”चालेल भेटू आपण ” परागने ऋतूजाला मेसेज टाईप केला.

”जाऊ दे. जे होईल ते होईल, मी काही चुकीचे करत नाही, ना वर्धाला फसवत आहे ” परागने ऋतूजाच्या रिप्लायची वाट न बघता मोबाईल स्विच ऑफ करून बाजूला ठेवाला. डोळे मिटले आणि झोपी गेला.
सकाळी फोन ऑन केल्या केल्या वर्धाचे मेसेज होते. पराग रिप्लाय देणार इतक्यात वर्धाचा फोन आला.

Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

”अरे काय हे सकाळपासून किती फोन केले, फोन का स्विच ऑफ करून ठेवलास?”

”अगं सॉरी रात्री फोन चार्ज करायला विसरलो, फोन स्विच ऑफ झाला असेल”

काहीतरी खोटं बोलून परागने वेळ मारून नेली. ”का नाही आपण खरं सांगितलं तिला?”

रात्री अचानक आलेला ऋतूजाचा मेसेज आणि आपण वर्धाशी बोललेलं खोटं त्याला सारखं छळत होतं, कशातही लक्ष लागत नव्हतं. परागने पटापट तयारी करून ऑफिस गाठलं. काल आलेले ऋतूजाचे मेसेज त्याने वाचले नव्हते. शेवटी न राहून त्याने ते मेसेज वाचले. ऋतूजाने आज त्याला भेटायला बोलावले, त्यांच्या आवडत्या कॉफी शॉपमध्ये.

परागने आपला लॅपटॉप ऑन केला. ऋतूजाला सध्या तरी रिप्लाय देणं त्याने टाळलं होतं. अर्ध्या तासांत वर्धाही ऑफिसमध्ये आली.

”हॅलो बच्चा, गुड मॉर्निंग. लक्षात आहे ना आजचं? आज मूव्हीला जायचा प्लान लक्षात आहे ना तूझ्या? काम पटापट आवर”

वर्धा केबिनमध्ये निघून गेली. पराग मात्र अस्वस्थ झाला होता. ऋतूजा आणि वर्धा दोघींच्या कात्रीत तो पुरता सापडला होता. एकीचंही मन त्याला मोडवत नव्हतं. एका बाजूला ती मुलगी होती जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं तर दुस-या बाजूला ती मुलगी होती जिने विश्वास टाकून पूर्ण आयुष्य त्याच्या हातात दिलं होतं. ऋतूजा भलेही चुकीची वागली असली तरी तिला त्याला दु:खवता येत नव्हतं, आणि डोळे झाकून विश्वास ठेवलेल्या वर्धाला त्याला दुखवाचं नव्हतं. आपण जे काही सुरू केलंय त्याचे परिणाम गंभीर असतील याची कल्पनाही त्याने केली नव्हती.
पुन्हा फोन वाजला, परागने फोनकडे पाहिले, ऋतूजाने मेसेज केला होता.

“आज आपण भेटणार आहोत ना? मी सहा वाजता वाट पाहिन तुझी”

परागने अजूनही रिप्लाय दिला नव्हता, आपण जर असं टेन्शनमध्ये ऑफिसमध्ये बसलो तर वर्धाला ओळखायला वेळ लागणार नाही, त्यामुळे शक्य तेवढं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न तो करत होता.
लंचची वेळ झाली, वर्धा केबिनमधून बाहेर आली.

” जेवायला जायचं ना?”

फार काही न बोलता परागने डबा घेतला आणि वर्धाच्या मागे चालू लागला. दोघांनी कँटीनमध्ये नेहमीसारखाच कोपरा पकडला.

”मी आले फ्रेश होऊन तू जेवायला सुरूवात कर ” वर्धाने डब्बा परागपुढे ठेवला आणि बाहेर गेली. इतक्यात परागचा फोन वाजला. ऋतूजाचा फोन होता.

” काय टाईमिंग आहे, काही सेकंद जरी आधी फोन आला असता ना माझ्या लव्ह लाईफची माती झाली असती” फोनकडे बघत तो कुत्सित हसला.

”हॅलो”

”हॅलो” परागने उत्तर दिलं.

” तू टाळतोय का मला?” ऋतूजाने रडवेल्या स्वरात विचारले.

” नाही”

”मग कालपासून मला रिप्लायही नाही केलास, मी तूझ्या फोनची वाट बघते आहे, आता तूझा लंच ब्रेक असेल म्हणून फोन केला”
”हो बिझी होतो थोडा”

” आज भेटणार आहेस ना मला?”

” सांगतो तूला नंतर’, मला खूप काम आहे”

”ते काही मला माहिती नाही, तू आज जर आला नाहीस ना तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन” ऋतूजाने फोन कट केला.

पराग पुरता घाबरला होता, ऋतूजा रागीट होती. तिच्या अशा वागण्याचा अनेकदा परागला अनुभव आला होता. त्याने लगेच फोन डाएल केला. तिने काही तो उचलला नाही. समोरून वर्धा येताना त्याला दिसली. त्याने पटकन मेसेज टाईप केला.

” ठिक आहे, भेटतो तूला कॉफी शॉपमध्ये”
ऋतूजाने एक स्मायली पाठवला, अखेर तिच्या मनासारखं झालं होतं तर..

”बच्चा तू ठिक आहेस ना? कालपासून कसल्या तरी टेन्शनमध्ये आहेस” तिने विचारलं.

”हो ठिक आहे मी” त्याने तिच्याकडे न पाहता डब्बा उघडला.

परागला वर्धा खूप चांगली ओळखत होती. तो टेन्शमध्ये आहे तिला जाणवत होतं. त्याचा हात हातात घेत तिने विचारलं.
”काय झालंय कसलं टेन्शन घेतलंय एवढं?”

परागला तिला सगळं खरं खरं सांगायचं होतं पण का माहित नाही त्याने खरं बोलणं टाळलं.

” ऐक ना आपण आजचा मूव्ही प्लॅन कॅन्सल करूया का? विनीतचा एक प्रॉब्लम झालाय. मला त्याला भेटायला जायचं आहे.”

”ओ अच्छा, ठिक आहे. जा तू”

एक खोटं पचलं होतं, परागचं टेन्शन थोडं कमी झालं होतं. जेवत असलेल्या वर्धाकडे त्याने पाहिलं.
ही मुलगी किती डोळे झाकून विश्वास ठेवते, याच जागी कोणी दुसरी असती तर एव्हाना रागवून भांडण केलं असतं. पण कोणतीही चौकशी न करता तिने जाऊ दिलं परागला फार गिल्टी वाटलं. आज ऋतूजाला पहिलं आणि शेवटचं भेटायचं, तिचा काय तो प्रॉब्लम सॉल्व्ह झाला की वर्धालाही खरं सांगून टाकायचं त्याने ठरवलं.
काम पटापट आवरुन पराग वर्धाच्या केबिनमध्ये गेला.

”चल निघतो, रात्री तूला फोन करतो. ”

परागने घाईत गाडी सुरू केली. कित्येक महिन्यांनंतर तो ऋतूजाला भेटणार होता. कशी होती ना ऋतूजा. तिचं नेहमी हे टोक नाहीतर तर ते टोक. कमालीची हट्टी. एखादी गोष्ट मनात आणली की ती केल्याशिवाय तिला चैन पडत नसे. दिसायला सुंदर होती. आपल्या दिसण्याचा केवढा गर्व होता तिला. पराग गाल्यातल्या गालात हसला. अर्ध्या तासात तो कॉफी शॉपमध्ये पोहोचला. ऋतूजाला वाट बघायला अजिबात आवडत नाही त्याला माहिती होतं. कोप-यात एक जागा पाहून पराग बसला.

” hi, मी पोहोचलो. तू कुठपर्यंत आलीस?”

” ok. पाच मिनिटात येते” ऋतूजाने मेसेज केला.

परागचं लक्ष कॉफी शॉपच्या दरवाजाकडे लागले होते. ब्रेकअपनंतर ऋतूजा आणि त्याची पहिलीच भेट होती. एवढ्यात समोरून ऋतूजा आली. त्याच्या आवडीचा कुर्ता तिने घातला होता, मुद्दाम घातला होता का तिने? नेहमीसारखीच चांगली दिसत होती. पराग तिला नेहमी सांगायचा ”ऋतू तू ना नेहमी एका बाजूला केस घेत जा. कुर्ता घातला की.”

आज ती अगदी तशीच आली होती. पांढ-या रंगाचा लखनौ कुर्ता तिने घातला होता. तिचे कंबरेपर्यंत लांब केस एका बाजूला घेतले होते. त्यावर डाव्या कानात घातलेले लाल रंगाचे झुमके उठून दिसत होते. ओठांवर लाल लिपस्टीक आणि डोळ्यांवर नेहमीप्रमाणे आयलायनर. जसं परागला आवडाचे अगदी तशीच तयार होऊन ती आली होती.

”माझी ऋतू.. काहीच बदललं नाही तिच्यात. भांडण झाल्यानंतर आम्ही जेव्हा केव्हा भेटायचो तेव्हा अशीच तयार होऊन यायची. स्पेशली तिची चूक असले तेव्हा. तिला कुर्त्यात पाहिलं की माझं राग कुठच्या कुठे पळायचा हे तिला माहिती होतं म्हणून एरव्ही शॉर्ट, जीन्स, वनपीसवर फिरणारी ऋतू नेमकी अशावेळी असंच काहीतरी करायची.” पराग मनात म्हणाला.

”hi” ऋतूजा पराग समोर बसली.

” hi”

” कशी आहेस?”

”कसा आहेस?”

दोघही एकत्रच म्हणाले आणि दोघंही हसले.

” बरं पहिलं तू सांग तू कशी आहेस?” परागने हसू आवरतं घेत तिला विचारलं.

” खरं सांगू की खोटं?”

” जे आहे ते खरं सांग, तू भेटायला बोलवलं आहेस म्हटल्यावर मला ऐकायलाच पहिजे” पराग खुर्चीला मागे टेकत म्हणाला.

” तू असं का वागतोस माझ्याशी पराग.. ? तू रागवला आहेस माझ्यावर मान्य आहे. मीही चुकले, तूला सोडून मी चुक केली पराग”

”अग हो जाऊ दे त्या गोष्टी आता. मी माफ केलंय तूला कधीच”

” खरं सांगू तूझ्यापेक्षा चांगला मुलगा दुसरा असूच शकत नाही. तू मला वेळ देत नव्हतास म्हणून तक्रार करायचे, मी तूला सोडून गेले. मला दुसरा मुलगा आवडला. पण नंतर नंतर मला कळू लागलं की तूझ्याएवढी माझी काळजी घेणारा दुसरा कोणी असूच शकत नाही. मी खरचं चुकले, मला माफ कर ”

परागने यावर काहीच उत्तर दिलं नाही. ”ऋतूला आता चुक कळाली होती तर… आता तिला माझी किंमत कळतेय. शेवटी मान्य केलं तर हिने.” पराग मनातून सुखावला.

” मी याआधीही सांगितलंय तुला. मी कधीच माफ केलंय आता पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नकोस” ब-याच वेळाने पराग म्हणाला.

” ओके, मग आपण पूर्वीसारखे…?”

”पूर्वीसारखे काय?” तिला नेमकं काय म्हणायचं आहे याचा अंदाज घेत परागने विचारले.

”काही नाही” ऋतूजाने विषय टाळला.

”हिला परत माझ्या आयुष्यात यायचं आहे की काय? वर्धाला कमिटमेंट दिली होती, आणि आता ही पुन्हा आयुष्यात येऊ पाहते आहे. ” टेन्शन परागला लपवता येत नव्हतं. हिने काहीतरी विचारण्याच्या आत इथून निघालेलं बरं असं म्हणत पराग पटकन म्हणला

”चल निघूया मला महत्त्वाचं काम आहे”

ऋतूजाचा चेहरा पडला ”पराग एक विचारू?”प्रश्न विचारून त्याच्या परवानगीचीही वाट न बघता तिने पुढचा प्रश्न केला
”तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस ना?”

परागला यावर काहीच उत्तर देता आले नाही, ”चल मी गाडी काढतो उशीर होतोय”

”बरं नको देऊस उत्तर, फार उशीर होत नसेल तर मला घरी तरी सोडशील का?”

”बसं सोडतो”

ऋतूजा परागच्या बाजूच्या सीटवर बसली. ”ऋतूजाचे आपल्याविषयी गैरसमज वाढण्यापेक्षा तिला सांगून टाकूया का वर्धाबद्दल? ती कशी रिअॅक्ट करेल? ती समजून घेईल का?” गाडीबरोबर विचारांचा वेगही परागच्या डोक्यात वाढत होता आणि कधी तिच्या घरासमोर आपण पोहोचलो हे त्याला कळलंच नाही. त्याने गाडी थांबवली. ऋतूजाने परागला हग केलं. कित्येक महिन्यानंतर ऋतू जवळ आली होती. त्यालाही राहवेना. आपले दोन्ही हात तिच्याभोवती टाकत परागने आपली मिठी घट्ट केली. ”आय लव्ह यू पराग, सॉरी मी चुकले”
”आय लव्ह यू टू ऋतू” परागच्या तोंडून नकळत शब्द बाहेर आले. ऋतूने दरवाजा उघडला, आणि ती निघून गेली. आपण काय केलंय याची चूक त्याला लक्षात आली होती, पण आता खूप खूप उशीर झाला होता. शब्द नकळत ओठांतून बाहेर पडले होते, आणि आता ते मागे घेणे शक्य नव्हतं, परागची गिल्ट आणखी वाढत गेली. साडे नऊ वाजून गेले होते.वर्धाचा मेसेज तेवढा होता, ती फोनची वाट बघत होती. परागने वर्धाला फोन केला.

”हॅलो”

”हॅलो, कुठे आहेस?”

”निघतोय, बोल ना”

”सगळं ठिक ना? झाला का विनितचा प्रॉब्लम सॉल्व्ह?”

”हो थोडा फार”

”चांगलं आहे, होईल सगळं ठिक. बरं ऐक ना! आज घरी ये. तूझ्यासाठी सरप्राईज आहे.”

”ओके तासाभरात येतो” परागने फोन कट केला.

पराग वर्धाच्या घरी पोहोचला. वर्धाने दरवाजा उघडला.

”अगं काय हे काळोख करून का बसली आहेस.?”

”अरे सरप्राईज आहे सांगितलं ना? तू आधी आत ये”

वैतागत पराग आत आला. वर्धानं लाईट्स ऑन केले. परागला खरंच सप्राईज मिळालं होतं. वर्धाने फुलांनी खोली सजवली होती. एका टेबलवर जेवण होतं आणि कँडल लावल्या होता.

”अगं हे काय?”

”असंच कँडल लाईट डिनर घरच्या घरी”

” मस्तय” पराग हसला.

”तू फ्रेश हो मग आपण सुरूवात करू”

पराग फ्रेश होऊन आला. दोघंही जेवायला बसले. सगळं परागच्या आवडीचं मागवलं होतं वर्धाने.
जेवता जेवता वर्धाने परागचा हात हातात घेतला. ”पराग खरं सांगू तू माझ्या आयुष्यात आल्यापासून आयुष्यच बदलून गेलं आहे. मी कधी कोणाच्या प्रेमात पडेल असं मला वाटलं नव्हतं. मला नेहमीच भिती वाटायची, पण आज मी खूप समाधानी आहे तूझ्यासारखा मुलगा माझा जोडीदार आहे. माझ्यासारखी सुखी मुलगी दुसरी कोणी नसेल. आय लव्ह यू पराग. खूप प्रेम आहे माझं तूझ्यावर जीवापलीकडे” बोलता बोलता वर्धाचे डोळे भरून आले.

तिला पाहून नकळत परागच्याही डोळ्यात अश्रू आले. ”एक गोष्ट सांगू पराग?”

परागने तिचे डोळे पुसले. ”बोल ना..”

”मला तू आधीपासून आवडायचा. पण मीच कधी बोलले नाही. तूझं ऋतूजावर खूप प्रेम होतं. तू माझा कधीच विचार करणार नाहीस याची मला भिती वाटतं होती, म्हणून मीही काही बोलले नाही. तूला आठवतंय तू एकदा मला म्हणला होतास मुली कुर्त्यात छान दिसतात, त्यादिवशी मी कुर्त्यात तुझ्यासाठी तयार होऊन आले होते. तू चोरून माझ्याकडे अनेकदा बघत होतास हे मला माहित होतं. पण मीच काही बोललो नाही. ज्या दिवशी तू मला प्रप्रोज केलं त्याचवेळी मला तूला हो म्हणावसं वाटत होतं, पण कसली तरी भिती वाटतं होती.”

परागला हा दुसरा अनपेक्षित धक्का होता, ”वर्धा सतत आपली काळजी करायची ते या प्रेमामुळे तर… आता मात्र वर्धाला खरं काय ते सांगायला हवं?” परागने मनाशी निश्चय केला, त्याने वर्धाकडे पाहिले. ती खूप खूश होती, त्याच्याविषयी उतू चाललेलं प्रेम त्याला दिसत होतं आणि तिच्या चेह-यावरचा आनंद त्या क्षणी त्याला हिरावून घ्यायचा नव्हता. जेवण झाल्यानंतर पराग घरी जायला निघाला पण वर्धाने मात्र आजचा दिवस तिच्यासोबत राहण्याचा आग्रह केला. परागलाही तिचा आग्रह मोडवेना. त्याच्या हातावर डोकं ठेवून ती शांत झोपी गेली होती पण पराग मात्र अजूनही जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. मोबाईला हात लावण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.

नक्कीच संध्याकाळच्या भेटीबद्दल ऋतूजाने काहीना काही मेसेज केले असणार आणि त्याला ते वाचून पुन्हा अस्वस्थ व्हायचं नव्हतं. नंतर कधीतरी त्याचा डोळा लागला त्यालाही कळलं नाही. सकाळी दोघंही तयार होऊन एकत्रच ऑफिसला गेले. ऋतूचे मेसेजवर मेसेज येत होते, फोन सारखा व्हायब्रेट होत होता. केबिनमधून वर्धाची नजर परागवर गेली. गेले दोन दिवस पराग फारच विचित्र वागत असल्याचे तिच्या लक्षात आलं होतं, जोपर्यंत पराग स्वत:हून काही सांगत नाही तोपर्यंत काहीही न विचारण्याचे तिने ठरवले. आठवड्याभरासाठी तिला पुन्हा चेन्नईला जावे लागणार होते, नुकताच तिला बॉसचा फोन आला होता. ती काम आवरून घाईत घरी निघाली, बॅग भरली, परागही तिला एअरपोर्टवर सोडून आला. काही महिन्यांपूर्वी आपण चेन्नईला जाऊ नये म्हणून तोंड पाडून बसणारा हाच पराग होता का? तिला विश्वासच बसत नव्हता.

परागने ऋतूजाचे मेसेज वाचले होते, त्याचे मन पुन्हा चलबिचल होत होते. ऋतूजाच्या आठवणीत तो पुन्हा रमत होता, आपण इथेच थांबायला हवं अशी गिल्ट त्याला वाटत होती. वर्धा चेन्नईला गेल्यानंतर त्याने ऋतूजाशी पुन्हा बोलणं सुरू केलं होतं, आता ऑफिसमध्ये वर्धा नव्हती त्यामुळे लपवून मेसेज करण्याचाही प्रश्न नव्हता. यावेळी परागने ऋतूजाला भेटायला बोलावले होते, दोघांनी समुद्र किना-यावर वेळ घालवला होता. आपल्याला एक गर्ल फ्रेंड आहे याचाही त्याला विसर पडला होता. पराग आणि ऋतूजा नकळत मनाने आणि शरीरानेही एकमेकांच्या जवळ येत होते. त्यादिवशी घरी परतताना ऋतूने आपले ओठ परागजवळ आणले होते, परागलाही राहावलं नव्हतं त्याने आपले दोन हात तिच्या गालांवर ठेवले…
एवढ्यात परागने पटकन ऋतूला मागे ढकललं. मोठी चूक करण्यापेक्षा त्याने सारं खरं काही ते सांगण्याचा निर्णय घेतला.

” ऋतू सॉरी हे मी नाही करू शकत”

” काय झालंय पराग?”

” ऋतू, माझी गर्ल फ्रेंड आहे”

” पराग” धक्का बसल्याने ऋतूजा जोरात परागवर ओरडली.

” हो ऋतूजा, तू गेल्यानंतर मी खूप दु:खी होतो त्यातून तुझा दुस-या मुलासोबत फोटो पाहून मला धक्काच बसला होता. मीही यातून सावरत होतो आणि काही दिवसांनी वर्धा माझ्या आयुष्यात आली”

”वर्धा?”

” हो वर्धा, माझ्याच ऑफिसमध्ये काम करते. माझी सिनिअर आहे, मला खूप समजून घेते, माझ्यावर खूप जीव आहे ग तिचा. माझ्या फक्त चेह-यावरून माझ्या मनात काय चाललं आहे हेही ती ओळखू शकते. तीच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही”

परागने मोबाईल पुढे करत वर्धाचा फोटो दाखवला, ऋतूला खूप राग येत होता. आपल्यापेक्षाही सुंदर मुलगी परागच्या आयुष्यात होती आणि पराग आपल्याला सोडून गेला होता. तिला राग लपवता येत नव्हता. पण आता राग करून काही उपयोग नव्हता. नाहीतर परागकडे परत येण्याचे शेवचे दारही तिला बंद झाले असते.

”पराग तिचं प्रेम असेलही तुझ्यावर पण तूझं काय? तू खरंच प्रेम करतोस का तिच्यावर एकदा विचार स्वत:ला.”

पराग शांत होता कारण त्यालाच उत्तर माहिती नव्हतं.

” बघ पराग जर तूझं तिच्यावर प्रेम असतं तर तू माझ्यासोबत नसतास, तूला गेल्या काही दिवसात ती आठवली का? बघ पराग if you love two people at the same time, choose the second. Because if you really loved the first one, you wouldn’t have fallen for the second. हे तूला वाचलं असशील . जर तूझं खरंच तिच्यावर प्रेम असतं तर तू मला तू आयुष्यात येऊच दिल नसतं. खर हेच आहे की तू फक्त माझ्यावर प्रेम करतोस.” परागचा आता गोंधळ उडाला होता.

”ऋतूजा बोलतंय ते खरं होतं का? खरंच माझं वर्धावर प्रेम नाही का? पण वर्धाला कसं फसवायचं आपण तिला वचन दिलं होतं.”

” ऋतू तू आता जा प्लीज मला एकटं राहायचं आहे”

” ओके पण तू विचार कर”

घरी गेल्यावरही त्याला वर्धा ऐवजी ऋतूच आठवत होती. त्यादिवशीची कॉफी शॉपमधली ऋतू त्यानंतर तिला केलेलं हग, आणि आज तिच्या आणखी जवळ गेलेलं आपण. इतक्या महिन्यानंतर ऋतू त्याच्याकडे आली होती.दोन दिवसांनी वर्धा परत आली होती. त्याने वर्धाला आठवड्याभरात साधा फोनही केला नव्हता. वर्धा खूपच अस्वस्थ झाली होती. ज्या गोष्टीची भीती तिला वाटत होती तेच होत होतं, ”पराग आपल्याला सोडून तर जाणार नाही ना?” विचार तिच्या डोक्यात चमकून गेला. वर्धाने परागला फोन केला.

”पराग मी मुंबईत आले. तू मला न्यायलाही आला नाही, ना फोन केलास. सगळं ठिक आहे ना?”

”हो अगं विनितीचा प्रॉम्बल अजून सॉल्व्ह झाला नाही, म्हणून सॉरी”

यावेळीही आपलं खोटं वर्धा ऐकून घेईल असं त्याला वाटलं. पण हे विनित प्रकरण काहीतरी वेगळं असावं अशी तिला शंका आली होती. पराग नक्कीच आपल्यापासून लपवतो आहे हे पक्क, पण ते काय होतं ते तिला कळतं नव्हतं, आता समजूतदारपणा दाखवण्याऐवजी ती जास्तच पझेसिव्ह झाली होती.

”ओके ऑफिसमध्ये भेटू.” तिने रागात फोन कट केला.

ती येण्याआधीच पराग ऑफिसमध्ये पोहोचला होता. परागकडे बघून ती आत निघून गेली होती. नेहमीसारखं तिने विशही केलं नव्हतं. ती वादळापूर्वीची शांतता होती का?

”पराग तू काय विचार केलास” ऋतू दर दहा एक मिनिटांने त्याला मेसेज करत होती आणि परागच टेन्शनही वाढत होतं, पराग कामात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त लक्ष घालत आहे हे वर्धाने केबिनेच्या काचेतून पाहिलं होतं.
दुपारी काय ते परागला खरं विचारायचं तिने मनात पक्क केलं आणि ती कामाला लागली. लंच ब्रेकला पराग आणि ती एकत्र जेवयाला गेले. त्याने मोबाईल टेबलवर ठेवला. वर्धा आणि तो काही न बोलता जेवत होते. फोन सारखा व्हायब्रेट होत होता. पराग प्रत्येक वेळी कावरा बावरा होत होता. तिला हे सारे असह्य होत होते. रागात तिने परागचा फोन हातात घेतला. पराग काही रिअॅक्ट करणार एवढ्यात तिने व्हॉट्स अॅपवरचे मेसेज वाचायला सुरूवात केली. नंबर सेव्ह नव्हता पण मुलीचा फोटो होतो. तो फोटो कोणाचा होता तिने ओळखलं होतं. वर्धाच्या हातून फोन ओढून घेण्यात काही अर्थ नव्हता आणि ऑफिसमध्ये सर्वांसमोर हे शोभलंही नसतं. वर्धाने काही करू नये एवढीच प्रार्थना तो करत होता. त्याचे एकामागून एक चॅट ती वाचत होती. वर्धाचे हात आता कापू लागले होते, तिचा चेहरा लालभडक झाला होता. वर्धाला असं त्याने कधीच पाहिलं नव्हतं, पण शक्य तितका स्वत:वर संयम ती ठेवत होती. इथे तमाशा करून किंवा ओरडून तिला स्वत:ची इमेज खराब करायची नव्हती.

”पराग तू ऋतूजाला भेटतोस? आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ…पुढचे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडलेच नाही.”

” मी तूला सांगणार होतो” परागला वर बघायची हिंमतच झाली नाही.

”पराग तू असं वागायला नको होतं” वर्धाचे डोळे पाणावले होते, पण डोळ्यातून साधा टिपूसही तिने बाहेर पडू दिला नव्हाता. तिच्या अशा वागण्याचे परागलाही आश्चर्य वाटले, ”ती शांत कशी बसू शकते?”

वर्धा काहीही न खाताच केबिनमध्ये निघून गेली. एरव्ही केबिनमधून दहा वेळा परागकडे बघणा-या वर्धाने त्यानंतर एकदाही त्याच्याकडे पाहिले नव्हते. ती फक्त काम करत होती. आता परागलाच तिच्या वागण्याची भीती वाटू लागली होती. सहा वाजले, वर्धाने बॅग घेतली आणि निघाली परागकडे तिने पाहिलेही नाही. ती फारच विक्षिप्त वागत होती, ती काहीतरी करून तर घेणार नाही ना परागला भिती वाटली. परागने आपलं काम हँडओवर केलं, पटकन बँग भरली आणि तो वर्धाच्या मागे गेला.
वर्धाची गाडी पुढे गेली होती. त्याने गाडी काढली. तो वर्धाला सारखे फोन करत होता पण ती मात्र उचलत नव्हती. शेवटी तिच्या घरी जायचं परागने ठरवलं. वर्धाची गाडी बिल्डिंगखाली उभी होती. त्याने आपली गाडी तशीच उभी केली आणि धावत तो वर गेला. दरवाजा उघडा होता. खिडकीपाशी वर्धा सोप्यावर पडली होती. ”वर्धाने जीवाचं बरं वाईट तर केलं नाही ना?” त्याला धडधडू लागलं, स्वत:ला सावरत तो आत गेला. तिने आपल्यावर प्रेम केलं होतं.. जीवापाड आणि आपण तिला प्रेमही देऊ शकलो नाही. वर्धाच्या आयुष्याचा शेवट इतक्या वाईट प्रकारे व्हावा असं त्याला वाटत नव्हतं.
त्याने सोप्यावर पडलेल्या वर्धाकडे नजर फिरवली. नशीब तिने अजूनही स्वत:ला काहीच केलं नव्हतं. ती जबरदस्त धक्क्यात होती. ती एकटक कुठेतरी पाहत होती. श्वास मंद सुरू होता.

”वर्धा वर्धा” परागने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. पण वर्धा मात्र काहीच बोलत नव्हती.

”वर्धा प्लीज काहीतरी बोल. प्लीज”

परागने वर्धाचा हात हातात घेतला आणि दुपारपासून डोळ्यातून एकही अश्रू न काढलेली वर्धा रडू लागली. तिच्या डोळ्यातून फक्त आसवं गळत होती.

”वर्धा तू मार, ओरड, रागव माझ्यावर पण प्लीज शांत बसू नकोस” पण शेवटपर्यंत तिने तोंड उघडलं नाही.

आपण काय करून ठेवलंय हे परागला आता पुरतं कळालं होतं. यापेक्षा वाईट त्याला आणखी काहीच करायचं नव्हतं. तो फक्त वर्धाच्या बाजूला बसून होता. वर्धाने अजूनही तोंडातून एक शब्द काढला नव्हता.
ऋतूजाचे फोनवर फोन सुरू होते. परागला आता हे सारं असह्य होत होतं. दोघींपैकी त्याला एकीची निवड करायची होती. एका बाजूला ऋतू तर दुस-या बाजूला खूपच हर्ट झालेली वर्धा. फोन सारखा व्हायब्रेट होत होता. गेल्या दोन तीन तासांपासून गप्प असलेली वर्धा उठली.
”पराग फोन वाजतोय, प्लीज उचल. मी तूझ्या आयुष्यातून दूर जातेय. मला जबदस्तीने तुझं प्रेम मिळवायचं नाही आहे. ऋतूजाला तू कधी विसरू शकत नाही हेच खरं आहे. जा तू तिच्याकडे. मी ठिक आहे.”हातात वाजत असलेला फोन परागने उचलला

”पराग तू काय विचार केला आहेस? वर्धाचा?”

पराग आणि ऋतूचं काय बोलणं सुरू आहे हे ऐकायलाही वर्धा थांबली नाही. ती आपल्या बेडरुमच्या दिशेने चालू लागली.

”ऋतूजा सॉरी. मी वर्धासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तू जमल्यास मला विसर, ज्या मुलीने मला कठीण काळात साथ दिली त्या मुलीला मी कधीच सोडू शकत नाही. शक्य असेल तर मला फोन करू नकोस”

परागने फोन सोफ्यावर तसाच फेकला, वर्धाला स्वत:ला रुममध्ये बंद करायचं होतं, ती दरवाजा बंद करणार एवढ्यात परागने दरवाजा ढकलला.

”पराग प्लीज जा, सगळं संपलंय आता.”

” संपलं नाही वर्धा आता सुरू होणार आहे”

”म्हणजे..?”

परागने वर्धाला जवळ ओढलं आणि तिला किस केलं, आपल्या मिठीत तिला ओढत त्याने तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले.

”वर्धा मी चुकलो, नक्की चुकलो पण मला माझी चुक कळली आहे. आयुष्यात कधी ना कधी अनपेक्षित वळण येते तेव्हा खरी कसोटी असते. माझं आणि ऋतूजाचं समजल्यावर तू बरंच काही करु शकली असतीस पण तू काहीच केलं नाहीस. खरंच वर्धा तूझं खूप प्रेम आहे माझ्यावर. तूझ्याइतकी चांगली जोडीदार मला नाही मिळू शकत आयुष्यात”

” एकदा मला माफ करशील ?”

”तूला माहितीय ना,मी तूझ्यावर किती प्रेम करते. पुन्हा असं कधीच वागू नकोस”  वर्धाने परागला आणखी घट्ट मिठी मारली. परागने डोळे मिटले, जीवपाड प्रेम करणारं आणि समजून घेणारं हक्काचं माणूस त्याला आता भेटलं होतं.

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित