निशाच्या या अशा सरप्राईजने अमेयसह भक्ती, अंकित, प्रणाली आणि कुणार सर्वच स्तब्ध झाले होते. निशाने सर्वांना पाहिलं. तिला आपण काय केलंय हे कळलं. मग आपण सहजच असं केल्याचा आव चेहऱ्यावर आणून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न तिने सुरू केला.

”अरे..असे काय बघताय माझ्याकडे? मला फक्त अनुभव घ्यायचा होता की खरंच एको येतो का ते, म्हणून अमेयचा नाव घेऊन पाहिलं.” निशा हसतहसत म्हणाली.

If Unhappy Take Leave This Company Big Decision
“आनंदी नसाल तर कामावर येऊ नका”, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; वर्षाला मिळणार ‘इतक्या’ दुःखी सुट्ट्या
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

”बरं..ठिकए..” भक्तीने थोडं लांब स्वरात जोर देऊन म्हटलं.

”अगं..खरंच..तुम्ही विचार करताय तसं काही नाहीय. अमेयबद्दल मी असा विचार करणं शक्य नाहीय.”

”ओके..ठिकए ना आम्ही कुठे काय म्हणतोय..”, प्रणाली म्हणाली.

अमेय देखील सुरूवातीच्या धक्क्यानंतर आता निवळला. पण निशाचं हे असं वागणं त्याच्या मनात घुटमळत होतं. त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. फक्त त्यास अधिकृत दुजोरा मिळत नव्हता एवढंच. तसंही दोघांना एकमेकांची संगत आवडत नव्हती असंही नव्हतं.
महाबळेश्वरमध्ये फिरून झाल्यानंतर पुढचा दिवस प्रतापगडावर जाण्याचं नियोजित होतं. महाबळेश्वर ते प्रतापगड अंतर तसं वीस एक किमी एवढं त्यामुळे सकाळी बसचा प्रवास होता. बसमध्ये हे सहा जण त्यांच्या आधीच्याच जागेवर जाऊन बसले. भक्ती किंवा इतर कोणी अमेयला सांगण्याची गरजच यावेळी पडली नाही. अमेय स्वत: निशाच्या बाजूला बसला होता.

वाचा: प्रेमाचा ‘एको पॉईंट’ (भाग १)

“अमेय..माझ्यामुळे तुला त्रास होणार असेल तर तू बस दुसऱ्या सिटवर..उगाच पुन्हा उलटीचा त्रास सुरू झाला तर..मला नाही आवडणार.”, निशा म्हणाली.

”अगं…नको काळजी करू..मला माहितीय तुला नाही होणार उलटी आता. तसंही तासाभराचा तर प्रवास आहे..लगेच पोहोचू.”

”अरे..तरी पण”

”अगं नको ग इतका विचार करू..तू खूप विचार करतेस ग..आणि उलटी झाली तर झाली. मला काही वाईट वाटणार नाही.”

अमेयच्या या वाक्याने पुढच्या सीटवर बसलेल्या कुणाल आणि प्रणाणीने ताडकन मागे वळून पाहिलं.

”हमममम….” प्रणाली म्हणाली.

”अरे..आता तुम्हाला काय झालं. मी सहज म्हटलं.”, अमेय म्हणाला.

”अच्छा..ओके..फाईन…”, कुणालने मुद्दाम डिवचण्याच्या स्वरात रिप्लाय दिला.

”अे..कुणाल बस खाली आता..पुरे..”, निशा म्हणाली.

बस प्रतापगडाच्या दिशेने निघाली आणि गाडीत पुन्हा एकदा धम्माल सुरू झाली. सर्वच खूप मज्जा करत होते. अमेय अधूनमधून निशाकडे पाहात होता. अमेयच्या अशा बघण्यातून निशाला कळलं होतं की अमेय काळजी म्हणून आपल्याकडे विचारपूस म्हणून पाहातोय.

”निशा..ठिक ना?” अमेयने मध्येच निशाला विचारलं.

”हो..अमेय.” निशा अमेयला म्हणाली.

अमेयचं असं काळजी करणं निशाला भावलं होतं. पण तिला ते थेट व्यक्त होता येत नव्हतं.

अमेयलाही आपण निशाची इतकी काळजी आणि विचारपूस का करतोय? याचा पत्ता लागत नव्हता. दोघांचीही मनं कन्फ्युज्ड होती.
बस प्रतापगडला पोहोचली आणि अमेयच्या म्हणण्यानुसार निशाला यावेळी उलटीचा त्रास झालाच नाही.

”बघ..निशा मी म्हटलं होतं नाही..तू उगाच विचार करतेस. नाही झाला ना त्रास.”, बसमधून उतरताना अमेय निशाला म्हणाला.

”हो..रे, पण सांगता येत नाही. मला प्रत्येकवेळी गाडी लागतेच.”, निशा म्हणाली.

भक्ती, अंकित आणि प्रणाली, कुणाल त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न होते. गड चढण्यास सुरूवात झाली होती. सरांनी दोन-दोनच्या गटाने चालण्याच्या सुचना दिल्या होत्या. अर्थात भक्ती अंकितसोबत चालत होती, तर प्रणाली कुणालसोबत. मग अमेय आणि निशा यांना पुन्हा एकदा काहीच पर्याय नव्हता. दोघं एकत्र चालू लागले.

गडावर चढताना निशा पटकन थकली. अमेयला ते कळून चुकलं होतं. तरीही तो निशाची थट्टा उडवत होता.

”काय..राव, लगेच थकता..कसं होणार तुझं.” अमेय निशाला म्हणाला.

”अे..राहू दे..दम लागतो मला. नाही जमत.”, निशा म्हणाली.

पुढे पायऱ्यांवरून किंवा खडकाळ भागावरून खाली उतरताना अमेय निशाचा हात पकडून तिला मदत करत होता. अमेयला निशाला चांगलं ओळखंत होता. पण मैत्रिच्या नात्याला आता नवीन वळणं मिळतंय असं अमेयलाही फिल होऊ लागलं होतं. ते व्यक्त होणं शक्य नव्हतं, हे अमेयला ठावूक होतं. रादर निशालाही अमेयबाबत आपण असा विचार करू शकत नाही याची कल्पना होती. पण नियतीने कदाचित वेगळंच ठरवलं होतं. कारण, अमेच्या निशाबद्दलच्या भावनेला हळूहळू बळ मिळत होतं आणि निशालाही.

एका ठिकाणी खडकावरून खाली उतरताना अमेय निशाचा हात पकडून तिला उतरण्यासाठी मदत करत होता. तितक्यात निशाचा पाय घसरला..तोल गेला. अमेयने निशाचे दोन्ही हात पकडून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. निशाचा तोल जाऊन ती खाली पडणार इतक्यात अमेयला तिला आपल्या दोन्ही हातात पकडलं होतं. अमेय आणि निशा यावेळी एकमेकांकडे एकटक पाहात होते. दोघांचीही नजर एकमेकांपासून हटत नव्हती.

दोघांमध्ये इतकी छान मैत्री होती की नजरेनेच दोघांनी एकमेकांच्या मनातलं ओळखलं होतं.

”अमेय..काय बघतोयस..”, निशाला कुणकुण लागली असूनही तिने अमेयला विचारलंच.

”कुठे काय..काही नाही.”, अमेय म्हणाला.

”तुझ्या डोळ्यातला कॉन्फिडन्स मला सगळं सांगतोय.”, निशा म्हणाली.

”मग, ठिक आहे की.”, अमेय म्हणाला.

इतक्यात भक्तीने आवाज दिला.

”काय..गं निशा..काय झालं? ओरडलीस का?”

”अगं..पाय घसरला. पडलेच असते.”, निशा म्हणाली.

”बरं..पडली नाहीस ना..अमेय असताना तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही.”, भक्ती मुद्दाम म्हणाली.

यावेळी निशा आणि अमेय दोघंही एकत्र भक्तीला म्हणाले.

”बरं…”

दोघांचा एकत्र आलेला रिप्लाय ऐकून भक्तीलाही हसू अनावर झालं.

”चला..चालू द्या तुमचं. मी जाते पुढे” असं म्हणून भक्ती पुन्हा अंकितकडे गेली.

अमेयला आता निशाचा सहवास हवाहवासा वाटत होता. तो मोबाईलमध्ये निशासोबतच काढलेले सेल्फी पाहण्यात गुंग झाला. दोघांचे खूप छान सेल्फी आले होते. त्यात एकदा निशाने कॉलेजच्या दिवसात केव्हातरी साडी नेसली होती आणि त्याच रंगाचा अमेयने कुर्ता घातला होता, तो सेल्फी अमेयला स्क्रोल करता करता समोर आला. अमेय त्या सेल्फीत हरवून गेला होता.

पिकनिकहून परतत असताना बसमध्ये अमेय आणि निशामध्ये चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. दोघांमध्ये मस्करी, एकमेकांची थट्टा उडवणं..मुद्दाम टोचेल असं बोलणं..फ्लर्ट वगैरे ही तशी काही नवी गोष्ट नव्हती. पण यावेळी दोघांच्या बोलण्याला एक वेगळीच किनार होती. प्रेमाची.

सुरूवात निशानेच केली. नेहमीप्रमाणे. मुद्दाम असेल कदाचित. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. पण अमेयच उत्तर यावेळी खरं होतं.

”अमेय..तुला काय वाटतं माझ्याबद्दल? तू मुद्दाम फ्लर्ट करतोस की त्यात तथ्य आहे.” निशाने अमेयला विचारलं.

अमेयने एका वाक्यात आपली भावना व्यक्त केली. निशाच्याच स्टाईलने.

”निशा..तू जसं माझं नाव घेतलंस, नंतर सारवासारवही केली..तसं मलाही एको पॉईंटवर तुझं नाव घ्यायला आवडेल. फक्त त्याला निरंतर प्रेमाचा एको इफेक्ट द्यायचा की नाही ते तुझ्यावर..”

अमेयच्या या उत्तराने निशा थेट घायाळचं झाली. तिच्या डोळ्यातला आपलेपणा अमेयला कळत होता. निशा काही बोलायच्या आत, अमेयने उत्तर दिलं.

”मला आपल्या भूतकाळाशी काही घेणं देणं नाही..मी फक्त तुझा विचार करतोय.”

अमेयच्या या वाक्यानंतर निशाने त्याच्या डोळ्यात पाहण्याचं सोडून दिलं आणि तीने मान बसच्या खिडकीकडे वळवली. निशा खिडकीबाहेर डोंगररांगांकडे पाहात होती. पण त्यादिवशीच्या एको इफेक्टप्रमाणे..निशाच्या डोळ्यासमोर फक्त अमेय..अमेय..अमेयचा चेहरा दिसत होता. तिला राहावलं नाही. निशाने पुन्हा एकदा मान वळवून अमेयकडे पाहिलं, तर अमेयचं लक्ष तिच्याकडेच होतं. जसं निशाने अमेयच्या डोळ्यांत पाहिलं..तसं अमेयच्या चेहऱ्यावर हसू उमटलं…होतं. दोघांचे डोळेच बोलके झाले होते.

अमेय-निशाच्या प्रेम कहाणीला सुरूवात झाली होती….पुढचा संपूर्णप्रवास दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून केला..तो आजही तसाच सुरूए…

 

समाप्त.

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित