माहिती नाही असं दाखवतं तो म्हणाला ”हाय तू इथे?”
”हो मी इथेच राहते ना! ओ अच्छा माझा शाळेतला मित्र इथे राहतो ना!अमेय”

”अमेय का? माझा चांगला मित्र आहे तो” ती म्हणाली. ”चल निघते आई वाट बघत असेल”
पुढे वरचेवर केदार अनेकदा मनालीच्या बिल्डिंगमध्ये आला त्याने अमेयच्या मदतीने मनालीशी ओळख वाढवली होती. आता मनाली त्याची चांगली मैत्रीण झाली होती. अनेकदा अमेय आणि केदारसोबत मनाली बाहेर फिरायला जायची. त्यांना भेटून आता तीन महिने झाले होते. केदारला विषय मैत्रीपलीकडे न्यायचा होता. तिच्याजवळ आपल्या प्रेमाची कबुली द्यायची होती. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं हे तिला मिठीत घेऊन त्याला सांगायचं होतं. मनालीच्या एकंदर वागण्यावरून तरी तिला आपण आवडतो एवढी कल्पना त्याला नक्कीच आली होती. आता फक्त तिला प्रपोज करुन त्याला खात्री करून घ्यायची होती. त्यानं तिला दोन दिवसांनी प्रपोज करायचं ठरवलं पण त्याला असं काहीतरी हटके करायचं होतं, गुलाबाचं फूल वगैरे देऊन किंवा डिनर डेटला घेऊन जाऊन सगळेच प्रपोज करतात पण मनालीसाठी आपण वेगळं काहीतरी करूया, हा विचार त्याच्या डोक्यात सारखा येत होता. एवढ्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. त्याने अमेयकडून मनालीचा नंबर घेतला.
क्रमशः
– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित